माझ्या साधारणतः सहावर्षे जुन्या एच पी लॅपटॉपवर मासॉची खिडकी क्रमांक १० कार्यप्रणाली कार्यरत असते. अगदी अलिकडे पर्यंत मी फाफॉ किंवा क्रोम ही ब्राऊजर्स गरजे प्रमाणे वापरत असे. एक्सप्लोरर आणि आताचे एज वापरून जमाना झालेला होता.
गेल्या दोन - एक महिन्यात केव्हातरी खिडकी १० आपोआप अद्ययावत झाली, आणि आमच्या संगणकावरच्या फाफॉ आणि क्रोमने दम तोडला -म्हणजे काही केल्या साईट्स डाऊनलोडच होत नव्हत्या एवढा वेग कमी झालेला. मासॉने उपलब्ध केलेले एज उघडले तर चालायला तर लागले. मनात विचार केला मासॉ एवढी सर्वीस पुरवते त्यांचाच ब्राऊजर वापरावा असा काही हट्ट असेल तर पुरवूया हट्ट आपणही कशाला मनाला लावून घ्यायचे म्हणून एजवर धकवायला लागलो. मी इतर गूगल सेवा जसे शोध, ड्राईव्ह , युट्यूब नाही म्हटलेतरी बर्यापैकी वापरतो. प्रत्येकवेळी गूगलची आलेली क्रोमवापरण्याची विनंती आम्ही नाईलाजाने नाकारली.
पण एवढ्यावर समस्या सुटली नसावी आमचा लॅपटॉप संगणक बराच आवाज करून आंतरजालाचा वेग कमी होऊन बंद पडण्याच्या स्थितीवर आला. मासॉची कोणतीतरी प्रणाली सतत कार्यरत होती. जरासे आंजा शोधले त्यातले काही गमणे आमच्या अतंत्रज्ञ बुद्धीस झेपणारे नव्हते. बाहेरून तांत्रिक सेवा घेण्यापुर्वी मासॉची रिसेटवाली काही सिस्टीम आढळली म्हटले ती वापरून खिडकी रिसेट करून पहावी. रिसेटींगच्यावेळी खिडकीशी संघर्षरत प्रणाली वगळल्या जातील अशी काहीशी सुचना आली. आमच्या संगणकावर इतर काही प्रणालीही फारशा नव्हत्या. अँटी व्हायरस जबाबदारी सुद्धा मासॉच्या डिफेंडरच्याच कृपेवर आहे. केवळ अशात न वापरलेले फाफॉ आणि क्रोम होते ते गिळंकृत करून खिडकी १० रिसेट होऊन शांत झाली.
काल कोणत्याशा वेबसाईटवर उपलब्ध युट्यूब डायरेक्ट युट्यूबवर बघावे म्हणून युट्यूबच्या आयकॉनवर क्लिककेले तर युट्यूब महाशयांनीको क्रोमचीच अँटी मालवेअर वापरून पहाण्याची अप्रत्यक्ष सुचना देत नकार दिला . तेव्हा क्रोम पुन्हा डाऊनलोड करण्याचा उद्योग केला. पण खिडकी १० ने प्रोग्राम रन करण्याबद्दल आम्हाला दम भरला म्हणून युट्यूब नाहीतर नाही म्हणून आम्ही नाद सोडला. पण काल क्रोम डाऊनलोड केल्या पासून खिडकी पुन्हा तापावयास लागली आहे.
आता तसे आम्ही अतंत्रज्ञ त्यामुळे मासॉ आणि गूगलचे आपापसातले सुप्त युद्ध आमच्या संगणकावर खेळ्ले जात नाही आहे ना या शंकेने आमचे मन घेरले आहे. हे केवळ आमच्या मनाचे आभासी खेळही असतील म्हणून मिपाकर खास करून जाणकारांपाशी मन मोकळे करत आहे. कुणास या बद्दल असे अनुभव आले येत असल्यास त्याची चर्चा या निमीत्ताने व्हावी किंवा आमची आभसी अंधश्रद्धा निर्मुलीत व्हावी म्हणून धागा काढत आहे.
* अनुषंगिका व्यतरीकत आवांतरे व्यक्तीगत टिका आणि तथाकथित शुद्धलेखनाचे डोस टाळण्यासाठी; धागा विषयास अनुसरून चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
मिसळपाव
प्रतिक्रिया
जसजशी खिडकी अद्ययावत होते,
जसजशी खिडकी अद्ययावत होते, तसतसे तुम्हाला अखिडकी softwares/ applications इत्यादि अद्ययावत करावी लागतात. तशी तुम्ही केली का?
तुमच्या लॅपटॉप चे config काय आहे?
पॅव्हेलीयन जी सिरीज आय ३
In reply to जसजशी खिडकी अद्ययावत होते, by यशोधरा
पॅव्हेलीयन जी सिरीज आय ३ बीट ६४
केवळ २ च फाफॉ आणि क्रोम व्यतरीक्त काहीच नाही आणि ते आपोआप अद्ययावत होण्याच्या मोडवरच होते जशी खिडकी अद्ययावत झाली त्यांना अद्ययावत सोड इंस्टॉलची संधिच मिळालेली नाही.
तुमच्यात राम नाही बहुतेक!
तुमच्यात राम नाही बहुतेक!
रामाची भक्ती वाढवा..
In reply to तुमच्यात राम नाही बहुतेक! by आनन्दा
रामाची भक्ती वाढवा..
मासॉ 10 ला किमान 8अब्ज पाहिजे.
__/|__ धन्यवाद ह्यावर काम
In reply to रामाची भक्ती वाढवा.. by आनन्दा
__/|__ धन्यवाद ह्यावर काम करून बघतो . अनेक आभार.
__/|__ धन्यवाद ह्यावर काम
In reply to रामाची भक्ती वाढवा.. by आनन्दा
__/|__ धन्यवाद ह्यावर काम करून बघतो . अनेक आभार.
३ अब्ज दिसतोय वाढवून बघतो .
In reply to रामाची भक्ती वाढवा.. by आनन्दा
३ अब्ज दिसतोय वाढवून बघतो .
3 तर नुसते उभे राहायलाच
In reply to ३ अब्ज दिसतोय वाढवून बघतो . by माहितगार
3 तर नुसते उभे राहायलाच लागतील..
तुम्ही कुठे राहता?
पुण्यात असाल तर माझ्याकडे पडून आहे, लावून बघूया..
राशीपेटी कोणती आहे ?
माहितगार,
मला वाटतंय की मनःपूतस्मृती ( = random access memory ) पेक्षा ही राशीपेटीची ( = data storage) समस्या वाटते आहे. तुमची राशीपेटी चुंबकीय तबकसूची ( = magnetic hard disk ) प्रकारची दिसते आहे. जमल्यास बदलून ठोसदशासाधन ( = SSD = solid state device ) वापरून पहा म्हणून सुचवेन. ही पेटी मला लई आवडली : https://www.amazon.in/Western-Digital-WDS240G2G0A-240GB-Internal/dp/B07… किंमतही बरीच कमी आहे. २४० अब्जांत खिडकी व्यवस्थित बसेल याच पेटीची धाकली बहीण १२० अब्जांची आहे. तीसुद्धा चांगली आहे.
वर आनन्दा यांनी सुचवल्याप्रमाणे पुण्यात असाल तर उरुसंगणक घेऊन त्यांच्याकडे एखादी चक्कर मारा. बरं पडेल.
आ.न.,
-गा.पै.
माझ्या अनुभवानुसार मासॉ 10
In reply to राशीपेटी कोणती आहे ? by गामा पैलवान
माझ्या अनुभवानुसार मासॉ 10 -2018 ला 3 अब्ज फक्त रांगायला पुरते.
उभे राहायला 4 तरी हवी, आणि पळायला 8.
बाकी ठोसदशासाधन मी पण सुचवणार होतो, पण म्हणलं आधी मूलभूत प्रश्न सोडवू.
अवांतर-
1. मनःपूतस्मृती आवडला
2. हा उरु वाला नाही, त्यांनी उचलला तर उरावर पडण्याची भीती अधिक, तेव्हा मीच जाणे योग्य, कसे?
आयला, होच्च की!
In reply to माझ्या अनुभवानुसार मासॉ 10 by आनन्दा
आनन्दा,
हा उरुपटू नसून पटलपटू आहे, हे विसरलोच होतो! :-)
मन:पूतस्मृती वाढवण्यासाठी डब्बा उघडावा लागेल. याउलट बाह्य ठोसदशासाधन हे मात्र नेहमीचे सरळ-वर्षा-जोड ( = universal serealised bus = usb connection ) वापरून कार्यान्वित करता येईल.
योग्य तोडगा ठरवण्याच्या आधी कार्यप्रबंधक ( = task manager ) वापरून स्थायीस्मृती तबक ( = hard disk ) अथवा केंद्र प्रक्रियक ( = cpu ) कोण खिडक्या मंदावतंय हे शोधून काढावं म्हणतो.
आ.न.,
-गा.पै.
स्थायीस्मृती तबक की तबकडी ?
In reply to आयला, होच्च की! by गामा पैलवान
स्थायीस्मृती तबक की तबकडी ?
इतर कशानं नाही ओढवलं तरी
In reply to स्थायीस्मृती तबक की तबकडी ? by सस्नेह
इतर कशानं नाही ओढवलं तरी मराठीचं मरण अशा जड भाषेने ओढवणार हे निश्चित.
आजिबात नाही
In reply to इतर कशानं नाही ओढवलं तरी by प्रचेतस
काहीही हं प्रचेतस!
साक्षात माऊलींनी म्हंटलंय की मराठी भाषा म्हणजे 'अमृतातेही पैजा जिंके'. मग मराठी कसली मरतेय!
उपरोक्त जड भाषा तर कडू जहर आहे. एकदा का अंगवळणी पडलं की काम फत्ते. मग आपण मायमराठीस 'हलाहलेही लीलया ड्रिंके' म्हणून नावाजायला मोकळे.
आ.न.,
-गा.पै.
अगागागा
In reply to इतर कशानं नाही ओढवलं तरी by प्रचेतस
प्रतिसाद वाचुन दम लागला ...कायतरी मारामारी वगैरे चाललेय (ठोस बिस) असे वाटायला लागले.
मला तर असे वाटतेय की, हे वरचे
In reply to अगागागा by राजेंद्र मेहेंदळे
मला तर असे वाटतेय की, हे वरचे प्रतिसाद स्क्रिनवर पाहिल्यामुळेच त्या संगणकाला घेरी येत असावी ! =)) =)) =))
असे करा ..
In reply to इतर कशानं नाही ओढवलं तरी by प्रचेतस
हापिसात ग्रुप मध्ये काही टेंशन असल्यास हा धागा त्यांना दाखीव !
३ जीबी रॅम
बहुधा ३२-बीट ओएस असल्यास ४+ जीबी रॅम ३जिबी अशी डिटेक्ट होते.
बाकी ८ जीबीमध्ये १० एकदम स्मूथ चालते. जित्की जास्त तितकी मस्त!
आता पटकन सांगून टाका
आता पटकन सांगून टाका माहितगारांना की कोणती कळ फिरवून कोणता मंत्र म्हटला की दारे खिडक्या सताड उघडतील ते.
दगडावर पडून वीट झाल्यास उत्तरदायित्वास नकार.
दगडावर पडून वीट झाल्यास
In reply to आता पटकन सांगून टाका by कंजूस
. हे भारी =))
हार्डवेअर/ सॉफ्टवेअर सगळं अपडेट लागतंय बघा पयलं.
खिडकी अधिकृत आहे की अनधिकृत?
विंडोवस १० पेक्षा ७
विंडोवस १० पेक्षा ७ वापरावे
विंडोवस १० पेक्षा ७ वापरावे
In reply to विंडोवस १० पेक्षा ७ by एकुलता एक डॉन
हेच म्हणतो ६४ बीट, मिनीमन ८ जिबी रॅम असायलाच हवे.
अँटी व्हायरस जबाबदारी सुद्धा मासॉच्या डिफेंडरच्याच कृपेवर आहे.
Avast आणि Avira किंवा Bitdefender यांचे चकटफु अॅन्टीव्हायरस आवृत्ती जालावर उपलब्ध आहे ती वापरावी,बेसिक असले तरी चांगली सुरक्षा देतात.
एसएसडी असेल तर डिस्कच्या निर्म्यात्याने जे सॉफ्टवेअर दिले असेल ते वापरुन परफॉर्मन्स ऑप्टीमायझेशन करावे... एसएसडी चा कार्यक्षम कालावधी वापरण्यासाठी काही सेटिंग्स ओएस आणि रजिस्टरीत करावी लागतात, गुगल पंच केल्यास अनेक साइट्स मिळतील.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |
मॅासॅाच्या दुकानात Edgium
मॅासॅाच्या दुकानात Edgium browser ( Edge on Chrome) थोड्याच दिवसांत येणार आहे. तो आल्यावर काही प्रगती होते का पाहावे.
खि. १० ची समस्या
खि. १० ची एक प्रमुख समस्या म्हणजे स्व-अद्ययावतीकरण चा पर्याय अक्षम करता येत नाही. हा पर्याय कधीही चालु होतो व प्रणाली संथ करतो.
अद्ययावताचे स्तंभन
In reply to खि. १० ची समस्या by गोंधळी
त्याकरिता मी हे वापरतो : https://www.thewindowsclub.com/windows-update-blocker
-गा.पै.
एकंदरीत खिडकी १० विरोधात
एकंदरीत खिडकी १० विरोधात "चले जाव" चळवळ करावी लागणार
तुम्ही सर्वे ..
सर्वे पयशावाले दिसताय ! समद्यांच्या खिडक्या पावतीसकट घ्येतल्येल्या ?
हाहाहा !
In reply to तुम्ही सर्वे .. by चौकटराजा
चौकटराजा,
लाख बोललात मालक! :-) विकतचं दुखणं कोण घेणार ! ;-)
गंमत अशीये की जे लोकं विनापावती घेतात त्यांना असले प्रश्न पडंत नसतात. कायद्यानं वागणाऱ्याच्या मागे पोलीस ! किंवा भित्यापाठी ब्रह्मराक्षस !! किंवा खरीदल्या खिडकीची रखडपट्टी !!! सुज्ञास अधिक सांगणे नलगे! ;-)
आ.न.,
-गा.पै.