वर्षाॠतूच्या आगमनाने राघूही आनंदले आहेत व ही आनंदाची बातमी वनात सर्वांना देण्यासाठी ते घिरट्या मारीत आहेत. झाडेदेखील अतिशय आनंदली आहेत व पक्षांप्रामाणेच त्यांच्याही अंगाखांद्यांवरून पावसाच्या सरी ओघळत आहेत.
पावसाचा इतका वर्षाव झाला आहे की नद्याही सागर भासु लागल्या आहेत. माझ्याही मनाला प्रियकराच्या भेटीची ओढ लागली आहे व या डोंगरवाटा जणु माझ्या मनाचे गुपित ओळखून माझ्या सर्व वाटा वेढून मला माझ्या प्रियकराच्या दिशेने नेत आहेत.
वर्षाॠतूचा ही किमया की पिकांचा मंद सुगंध मला केशाराच्या सुगंधप्रमाणे वाटते आहे. त्या सुवासने मी धुंद असतानाच माझ्यावर माझ्या प्रियकराच्या प्रेमाचा वर्षाव झाला आहे, माझा प्रियकर जणू घन होऊनच मला बिलगला आहे.
प्रतिक्रिया
वर्षाॠतू
समजल
अगदी
हे तरि
सुन्दर!
सन्गित