मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत...
तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका.
( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..)
संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
१. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन.
२.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल.
३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.
४.शुद्धलेखनाची व्यर्थ ट्यॊंवट्यॊंव चालणार नाही.
थोडक्यात उत्तरे लिहा.
१.दक्षिणेकडे पाय करून झोपले तर काय घडेल?
२.प्रतिसादात्मक पाठ खाजवाखाजवी म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या.
३.इनो या भुकटीची आंतरजालीय लोकप्रियता यावर काही वाक्ये लिहा.
४.फ़ेक आय्ड्यांचा वापर तोलून मापून कसा करावा ?
५.विशिष्ट सेवा पुरवणार्या स्त्रियांच्या पाठीला साबण चोळणे म्हणजे काय?
६.स्वत:च्या प्रतिभेच्या नकारात्मक वापराची काही उदाहरणे द्या.
७.पवित्र स्थळांचे पावित्र्य कसे राखावे हे सिंहगडाचे उदाहरण घेऊन स्पष्ट करा..
८.स्वत:च्या धाग्यांना प्रतिसाद वाढवायच्या उपायांपैकी कोणतेही पाच उपाय लिहा.
सविस्तर टीपा लिहा
१.अनिवासी भारतीयांवरील नेहमीचे आरोप आणि त्यांचे खंडन
२.सिंगल माल्टची दीक्षा
३.मामलेदार मिसळ
४.द्राक्षासवाचा अंमल
५.सात्विक कट्ट्यांची गरज
६.अष्टविनायकांचा महिमा
७. राक्षसी मीटरतरंग दुर्बिणीचे सामाजिक उपयोग.
८.धुक्यात हरवलेला "पिंजरा"
९.क्रमश: लेखनाची आवश्यकता
१०.ज्योतिष : शास्त्र,गरज आणि दिलासा
११. मराठी संस्थळांचा तौलनिक अभ्यास
१२. निरर्थक कौल : प्रवृत्ती आणि टाळण्याचे उपाय
१३. शंभर धाग्याSरंभांचा आनंद
१४.प्रेमकूजनातील उसाच्या कांडक्याचे महत्त्व
१५.एप्रिल महिन्यातील फ़ळाचा व्यापार.
१६.न झालेली खोडदची सहल
१७.शमसुद्दिन ग्यासुद्दिन
१८. विलासी जीवनातील व्यायामाचे महत्त्व.
दीर्घोत्तरी प्रश्न.
१.प्रचंड प्रतिसाद म्हणजेच उच्च दर्जा नव्हे... हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करा.
२”संगीतातले व्याकरण चालेल’ पण ”पद्यातले छंदवृत्ताचे व्याकरण त्याज्य’ असे का ?
३.मराठी आंतरजाल हे एक डबके आहे काय? असल्यास का? नसल्यास का?
४"राजकारणाप्रमाणेच आंतरजालातही कोणाशी कायमचे शत्रुत्त्व नसते " हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करा.
५."अहंकार डिवचला गेल्यास नवनिर्मिती होते" हे सोदाहरण स्पष्ट करा.
६.फ़रक स्पष्ट करा... " आणीबाणी" आणि " प्रशासकीय अनुमती"
७. "आंतरजालीय शांतताभंग" अर्थात "शांत वातावरणात अचानक धुरळा कसा उडवावा" हे स्पष्ट करा.
८.मराठी जनांमधील प्रांतिक भेदाभेदाची कारणे पुढील उदाहरणे घेऊन स्पष्ट करा.
पुणेकर / मुंबईकर , अनिवासी / निवासी , ईष्ट कोष्ट / वेष्ट कोष्ट ...
९.बे एरियातल्या साहित्य संमेलनाविषयी दोन्ही बाजू स्पष्ट करा.
वाचने
14358
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्वाचा प्रश्न विसरलात!
"फाट्यावर
आणखीही काही!
जबरा
अगायायाया !!
कोण ते
हा हा हा!
In reply to कोण ते by पक्या
ह ह पु वा
In reply to कोण ते by पक्या
ख.फ. काय
In reply to ह ह पु वा by टारझन
>>(परी ही
In reply to ह ह पु वा by टारझन
विजुभौ आणि
In reply to >>(परी ही by सखाराम_गटणे™
वा, वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मास्तर
बाणासाठी
In reply to मास्तर by मदनबाण
सर्व
In reply to बाणासाठी by भडकमकर मास्तर
मनोरंजनाचा
एक मल्टिपल चॉइस प्रश्न
In reply to मनोरंजनाचा by रामदास
यात "इतर"
In reply to एक मल्टिपल चॉइस प्रश्न by भडकमकर मास्तर
इतर नाही
In reply to यात "इतर" by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझेही...
एका प्रश्नाचे सर्रळ उत्तर
भडकमकर????????
दातकोरुन पोट भरतात
In reply to भडकमकर???????? by अभिज्ञ
काही उत्तरे... :)
+१
In reply to काही उत्तरे... :) by विसोबा खेचर
धम्माल
दंतवैद्य
ह्या प्रश्नांची
एटीकेटीची
जहबहर्या
मास्तर, प्र
आणखी एक प्रश्न राहिला.
In reply to मास्तर, प्र by अभिज्ञ
डुप्लिकेट
In reply to आणखी एक प्रश्न राहिला. by अनंता