Skip to main content

फोटो ओळखा 2

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 14/03/2019 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचने 126948
प्रतिक्रिया 263

प्रतिक्रिया

In reply to by नेत्रेश

1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली (श्रीमती इंदिरा गांधी यांचे स्मारक)

In reply to by नेत्रेश

या फोटोत अश्या काय खाणाखुणा आहेत ज्यावरून हे (कु?)प्रसिद्ध ठीकाण ओळखू येईल ?

In reply to by चौथा कोनाडा

रस्त्यावर ज्या ठीकाणी काच लावली आहे तीथे श्रीमती ईंदिरा गांधीना गोळ्या घातल्या होत्या. एकदा हे ठीकाण पाहील्यावर कधी विसरता येईल असे वाटत नाही. Information

In reply to by नेत्रेश

माहितीसाठी धन्यु, नेत्रेश ! महत्वाचे प्रसंग ठिकाण. हे वाचण्यात किंवा पाहण्यात आलेले नव्हते !

In reply to by नेत्रेश

आणि त्या दिलेल्या लॉन्ग शॉटच्या फोटोत ओल्या कॉन्क्रिटचा स्लॅब वाटत होता.

In reply to by प्रचेतस

इकडे प्रतेक्ष कधी गेलो नाही पण हा फोटू बी आधी नक्की पाहिल्याचे आठवते आहे . तुमच्याच कुठल्या तरी जुन्या धाग्यात असणार. थोडा वेळ मिळाला की जुने धागे उचकतो, १०१% याचे उत्तर तिकडेच मिळेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ह्या मंदिरावर अजून लिहिलेले नाही त्यामुळे हा फोटो असण्याची शक्यता कमी आहे. :)

In reply to by प्रचेतस

हे सापडले बालेश्वर मंदिर पेडगाव अहमदनगर https://ahmednagar.nic.in/mr/tourist-place/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%…

In reply to by गोरगावलेकर

वाटते तर तेच आहे पण वल्लींच्या फोटूत नदिच्या जागी हिरवळ दिसते आहे. मला अजुनही वाटते की मी हा फोटो आधि पाहिला आहे कुठे पाहिला ते शोधतोच... पैजारबुवा,

In reply to by गोरगावलेकर

गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर वाटतंय. बरीच तुलना करून पाहिली. ९९.९९ % हेच असणार. @ज्ञा पै, ती हिरवळ म्हणजे नदीतील जलपर्णी असावी.

In reply to by प्रचेतस

https://www.misalpav.com/node/28046 यातला सातवा फोटू ह्योच आहे. म्हटले नव्हते बघितलाय आधी... फक्त आठवत नव्हते.. पैजारबुवा,

In reply to by गोरगावलेकर

ही जागा जवळ आहे गंदी कोटा पासून पण गंदी कोटा नाही. या आहेत बेलम गुफा. भारतीय उपखंडातल्या 2 नंबरच्या लांब आणि मोठ्या गुफा. तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांबी आहे

In reply to by खंडेराव

ठीक आहे. पूर्ण गुण नाहीत पण काठावर पास होण्याइतपत तरी द्याल कि नाही.

In reply to by खंडेराव

ह्या बेलम गुफांशी काही संबंध आहे की नाही हे माहित नाही पण आंध्र-तेलंगणा ग्रामीण भागात एक 'बेलम' नामक मिठाई करतात - फक्त आख्खे काजू, गूळ आणि साजुक तूप एवढेच घटक. दिसायला ओबडधोबड पण स्वर्गीय चव. गुफा बघून मिठाई आठवणारा मी एकटाच असावा जगात :-) अवांतराबद्दल क्षमस्व !

In reply to by अनिंद्य

:) बेल्लम म्हणजे गुळ. तिकडच्या गुळाच्या गोड पदार्थांच्या नावात बरेचदा बेल्लम शब्द असतो.

In reply to by निशाचर

अगदी इंटरेस्टिंग माहिती...मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा सापडले की या गुहांचे नाव शेजारच्या बेलम गावावरून पडले आहे, आणि बेलमचा नक्की गूळ किंवा मिठाईशी संबंध असणार..

In reply to by खंडेराव

बेलम हा शब्द संस्कृत 'बिलं' वरून आलेला आहे. मराठीत बीळ... आंध्रातच ओडिशाच्या सीमेवर अशाच 'बोरा' गुंफा आहेत, बोरा म्हणजे भोक

सापडले ! पण उत्तर सांगत नाही. मुघल सैन्याने कळसाचा भाग नष्ट केला आहे. त्यानंतर मंदिराचे रक्षण व्हावे या हेतूने गर्भगृह चौथऱ्याच्या समपातळीत आणून मंदिराच्या दगडांमधूनच मिनार बांधून मशीद असल्याचा भास निर्माण केला गेला. सर्व बाजूंनी भिंत बांधून मंदिर झाकले गेले.

In reply to by प्रचेतस

डावी कडे राजगड आहे, तर उजवीकडे तोरणा, पाबे घाटातली खिंड पार केली की हे दोघे अचानक समोर येतात पैजारबुवा,

In reply to by चौकटराजा

फोटोला "पब्लिक शेअर" केलेले नाही. तुम्ही गुगलमध्ये लॉगिन केलेले असल्यामुळे तुमच्या अल्बममधील फोटो तुम्हाला दिसतो. इतरांना अ‍ॅक्सेस नसल्याने त्यांना दिसत नाही.

In reply to by चौकटराजा

दिसतोय. ठिकाण नक्की नाही ओळखता येत पण बहुधा फ्रान्स किंवा इटलीमधील कारंजे

In reply to by तुषार काळभोर

सगळी मिपाकर मंडळी मिळून वल्ली सरांची परिक्षा घेतायत कि काय असे वाटतेय....

जामी मस्जिद / होशंग शहाची कबर ....खरे तर मांडवगड चे सगळे महाल/पुरातन अवशेष हे ओरिजिनली राजा भोज कालीन वा नंतर चे हिंदू आणि जैन architecture आहेत...