सोशल मेडीया, चॅट ॲप अन असले फोरम: एक तुलना
निमित्त: एक पोवाडा लिहीला होता. नकळत मिपावरील जुने अन नविन दिवस आठवले अन तुलना केली.
माझ्याच धाग्यांना मी शक्यतो उत्तरे देत नाही. धागा वर आणत नाही. तत्राप या व्हाटस मुळे लोक अशा फोरमवर कमी येत आहेत. अन कवितांनातर गिर्हाईकच नाही. मालाला उठाव नाही पण उत्पादन अधीक.
आवाहन: बंडूंनो अन बंड्यांनो, व्हा ॲ च्या जमान्यात अशा वेबसाईट्सवरच लिखाण कायमचे राहते. व्हा ॲ वर प्रतिसाद, लेख पटकन मिळतात पण ते लवकर वाहून जातात. व्हा ॲ हे पी हळद अन हो गोरी आहे. अन येथील लेख प्रतिसाद हे व्यायम केलेले शरीर आहे.
मी अजूनही काही जुने लेख वाचतो ( इतरांचेदेखील). बुकमार्क करतो. ते वाचल्यानंतर आनंद मिळतो. प्रतिसाद वाचून उभारी मिळते. व्हा ॲ वर असे होते काय?
तर मंडळी विचार करा. व्हा ॲ वापरा पण येथेही येत चला. मिपावर एक काळ असा होता की अगदी दुसर्या मिनीटाला प्रतिसाद येत होता. असो.
आणखी एक. प्रतिसादांची चिंता करु नका. लिहीत रहा. प्रतिसाद म्हणजे जो देगा उसका भला नही देगा उसका भला. आत्मानंदासाठी लिहीत रहा.
याचा दुरगामी परिणाम म्हणजे आपली भाषेविषयक आवड तिव्र होते. मते ,तत्वे पक्की होतात. एखादा विषय आवडू लागतो. मी सामाजिक विश्लेषक नाही पण आपल्या जडणघडणीत लिखीत साहित्याचा, वाड्मयाचा वाटा मोठा असतो.
वाचत तर रहाच पण लिहीतही रहा.
मी काही तत्वज्ञ नाही. नाहीतर हा लेख म्हाणजे नाकापेक्षा मोती जड असा व्हायचा.
याद्वारे फोरम अन चॅट ॲप यांची तुलनाही करता येईल.
याद्या
4523
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
दवणे चावले की काय?
दवणीय लिहायचे आहे अजून.
In reply to दवणे चावले की काय? by आनन्दा
अगदी पटले.
खरं आहे. ईथल्या साईटवरचे
मननीय लेखाबद्दल मनापासून आभार
आपल्यासारखीच माझी परिस्थिती
In reply to मननीय लेखाबद्दल मनापासून आभार by चित्रगुप्त
+१
In reply to मननीय लेखाबद्दल मनापासून आभार by चित्रगुप्त
अगदी अगदी मनातल बोल्लासा
फेबु म्हणजे चव्हाटा तर व्हाऍ म्हणजे अळवाच पाणी
लेखाशी सहमत धन्यवाद.