Skip to main content

कारण हे निमित्तमात्र

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 30/03/2019 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. अोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो हाच का तो हा प्रश्न मनास पडतो शोध नव्याच्या नव्यानी चालू होतो डोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो नवा खांदाही शेवटी जुना होतो अपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो सोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो एखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो अव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र नाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..
लेखनविषय:

वाचने 1444
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हा दृष्टीकोन देखिल आवडला. प्रत्येक खांद्याला कधिना कधी त्याच्यावर पडणारा भार असह:य होतोच. ती वेळ येण्या आधी आपण दुर झालो तर गोडवा टिकून रहातो. पैजारबुवा,