✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा वर टाईप करताना येणार्‍या अडचणी

व
विजुभाऊ यांनी
Tue, 03/05/2019 - 10:39  ·  लेख
लेख
गेले अनेक दिवस मिपावर मराठी टाईप करताना एक ठरावीक अडचण जाणवतेय म्हणजे आपण काही टाईप केले आणि त्यातले काही जर पोस्ट करण्यापूर्वी एडीट करावेसे वाटले आणि आपण ते बॅकस्पेस वापरून डिलीट केले तर नव्या ने टाईप केलेल्या शब्दात भुताटकी व्हावी तशी डिलीट केलेली अक्षरे दिसायला लागतात.,फायर फॉक्स वापरताना ही अडचण येते उदा : हल्क्फ्ल्स्क्फुदा: हा लिहीण्यापूर्वी मी फायर फॉक्स हा शब्द डिलीट केलेला होता. आता दुसरे उदाहरण या इथे सरकार व्यवस्था हा शब्द लिहून तो ब्याकस्पेस वापरुन डिलीट करतो . आणि त्या नंतर त्या जागी इतिहासाचातास हा शब्द लिहीतो इतिहइतिहास्तिइतिसरकारववस्थाइतिहासाचातास आता हे असे दिसायला लागले आहे. सरळ अक्षर असले तर फर फरक पडत नाही मात्र काना मात्रा वेलांटी असेल (तमातो ) ( हा शब्द तर मात्र हा शब्द खोडून त्या ऐवजी तर तो असा लिहायचा प्रयत्न केला) तर तो जाणवतो. तुम्हाला याअद्डचणी ( या अडचणी हा शब्द अदचणी असा होततेतो दुरूस्त करण्यासाठी बॅकस्पेस ने खोडली होती. ) तुम्हाला या अडचणी येतात का? इतर काही अडचणी असतील तर या धाग्यावर लिहूयात. संपादक मंडळ / तांत्रीक मंडळ याची दखल घेईल. वि.सू. : या धाग्यावर सध्या येणार्‍या तांत्रीक अडचणी याबद्दलच लिहावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28297 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

मलाहीअडाचण येतच आहे.

चौथा कोनाडा
Tue, 03/05/2019 - 12:30 नवीन
मलाहीअडाचण येतच आहे. नुकतीच एका धाग्यावर त्या संबन्धी कमेंट दिली होती. हे क्रोम वापरून टंकले आहे. क्रोम मध्ये पण अश्याच बारिक सारिक अडचणी येत आहेत.
  • Log in or register to post comments

हो हो मलाही हि अडचण येत आहे.

राजाभाउ
Tue, 03/05/2019 - 12:36 नवीन
हो हो मलाही हि अडचण येत आहे. मी क्रोम वापरतो. हि अडचण पूर्वीही आली होती आणि नंतर ते नीट झाल होत, पण ब्राउझर मध्ये काही केलं होत का साईट वर ते आठवत नाही. आत्तासुद्धा बॅकस्पेस दाबावी लागली आणि गोंधळ सुरु झाला शेवटी गूगल इनपुट टूल मध्ये टाइप केले आणि इथं येऊन चोप्या पस्ते केले .
  • Log in or register to post comments

टायपिंग

तुषार काळभोर
Tue, 03/05/2019 - 13:14 नवीन
मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत. कॉम्पुटरच्या क्रोममध्ये बॅकस्पेस दाबल्यावर गंडतं खरं, पण आता बॅकस्पेस दिल्यावर स्पेस देऊन लेफ्ट ऍरो की दाबून परत मागे यायचं याची सवय झालीय. आता टाईप करताना हे आपोआप होतं.
  • Log in or register to post comments

बरोबर.

चौथा कोनाडा
Tue, 03/05/2019 - 17:02 नवीन
मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत.
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

एक उपाय आहे

महेश हतोळकर
Tue, 03/05/2019 - 14:48 नवीन
Back space दाबल्यावर edit boxच्या बाहेर क्लिक करून पुन्हा लिहायला सुरुवात करा.
  • Log in or register to post comments

जर माऊसला हात लावायचा नसेल तर

शाम भागवत
Wed, 03/06/2019 - 12:36 नवीन
जर माऊसला हात लावायचा नसेल तर प्रथम स्पेस द्या मग नेहमीप्रमाणे बॅकस्पेस वगैरे जे काही वापरायचे असेल ते वापरा. थोडक्यात कधीही, कुठेही केव्हाही बॅकस्पेस देण्याअगोदर स्पेस द्यायची सवय करून घ्या असे सुचवावेसे वाटते. मी संगणक तज्ञ नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

झालं , म्हंजे या

चौथा कोनाडा
Wed, 03/06/2019 - 12:41 नवीन
झालं , म्हंजे या दोषांसाठी आपण आपल्या सवयी बदलायच्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:))

शाम भागवत
Wed, 03/06/2019 - 13:48 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली

मराठी कथालेखक
Tue, 03/05/2019 - 15:17 नवीन
ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली असेल तरच येते आहे. मग ब्राऊजर कोणताही असेल तरी येते (फायरफॉक्स, क्रोम, IE) विंडोज १० वर काही अडचण नाहीये.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि

राघव
Fri, 03/08/2019 - 12:38 नवीन
माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि आत्ता सुद्धा मला ही अडचण येते आहे. "आहमाझ्याझ्यादे" हे आत्ता टाईपतांना झालेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

पण प्रथम स्पेसबार व नंतरच

शाम भागवत
Fri, 03/08/2019 - 13:10 नवीन
पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसअसं करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

माझ्याकडे तर गेले काही महिने

लई भारी
Tue, 03/05/2019 - 16:23 नवीन
माझ्याकडे तर गेले काही महिने मिपा चा कीबोर्ड चालतच नाही म्हणून त्यावर एक धागा पण काढला, मग तिथल्या प्रतिसादानुसार क्रोम एक्सटेंशन वापरतोय.
  • Log in or register to post comments

इनस्क्रिप्ट

अभ्या..
Wed, 03/06/2019 - 12:50 नवीन
विजुभाऊ ममाझ्या मते तुम्हाला इनस्क्रिप्ट चांगले येत असणार. इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरल्यास वरील प्रॉब्लेम येत नाही. अवघड अक्षरे आरामसे करता येतात.
  • Log in or register to post comments

स्पीडी टाईपिंगला हा मस्तच.

शाम भागवत
गुरुवार, 03/07/2019 - 13:29 नवीन
स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. (मागे मी असच म्हटल होतं कोणीतरी दुखावल होतं. त्यांचेसाठी) हे माझे वैयक्तिक मत आहे. दुसऱ्यांचा मताचाही आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तसे नाही

अभ्या..
गुरुवार, 03/07/2019 - 15:46 नवीन
सपीडी साठी असे नाही म्हणू शकत भागवत आण्णा, हात बसलेला असेल तर स्पिडी अन्यथा ह्या कीबोर्ड वर हात बसायला वर्ष लागते. आम्हाला ते श्रीलिपी मुळे सवयीचा झालाय इनस्क्रिप्ट. अन्यथा गमभन बराच म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

इन स्क्रिप्टला जोडाक्षरे

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/07/2019 - 16:37 नवीन
इन स्क्रिप्टला जोडाक्षरे कशी टंकायची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने

शाम भागवत
गुरुवार, 03/07/2019 - 20:47 नवीन
खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने बनवलेले जीस्ट वापरायचो. त्यावेळी हात बसला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

पाय मोडायला लागतो. त्यासाठी

शाम भागवत
गुरुवार, 03/07/2019 - 20:52 नवीन
पाय मोडायला लागतो. त्यासाठी डी बटण वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

वा, थान्क्स शामजी !

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/07/2019 - 21:10 नवीन
वा, थान्क्स शामजी ! आता करेन सराव इन्स्क्रिप्टचा ! खुप खुप धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मला ही अडचण येत आहे

धर्मराजमुटके
Wed, 03/06/2019 - 13:08 नवीन
मला ही अडचण येत आहे. मी विन्डोज १०, क्रोम आणी फायरफॉक्स वापरतो आहे. ही अडचण पुर्वी नव्हती येत. आता काही दिवसांपासून यायला लागली आहे.
  • Log in or register to post comments

Same here...and more too

रविकिरण फडके
Wed, 03/06/2019 - 14:08 नवीन
I too have been facing this problem - for the past several months. The bigger problem however is; English-Marathi transliteration stopped working. That's why I am typing this response in English. This constraint deters me from giving a response because I have to use Google facility, type whatever I want to say, copy-paste it here, format the text if I need to, and then publish. All that is a big hassle. I wrote about it and was given some suggestions by the members as well as by Neelkant but none of those helped. I have accepted this as inevitable and have been living with it.
  • Log in or register to post comments

रविकिरण साहेब

विजुभाऊ
गुरुवार, 03/07/2019 - 09:26 नवीन
रविकिरण साहेब पूर्वी येथे कंट्रोल की + \ हे वापरले की इंग्रजी मराठी लिपीचा बदल व्हायचा. आता तो तसा होत नाहिय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

Windows 10 मध्ये अजूनही होतो

मराठी कथालेखक
गुरुवार, 03/07/2019 - 12:13 नवीन
Windows 10 मध्ये अजूनही होतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हो.

शाम भागवत
गुरुवार, 03/07/2019 - 12:47 नवीन
हो. पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो. मग तुम्ही दुरूस्त्या वाक्याच्या शेवटी, मधे किंवा सुरवातीला करा. जोडाक्षरे टाईप करताना त्याच्या मध्यावरसुध्दा हा उपाय लागू होतो. यश मिळतच. इंग्रजी टाईप करताना प्रत्येक अक्षर म्हणजे एक बाईट किंवा आठ बिटस् असते. युनिकोड हे चार बाईटस किंवा बत्तीस बीटस् असते. जेव्हा आपण इंग्रजी अक्षर खोडण्यासाठी बॅकस्पेस वापरतो तेव्हा अख्खा बाईट खोडला जातो. या उलट मराठी खोडताना आपण जरी एक अक्षर खोडत असलो व पडद्यावर जरी ते खोडले जात असताना दिसत असले तरी प्रत्येक वेळेस चारही बाईटस खोडले जातीलच असे नाही. मराठी अक्षर टाइप करताना युनिकोड व्हॅल्यू बदलणे शक्य असते. जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांट्या देण्यामुळे असे होत असते. इग्रजी टाईप करताना मात्र ते अक्षर वन्स फाॅर आॅल असे टाईप होते. जेव्हा आपण स्पेसबार मारतो तेव्हा अगोदरच्या मराठी अक्षराची युनिकोड व्हॅल्यू निश्चीत होते त्यामुळे नंतर बॅकस्पेस मारल्यावर अख्खे अक्षर खोडले जाते. थोडक्यात हा आॅपरेटिंग सिस्टिमचा प्रश्न नसून युनिकोड संबंधीत आहे. हा माझा अनुभवावर आधारित तर्क आहे. कोणत्याही तज्ञाकडून ऐकलेले नाही. आणि मी स्वत: तज्ञ नाही. हेवेसान. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

माझा अनुभव.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 03/07/2019 - 15:18 नवीन
माझा अनुभव. हा प्रकार माझ्याबाबतीतही होत आहे. पण मला वाटते हा प्रकार जी कुठली प्रणाली मराठी टायपिंगसाठी मिपा वापरते आहे त्यात असावा. माझ्याकडे श्रीलिपी ७ आहे. कारण मला पुस्तकासाठी ते लागते. त्यात जर मी युनिकोड हा फाँट घेतला, मिपावर इंग्रजी हे निवडले तर मला काहीही अडचण येत नाही.... मी तज्ञ नाही फक्त एक निरिक्षण व तर्क..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

पण पूर्वी ही अडचण अजिबात येत

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 03/07/2019 - 15:20 नवीन
पण पूर्वी ही अडचण अजिबात येत नव्हती हेही खरेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

पण प्रथम स्पेसबार व नंतरच

राजाभाउ
Fri, 03/08/2019 - 09:21 नवीन
पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो.
हे बरोबर चालतय!!! धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हो अडचण येत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/06/2019 - 14:15 नवीन
फायरफॉक्सात अशी अडचण येत आहे असे वाटते. आपण पुढे शब्द टंकत जातो आणि मागे काहीच्या काही शब्द उमटत जातात. पण हेही कधीतरी होतं असं वाटतं. खफवर येते की प्रतिसाद लिहितांना येते हे काही समजत नाही. अ‍ॅटो गडबड होते असे वाटते. संबंधितांनी लक्ष घालावे असे वाटते. मिपा संस्थळ खासगी आहे, हे मान्य. पण सदस्यांच्या सुविधेकडेही लक्ष दिलं पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वोक्विक्व

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/06/2019 - 14:19 नवीन
विजुअभभौभभभभव विजुभौ असं टायपलं तर पाहा.... सुरुवातीचा शब्द. पण काही तरी घोळ आहे. आपण परत मागे शब्द टंकायला गेलो की काहीही उमटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सेम हियर ,

चंबा मुतनाळ
गुरुवार, 03/07/2019 - 06:17 नवीन
सेम हियर , सफारी वापरताना पण हाच त्रास होतो
  • Log in or register to post comments

सफरचंदाची प्रॉडक्ट्स वापरूच नका!

mayu4u
गुरुवार, 03/07/2019 - 14:11 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ

माझा गंभीर प्रतिसाद ! )))

चौकटराजा
गुरुवार, 03/07/2019 - 17:21 नवीन
कलियुग आहे ! पापं वाढलीत !
  • Log in or register to post comments

असं कसं ?

मराठी कथालेखक
Fri, 03/08/2019 - 15:08 नवीन
सध्या तर मोदी सरकार आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

या धाग्यावरपण मोदी आले का?

शाम भागवत
Fri, 03/08/2019 - 15:15 नवीन
या धाग्यावरपण मोदी आले का? हम्म्. कठीणेय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

ठेविले अनंते तैसेची राहावे

रविकिरण फडके
गुरुवार, 03/07/2019 - 18:10 नवीन
मी Google Chrome वापरीत होतो आणि अजूनही वापरतो. एकूण काय, आहे ही परिस्थिती स्वीकारण्यावाचून अन्य काही पर्याय नाही असे दिसते. ठीक आहे!
  • Log in or register to post comments

विजुभाऊ, फायरफॉक्स अपडेट केलं का?

मिसळपाव
गुरुवार, 03/07/2019 - 21:36 नवीन
फायरफॉक्स - ६५ वर ही कटकट व्हायला लागली. परत ५६ वर आणल्यावर सगळं पूर्वीसारखं चालायला लागलं - कंट्रोल+\ ने english <-> मराठी हा बदल सुद्धा. पण ६५ वरनं ५६ ला जाणे हा नाईलाज झाला, ईलाज नव्हे !!
  • Log in or register to post comments

नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट

कंजूस
Fri, 03/08/2019 - 09:40 नवीन
नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं.
  • Log in or register to post comments

नोट अ‍ॅप मध्ये लिहून

चौथा कोनाडा
Fri, 03/08/2019 - 12:30 नवीन
नोट अ‍ॅप मध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं. सध्या त्यावरच भागवून घेतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे

धर्मराजमुटके
Fri, 03/08/2019 - 13:36 नवीन
सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे टंकाळ्यात भर पडते. राजकीय धाग्यांवर लोक्स एवढे काय टायपतात ते राहूलजी / मोदीजी जाणे.
  • Log in or register to post comments

:)

शाम भागवत
Fri, 03/08/2019 - 13:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

;-)

झेन
Fri, 03/08/2019 - 18:48 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा

बांवरे
Sat, 03/09/2019 - 06:33 नवीन
बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा मग परत शब्द लिहून पहा. तसे होणार नाही !
  • Log in or register to post comments

माझे मत

सौन्दर्य
Sat, 03/09/2019 - 07:05 नवीन
माझ्याकडे विंडोज १० आहे तसेच गुगल ट्रान्सलिटीरेट देखील डाऊनलोड केले आहे. मिपावर मराठीत लिहायचा पर्याय निवडला आहे. मला लिहिताना किंवा दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
  • Log in or register to post comments

मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर

कंजूस
Sat, 03/09/2019 - 10:50 नवीन
मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर साइट्स) कुठेही टेक्स्ट बॅाक्स उघडून टाइप करत बसण्यापेक्षा इतर ओफलाइन नोट वापरणे हेच उत्तम. हे (बस/ रेल्वे) प्रवासातही उपयोगी पडते. मोठे स्टेशन आले, रेंज आली की ढकलायचे पटकन.
  • Log in or register to post comments

:-)

चौथा कोनाडा
Sun, 03/10/2019 - 20:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मिपामधे

उपयोजक
Sun, 03/10/2019 - 18:37 नवीन
तांत्रिक सुधारणा कधी होणार? मिपा हा उपक्रम मोफत आहे.फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत हे मान्य.पण हे बरीच वर्षे सुरु आहे.या तांत्रिक दुर्बलतेमुळे वाचक वाढले पण लेखक कमी झालेत.फेसबुकवर वाढलेत.
  • Log in or register to post comments

मोफत का?

रविकिरण फडके
Sun, 03/10/2019 - 20:34 नवीन
पण हा उपक्रम मोफत का असावा? ह्याच्या सभासदत्वासाठी ५०० रुपये वार्षिक (रक्कम मालक/ संपादक मंडळ ठरवील ती) अशी फी का ठेवू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

आयडिया चांगली आहे.

चौथा कोनाडा
Sun, 03/10/2019 - 20:40 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

आयडिया चांगली आहे.

चौथा कोनाडा
Sun, 03/10/2019 - 20:41 नवीन
आयडिया चांगली आहे. याच सभासद फी मध्ये मिपा तर्फे वर्षाला १२ मिपाकट्टे फ्री कॉम्प्लिमेंटरी दिल्यास जबरा।प्रतिसाद लाभेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

किंवा मिपाला जाहिराती मिळू

मराठी कथालेखक
Sun, 03/10/2019 - 23:25 नवीन
किंवा मिपाला जाहिराती मिळू शकतील का ? जाहिरातींच्या उत्पन्नचा मिपाने विचार केला नाही का अजून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा