मतदानाची गोष्ट
या वेळेस मतदान केंद्र मेरी इमॅक्युलेट विद्यालय, बोरिवली येथे होते. हे विद्यालय मंडपेश्वर टेकडीच्या पायथ्याशी, टेकडीचा बराच भाग व्यापून उभे आहे. टेकडीच्या नैसर्गिक उताराचा योग्य असा वापर करून शाळेच्या इमारती बांधल्या आहेत. या विद्यालयात मतदान कक्ष वेगवेगळ्या स्तरांवर(levels) होते, जिथे पोहचण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागले. माझा मतदान कक्ष सुमारे सहाव्या मजल्याच्या उंचीवर होता. घामाघूम होऊन तिथे पोहोचलो व रांगेत उभा राहिलो. मतदान करून बाहेर आल्यावर बघितले तर तिथे पोहचण्यासाठी दुसऱ्या बाजूने उताराचा रास्ता (ramp) होता. प्रवेशद्वारापासून हे अंतर सुमारे शंभर ते दीडशे मीटर्स असावे.
घरी आल्यावर सदर बाब मा. खासदार श्री गोपाळ शेट्टी यांना tweet केली.
सुमारे तासाभराने मतदान केंद अधिकाऱ्याचा फोन आला. फोन वरील संभाषण.
‘नितीन पालकर साहेब बोलतायत का?’
‘हो, बोला.’
‘साहेब तुम्ही कुठे राहता? आत्ता मतदानाला येणार आहात का? मी तुमच्यासाठी गाडी पाठवतो.’
मी त्यांना म्हणालो, ‘मी मतदान केले.’
‘साहेब, आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांकरता बूथ पर्यंत वाहनाची व्यवस्था केली आहे. तुम्ही कुठे तक्रार केलीत साहेब?
‘मी गोपाळ शेट्टींना tweeter द्वारे कळवले.’
‘साहेब प्लिज आता योग्य व्यवस्था झाली आहे असे कळवाल का?
‘हो, नक्की.’
मी खासदार श्री. गोपाळ शेट्टींना पुन्हा एकदा ट्विट करून त्यांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले.
स्मार्ट फोनचा उपयोग whats app, सेल्फी व्यतिरिक्त तुमची बँक तुमच्या खिशात, शासन तुमच्या तुमच्या हातात असाही होतो.
शासन, प्रशासन यंत्रणा आता तुमच्या जवळ आहे तुम्ही योग्यरित्या त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे हे सर्वांना कळावं एवढ्याचसाठी हा लेखन प्रपंच.
याद्या
8004
प्रतिक्रिया
25
वर्गीकरण
मिसळपाव
छान!
धन्यवाद!
In reply to छान! by mayu4u
धन्यवाद!
In reply to छान! by mayu4u
अभिनंदन !
राजकीय कल काहीही असला तरी...
In reply to अभिनंदन ! by धर्मराजमुटके
धन्यवाद!
In reply to अभिनंदन ! by धर्मराजमुटके
धन्यवाद!
In reply to अभिनंदन ! by धर्मराजमुटके
सुजाण आणि जवाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनं
धन्यवाद!
In reply to सुजाण आणि जवाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनं by टर्मीनेटर
छोट्या बाळाला
मतदानाच्या दिवशी ज्या
हे खरे असू शकेल..
In reply to मतदानाच्या दिवशी ज्या by NiluMP
खुळी समजूत
म्हणून लोकशाही हवी पण मतदान
छान
धन्यवाद!
In reply to छान by हेमंतकुमार
लोकशाही देशाचे जागरूक
धन्यवाद!
धन्यवाद!
सिविजिल अॅप द्वारे निर्वाचन
सिविजिल अॅप...
.
गैरसमज ....
हो, पण तुम्ही कुठल्यातरी
In reply to गैरसमज .... by Nitin Palkar
उंचावर