Skip to main content

<अस्वस्थ मन!>

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/03/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेरणा यांची "मन" ही कविता.. काय करु आज विडंबनाची हुक्की आली.. ह. घ्या. कधी सकाळी उगाच पोट दुखुन येतं.. टाकीतलं पाणी नेमकं तेव्हाच आटुन जातं.. पाण्याची जाण, फक्त, कोरडा नळ देतो! तेव्हा फक्त टिश्यु पेपर मदत करु पाहतो.. थरारलेल्या क्षणांमागे मन जाऊन लपतं.. ते क्षण सरले की मग खुद्कन हसतं! काल काय खाल्ले मन पुन्हा उकलू पाहतं.. पुन्हा असे खायचे नाही, वेडं, शपथ घेउन जातं! भरलेल्या ताटावरती पुन्हा फिरून येतं.. थरारलेले क्षण पुन्हा विसरुन जातं..
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1829
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आयला, एवढं मस्त विडंबन कसे काय करतात देव जाणे. तुमच्याकडे विडंबनं पाडायचा साचा आहे की काय ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

आज हे काय? विडंबन झालंय मस्तच... पण, एकदम पु. भा. भाव्यांनी वि. आ. बुवांचं पेन ढापून लिहायला सुरवात केल्यासारखं वाटलं... :) एनिवे, विडंबन्-क्लबमध्ये हार्दिक स्वागत!!

थरारलेले क्षण =)) लै भारी! चालु द्या!

In reply to by सँडी

>>>थरारलेले क्षण =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

इतकी वेळ येईपर्यंत मिपावर पडीक राहू नये आणि राहिलं तरी मग पाकृ विभागात डोकावू नये.. आणि डोकावलं तरी फ्लॉवर मटार करंज्या, कानडी सागू, कोलंबी-शेवगा, चिकन -सुरणाचे वडे, कचोर्‍या, लज्जतदार मका, खजुराचे लाडू.... असं सगळं एकदम खाऊ नये. मग अजिर्ण होतं. (ह. घ्यालच ) :) असो.. विडंबन एकदम जबरा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बापरे !!! तुम्ही पण? :O वा ! विडंबकांच्या भाउगर्दीत तुमचे हार्दिक स्वागत... :) विडंबन चांगले जमले आहे... प्राजुताईंचा सल्ला घ्या मनावार ;) --अवलिया

;;) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}