मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही,
झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण,
पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो,
मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो,
डोळ्यांच्या कडा ओल्या होणं,
मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके,
मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं,
असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर
गोठलेली बोटं लिहू लागतात..
तुझ्या असण्याने खरंच फरक पडला असता का? कुढत राहणं हा एखाद्याचा स्वभावच असेल तर? हेवा वाटावा अशी असतात काही माणसं, छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारी, खुशमिजाज की असंच काही म्हणतात ना त्यांना? त्यांच्याशी तुलना केली की मला मी सहन होत नाही, तुझ्यासोबतच्या आयुष्याची पाहिलेली स्वप्नं, मग त्या स्वप्नांचा झालेला चुराडा, आणि आता नवी स्वप्नं पाहण्याची संपलेली इच्छा, या सगळ्यांची उजळणी करून झाल्यावर, मग गोठलेली बोटं लिहू लागतात..
फक्त एकदा तुला पुन्हा भेटायचंय, तुला सांगायचं राहून गेलेलं बरंच काही सांगायचंय, मी तुला तू मला विसरायचं 'नाटक' करावं लागू नये, ही एवढीच अपेक्षा आहे फक्त.. तुझ्याशिवाय जगणं अगदी आनंदोत्सव वगैरे नसलं तरी असह्य तरी नसावं इतकंच हवं आहे मला, पण तू येणार नाहीस.. पण तू येणार नाहीस.. पण तू येणार नाहीसचं.. अशी स्वतःच स्वतःची खात्री करून घेतल्यावर, मग गोठलेली बोटं लिहू लागतात..

| लेखनविषय: |
|---|
वाचने
3780
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
या कवितेला का बरं प्रतिसाद
चांगली आहे पण...
धन्यवाद. तुमच्या कविता
In reply to चांगली आहे पण... by चांदणे संदीप
वाह मस्त!
धन्यवाद. पण सौमित्र बरोबर
In reply to वाह मस्त! by सोन्या बागलाणकर
आपल्या लिखाणाला भरभरून
वाचायला!
In reply to आपल्या लिखाणाला भरभरून by सिक्रेटसुपरस्टार
इथे इतके सदस्य येतात कशाला?>>
हो ते तर दिसतच आहे. अनेक
In reply to इथे इतके सदस्य येतात कशाला?>> by प्रमोद देर्देकर
अनुभवाचा दर्जा