Skip to main content

[शशक' १९] - स्ट्रेट ?

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 17/02/2019 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणीमध्ये बाकावर बसून तो जीनीच्या साडी नेसण्याच्या धडपडीकडे बघत तिला न्याहाळत होता... "जीनी... आपण पुन्हा भेटणार ना?" "नाही...." "काल पहिल्यांदयाच भेटलेल्या मला... तू तुझं सर्वस्व दिलंस मग आता का लाजतेस?" तिने फक्त जालीम कटाक्ष टाकला आणि आपली बॅग आवरायला लागली "बोल ना...! का नाही भेटू शकत आपण? भावनिक न गुंतता आपण संबंध ठेऊ शकतोच, जसं आज...." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने त्याचे बोलणे तोडले. "आज..... आज मला फक्त सहा महिन्यापूर्वी झालेल्या शश्त्रक्रियेनंतरचा माझा "परफॉर्मन्स" बघायचा होता, म्हणून मी........." "शश्त्रक्रिया...!! कसली शश्त्रक्रिया?" जीनीने आपली बॅग उचलली... दार बाजूला सरकवून पाऊल बाहेर टाकत म्हणाली.... "जॉनी चा जीनी होण्याची!!!"

वाचने 29147
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

आईशप्पत, कसला खतरनाक शेवट, पैजारबुवा,

ठीक आहे , दोन तीन स्ट्रेट जवळून बघितले आहेत आणि अजूनही बघत आहे .. एकतर भारीच आहे , कुणीच ओळखू शकणार नाही . तो जेव्हा सायकल चालवतो तेव्हा हे मोठे मोठे..... , डोळे करून आम्ही बघत बसतो . पण त्याचा पूर्वीचा चेहरा आठवला कि गळपटून जातो