वाढदिवस लक्षात ठेवणे गरजेचे आहे का ?
नमस्कार ,, मी येथे नवीन चर्चेला वाचा फोडत आहे .. त्याच काय आहे , जवळजवळ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .. मी आधीही कधी कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवला नाही आणि पुढेपण ठेवेन असे वाटत नाही ... येणारा दिवस आपला असे मानून पुढे धाकाला असतो रहाटगाडे .. त्यामध्ये लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे म्हणजे महापाप .. ते मी कशाला ठेवू .. पहिली दोन तीन वर्षे मी विसरलो म्हणौन दणकून सडकून चपापून भांडणे झाली .. इतकी कि जे जवळचे आप्त आले होते ते घाबरून पुढच्या वाढदिवसाला यायचं कि नाही हा विचार करू लागले .. त्यामध्ये माझ्या आईचा पहिला नंबर होता .. तिने बिचारीने माझ्या लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवला आणि पहिली तीनेक वर्षे यथायोग्य मला आदल्या दिवशी कळवायची तसदी घेतली .. ती गोष्ट हिला तिने ( आईने ) मस्करीमध्ये सांगितली मग काय .. हिनेपण पुढच्या वाढदिवसाला आईने मला कळवू नये याची यथायोग्य काळजी घेतली आणि तो दिवस आला .. बुद्धी कुशाग्र बनवण्याचा दिवस .. माझ्या लग्नाचा वाढदिवस ...
मी नेहेमीप्रमाणे सकाळी उठून कामावर गेलो आणि संध्याकाळी उशिरा आलो .. घरी आई अली आहे ते मला संध्याकाळीच माझ्या मोठ्या मुलाने सांगितलं पण मला पुढे काय होणार आहे याची सुतराम कल्पनाही नव्हती ...
मी नेहेमीप्रमाणे घरी आलो आणि थेट हिने माझ्यावर आक्रमण केलं . थोडावेळ मी भांबावून गेलो आणि जेव्हा मला कळलं कि सालं आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो विसरलो म्हणून हे सर्व चाललंय तर माझं पण टाळकं सटकलं .. पण तिने मला जेव्हा हे सांगितलं कि पहिले तीन चार वाढदिवस तुम्हाला आई सांगत होत्या तेव्हा मात्र मी खजील झालो ..
मग तडक खाली गेलो आणि खात्यात होते तेव्हढे रुपये काढले आणि थेट एक सोन्याचा हाराचा सेट खरेदी केला ... चांगलाच फटका बसला होता तोही विनाकारण .. फटका बसला पण एक चांगला परिणाम हा झाला कि आमची हि पार शांत झाली .. कारण तिला त्या नेकलेसच्या सेट बरोबर मी खात्यातली उरलेली शिल्लकची पावतीही दिली होती .. फक्त सत्तावीस रुपये बाकी होते आणि चक्क सात दिवस अजून पुढे काढायचे होते.. दुसऱ्या दिवशी तिने मला सांगितले कि मला तुम्ही काही दिले नाही तरी चालेल पण माझा अगर लग्नाचा वाढदिवस विसरलात तर ते मला चालणार नाही .. मिपाकरांनो विश्वास ठेवा माझी बायडीने आजपर्यंत काहीच मागितले नाही .. मी फक्त वाढदिवस ( तेही दोन्ही ) लक्षात ठेवतो .. किंबहुना ते आता मरेपर्यंत कधी विसरले जाणार नाहीत असे वाटतेय ..
तुमहाला काय वाटते , या मुली किंवा स्त्रिया ,, या दिवसासाठी एव्हढ्या का हळव्या असतात ? त्याने काय सध्या होते .. मला तर तो एक साधा नेहेमीसारखाच दिवस वाटतो .. मी प्रत्येक दिवस मस्त मजेत कसा जाईल एवढाच बघतो .. काही जास्त अपेक्षा नाहीत कि काही नाही .. पण या मुळींच असे काय असते कि त्यांना त्या विशेष दिवसाचे एव्हढे महत्व वाटते .. तुम्हाला काय वाटते ते कळवा जरूर .. विषय गंभीरपण असू शकतो .. मला एक ते दीड लाखाला वाढदिवस पडला .. इतर कुणावर असा प्रसंग ओढवला का कि अजून काही वेगळे झालेय ऐकायला आवडेल आपल्याला ...
याद्या
11344
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
मस्त उपाय केलात
ह्याप्पीबड्डेच्या संसर्गजन्य
.
.
आमच्याइथे उलट आहे खिलजीभाऊ
हा खरच एवढा इगोचा विषय
In reply to आमच्याइथे उलट आहे खिलजीभाऊ by श्वेता२४
माझा व बायकोचा पाठोपाठच आहे.
In reply to आमच्याइथे उलट आहे खिलजीभाऊ by श्वेता२४
"समोरच्याने आपल्यासाठी
+1
लग्नाचा आणि बायकोचा वाढदिवस
अहो चित्रगुप्त साहेब ,
द बेस्ट वे टू रिमेम्बर युअर वाईफ्स बर्थडे इज टू फर्गेट इट जस्ट
तात्पर्य , एकदा तो दिवस
आम्ही...
आणि हो...
एक प्रसंग आठवतो
काय हरकत आहे
वाढदिवसाचा दिवस मोकळा ठेवतो
समर्पक प्रश्न
खरं तर प्रत्येक दिवस हा वाढदिवस असतो.
लोक इतक्या साध्या गोष्टी
हा सहज त्रिशतकी धागा झाला
वाढदिवस लक्षात राहतात.
हेहेहे