नमस्कार खवय्यांनो,
ही आहे कानडी पद्धतीची मिश्र भाजी. कानडी लोक या भाजीला सागु म्हणतात.
साहित्यः-
१ वाटी फरसबी
१ वाटी मोठे चिरलेले गाजराचे तुकडे
अर्धी वाटी मटार
अर्धी वाटी फ्लॉवरचे तुरे
१ बटाटा चौकोनी चिरून
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
३ मोठे चमचे खोबरं
३-४ लवंगा
१ तुकडा दालचिनी
१ लहान चमचा भाजलेली खसखस
१०-१२ काजू
३-४ हिरव्या मिरच्या
१ लहान चमचा प्रत्येकी धने-जिरे
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग,हळद.
कृती-
प्रथम फरसबी, गाजराचे तुकडे, मटार, फ्लॉवर, बटाटा या भाज्या धुवून घ्याव्यात. कुकरमधून २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्याव्यात.
एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, खोबरे, लवंग, दालचिनी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, धने, जिरे, काजू, खसखस असे एकत्र करून, थोडे पाणी घालून मऊ मुलायम पेस्ट करून घ्यावी. शिजलेल्या भाजीत ही पेस्ट घालून ढवळून घ्यावे. भाजी फार घट्ट वाटल्यास गरजेनुसार अर्धी वाटी पाणी घालावे. त्यानंतर यात मीठ, साखर घालावे.
एका कढल्यात २ चमचे तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. आणि भाजीवर ही फोडणी घालावी.
भाजीला एक उकळी येऊ द्यावी.
पुर्या/पराठे/पोळी/भात कशाहीबरोबर ही भाजी गरम गरम वाढावी. :)
ही भाजी अतिशय पटकन होते आणि चविष्टही लागते !!
--शाल्मली.

वाचने
5789
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
लज्जतदारच
सेट डोसा आणि सागु
सेट
In reply to सेट डोसा आणि सागु by स्मिता श्रीपाद
हम्म !!
क्या बात है ...
माझी आवडती
अरे वा! छान
खमंग!
फोटो आणि
कर्नाटकी कुर्मा
मस्तच.
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान!!!
प्रतिक्रि
In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते
:)
In reply to प्रतिक्रि by शाल्मली
सगळेच पदार्थ मिपावर टाकलेले नाहीत...
In reply to प्रतिक्रि by शाल्मली
चमचमीत...
प्रतिसादा
In reply to चमचमीत... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to प्रतिसादा by शाल्मली
मिरच्या
मस्त..
स्फूर्ती घेऊन वेगळीच भाजी
बाद्यान..
In reply to स्फूर्ती घेऊन वेगळीच भाजी by धनंजय