Skip to main content

सर्जीकल स्ट्राईक रिटर्न

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 26/02/2019 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रू सीमेच्या आत येईपर्यंत गाफील राहणे हे भारतीय इतिहासाचे व्यवच्छेदक लक्षण. (अर्थात यास नक्कीच सन्माननीय अपवाद आहेत) आमचा आदर्श हनुमानाचा. पण तोही समुद्राकाठी आपली शक्ती विसरून हतबल झालेला. वरून आदर्शवादाची पांघरलेली फाटकी चादर फारच उठून दिसायची. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा आमचा सत्य अहिंसा दया करूणाचा अर्थ. कोट्यावधींची शस्त्रे विकत घेऊन ती केवळ पुजत ठेवुन कुजवण्यातच आम्हा कोण आनंद! पुर्वी सागरी सिमा अोलांडल्या की पाप समजले जायचे. नंतर काही युद्धातही सीमा न अोलांडून आपण कोण मर्यादा राखली होती. या प्रतिमेला छेद देणारी आजची घटना आहे. काहींना हे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे पण अशा गोष्टींचे उदात्तीकरण व्हायलाच हवे. यावेळसा स्ट्राईक सर्वार्धाने वेगळा होता. यावेळेस पाकिस्तानला पुर्ण कल्पना होती की असे काही होणार आहे. थोडक्यात पाकिस्तान अलर्टवर असूनही आपण हा हल्ला साधारण २० मिनिटात करून दाखवला आहे. या हल्यात भारतीय वायुसेनेने इंटरनॅशनल बॉर्डर पार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. म्हणजे पी.अो.के च्याही पलीलडे जावून पाकिस्तानात हल्ला झाला आहे. कदाचित आधीच्या बैठकीत याची कल्पना इतर देशांना देण्यात आली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विमाने सुखरूप परत आणणे. यातही आपली जागतिक प्रतिमा जपताना कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. गुप्त माहिती मिळवणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांना एकत्र काम करणे अर्थात आवश्यक असते. विभागातील समन्वय यावेळी अजून उठून दिसत आहे. वायूसेना ही बंद केलेल्या जिनीसारखी होती असे माझे ब-याच दिवसापासुन मत होते. या जिनला बाहेर काढले आणि त्याने दिलेले काम चोख केले. विषारी झाडाची आपण केवळ एक फांदी तोडली आहे ह्याचे मात्र भान हरपता कामा नये. संपूर्ण झाड कधी उपटून निघेल हे बघणे अौत्युक्याचे ठरेल. सद्ध्या पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार एवढेच आपण ठामपणे सांगू शकतो.

वाचने 42774
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

  १. पाकिस्तानी मेडिया, राजस्थानातील जुन्या मिग क्रॅशचे फोटो देऊन, फेक बातम्या देत आहे. १००% खात्रीसाठी विमानाच्या शेपटीवरचे विमान क्रमांक पहा. २. या कारवाईत भारताने सु-३० व मिग २१ बायसन विमाने वापरली होती. त्यातील मिग २१ बायसनने पाकिस्तानी एफ१६ पाडले. नेहमीप्रमाणेच, पाकी फेकन्युज फॅकरीने शॉडी जॉब केला आहे. जाधव प्रकरणात फेक फोटो/व्हिडिओ वापरल्याचे आठवत असेलच. तसेच खुद्द युनो मध्ये पाकिस्तानी प्रतिनिधी मलिहा काश्मीरमधल्या मुलांवर होणार्‍या अत्याचारांबद्दल बोलताना पॅलेस्टाईनमधील मुलीचा फोटो दाखवून सर्व जगासमोर तोंडावर पडली होती. :) थोड्या वेळापूर्वीच मेजर जनरल स्तराच्या पाकिस्तानी सैन्य अधिकारी प्रवक्त्याने, "आम्ही भारताचे एकही विमान पाडलेले नाही" असे स्पष्ट सांगितले आहे आणि पाकिस्तानी मेडियाला बहुतेक, अश्या बातम्यांचा फायदा घेऊन, भारतिय वायूदल अजून हल्ले करेल, अशी भिती वाटली असावी. :) कारण, पाकिस्तानने, त्यांचे एक विमान पाडल्यावरही "आम्हाला एस्कॅलेशन करायची इच्छा नाही" असे स्वतःहून जाहीर केले आहे. मुख्य म्हणजे, सतत जप चालणार्‍या अणूबाँबमधील अ सुद्धा उच्चारला गेला नाही ! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरची चित्रे फेक बातमी आहेतच पण, आताच झालेल्या संरक्षण खाते व विमानदलाच्या प्रेस ब्रिफिंगच्या प्रमाणे... पाकिस्तानच्या एफ१६ विमानाला पाडण्याच्या कारवाईत भारताचे एक मिग२१ विमान पडले आहे आणि त्याच्या वैमानिकाचा शोध चालू आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतत जप चालणार्‍या अणूबाँबमधील अ सुद्धा उच्चारला गेला नाही ! ह्याच कारण त्यांच्या कडचे अणु बॉंम्ब हे मिनीएचर बॉंम्ब आहेत ! सेंट्रिफुज पद्धतीने युरेनियम वेगळे करण्याची पद्धत लॅब मध्ये वापरली जाते ! त्या प्रोसेसचा यील्डही कमी असतो !! शुद्ध युरेनियम खुप कमी प्रमाणात हाती येत ! अश्या युरेनियम पासुन त्यांनी (पाकिस्तानने) लहान Intensity चे बॉंम्ब बनवले आहे जे युद्ध क्षेत्रात वापरता येउ शकतात पण डीटरेंस म्हणुन हुशार शत्रुसमोर चालणार नाही ! मोदी अगोदरपर्यंत त्यांच्या अणु बॉंम्बची भिती सरकारला होती !

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान भारताने पाडले. मात्र, पाकिस्तानने सुरुवातीला दावा केला होता की, आम्ही भारताची दोन विमान पाडली असून एका वैमानिकाला अटक केली. आता हा पाकने केलेला दावा स्वतःच खोटा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भारताचे एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आले. तर दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमध्ये पाडले. तर भारतीय हवाई दलाच्या एका वैमानिकाला अटक केली आहे. तर त्यानंतर आणखी एक ट्वीट करत पाकचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी बडगाममध्ये कोसळलेल्या विमानाशी आमचा कसलाही संबंध नाही. आम्ही ते पाडलेले नाही, अशी कबुली दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची विमाने पिटाळून लावली. तसेच नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे.

हे तासाभरापुर्वीचे. पकडलेल्या भारतिय वैमानिकाचे नाव- अभिनंदन वर्तमान- https://www.youtube.com/watch?v=rJV0dVhl_Y8

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारतिय वैमानिक- अभिनंदन वर्तमान ह्यास पाकिस्तानात पकडले. https://www.youtube.com/watch?v=O7_tvE83Sxw

In reply to by यशोधरा

बातम्यानुसार त्या पायलटला जिनिव्हा करारानुसार केवळ आपले नाव , हुद्दा , युनिट नंबर सांगणे बंधनकारक आहे. या शिवाय पाक त्यांन अजून माहिती विचारु शकत नाही. पायलटला योग्य त्या मेडिकल सुविधा देणेही अपेक्षित आहे अर्थात पडद्याआड काय होईल हे सांगता येणार नाही. पण अॉन ड्यूडी असलेल्या पायलटला पाक त्रास देवू शकला तरी एका मर्यादेबाहेर जावू शकणार नाही.

In reply to by शब्दानुज

पण युद्ध बंदी असलेल्या सैनिकाला परत त्याच्या देशाच्या ताब्यात देणे बंधनकारक आहे की नाही? त्यासाठी काही राजकीय किंवा diplomatic दबाव आणता येईल की नाही?

आज पाकने केलेला हल्ला हा भारताच्या मिलिटरी कॅंपच्या जवळ (?) करण्यात आला आहे. ह्यास भारत युद्धाची चिथावणी मानण्यास पुरेशी जागा आहे. कदाचित पाककडून नसली तरी भारताकडून युद्धाची घोषणा होवु शकण्याची चिन्हे आहेत. एकूण गंभीर मामला आहे एवढे खरे.

लोकहो, हा मोदींचा चुनावी जुमला (= निवडणुकीच्या वल्गना) आहे हे नक्की. दोनंच दिवस अगोदर 'मोदी है तो मुमकिन है' ही घोषणा हवेत सोडून दिली ती निवडणूक ज्वर माजवायलाच ना? मात्र गंमत अशी की या चुनावी जुमल्यात दहशतवादी बळी गेले आहेत. दर वेळेस राजकीय पक्षांच्या चुनावी जुमल्यात भारतीय जनतेचं नुकसान व्हायचं. पण या वेळेस उलट घडलंय. मोदींनी असेच अनेक उत्तमोत्तम चुनावी जुमले सादर करावेत ही इच्छा. बाकी, पाकिस्तानची लायकी तरी काय आहे? भारतात निवडणुका आल्या की त्यांची टरकली पाहिजे. पाकी सैन्यप्रमुख सत्तेस धोका उत्पन्न झाला की भारताची आगळीक काढायचे. त्याच्या बरोबर उलटा प्रकार घडायला पाहिजे ना? मग मोदींना मत द्याच. आ.न., -गा.पै.

सध्या या पकडल्या गेलेल्या पायलटचे काही व्हिडीओ व्हॉट्सअपवर फिरत आहेत. या वैमानिकाला जीवंत पकडल्यानंतर तिथली पाकिस्तानी जनता, त्याला बेदम चोपताना हया व्हिडीओत दिसत आहे व नंतर त्याला पाकिस्तानी आर्मीकडे सोपवताना देखिल दिसत आहे. पाकिस्तानी आर्मीने त्याचे, आतापर्यंत काय हाल केले असतील हे देवजाणे ! -- मारहाणीचा हा व्हिडीओ पाहताना मलाच कसे तरी वाटत होते, तर तो व्हिडीओ पाहून त्याच्या कुटुंबियांचे काय हाल होतील ह्याची कल्पनाच करवत नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

पायलटच्या कुटुंबीयांच्या मनस्थितीचा विचार करून हा आणि असले व्हिडिओ इथे तिथे ढकलू नये असे वायूसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे, असे वाचले.

In reply to by प्रसाद_१९८२



कारवायांत भाग घेणार्‍या कोणत्याही व्यक्तीचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करू नये.

त्यांची ओळख प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो.




आपल्याकडे पाकिस्तानी एफ १६ विमानांना टक्कर देऊ शकणारी सुखोई विमाने असताना , मिग २१ सारखी ४०-५० वर्षे जुनी विमाने कालच्या ऐरियल डॉग फाईटसाठी वायुसेनेच्या पायलट्सना का देण्यात आली ?

In reply to by प्रसाद_१९८२

सहमत आहे, मिग २१ या "उडत्या शवपेट्या" आहेत असे वाचल्याचे आठवतेय. नियमित सरावासाठी उड्डाण केलेले मिग २१ दुर्घटनाग्रस्त झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत आणि हवाई दलाला त्यामुळे कितीतरी पायलट्स गमवावे लागले आहेत.

In reply to by प्रसाद_१९८२

भारतीय हद्दीत शिरणाऱ्या पाकी विमानांच सैन्याचा बिग्रेड मुख्यालयावर हल्ला करण्याचा इरादा असल्याचे लक्षात आल्याने, सुखोई विमाने तेथे पोहोचेपर्यंततरी त्यांना तात्काळ थोपवणे आवश्यक होते. यासाठी जवळचा तळ श्रीनगर होता व त्या तळावर मिग२१ असल्याने दोन विमानांवर ही जबाबदारी सोपवली गेली. त्याप्रमाणे ती विमाने तेथे वेळेत पोहोचलीही. इतकेच नव्हे तर त्यवर बसवलेल्या आर७३ या मिसाईलने एक एफ१६ पाडलेसुद्दा!!!!!! खरच हे आश्चर्यकारक आहे. समोरची विमाने अत्याधुनिक आहेत हे माहीत असूनही त्यावर चाल करून जाणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. व त्यांना हल्ला करण्यापासून परतावणे हेही विलक्षणच. आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे

In reply to by शाम भागवत

आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे भारतीय संरक्षणदल कोणत्या परिस्थीतीत काम करत हे लोकांच्या कधीच लक्षात येणार नाही. त्यामुळे युद्ध क्षेत्रात आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे ठरते. मिग -२१ सारखी अति जुनी विमाने अजुन चालु स्थीतीत ठेवणे हे एक दिव्यच आहे . काही वर्षांपुर्वी (२००५ - ०६ ) ओमान मधिल सर्विस मधुन रिटायर केलेली जॅग्वार विमान बघण्यासाठी वायुदलाचे लोक ओमान मध्ये आलेले होते. गपचुप विमानांच निरीक्षण करुन ते निघुन गेले , नंतर नौदलातील मित्राशी बोलताना हा विषय निघाला तेंव्हा तो म्हणाला की आपल्या कडची जॅग्वार विमाने चालवण्याच्या कंडीशन मध्ये ठेवण्यासाठी हे लोक ओमान व ईतर देशांतुन रिटायर केलेली विमाने घेऊन भारतात जातात तिथे त्यातले चांगले पार्ट काढुन आपली विमाने कंडीशन मध्ये आणतात. त्यावेळेला युपिए सरकारने संरक्षण दलाला अनाथ करुन टाकलेल.

ही विमाने 1963 पासून भारतात सराव करण्यासाठी वापरली जात आहेत, 1200 मीग ( शवपेटी ) पैकी 283 दुर्घटनाग्रस्त झाले आहेत , आणि त्यात 100 पायलट्स मृत्युमुखी पडले आहेत https://en.m.wikipedia.org/wiki/2002_Jalandhar_MiG-21_crash

खर म्हणजे पुलवामा हत्याकांड नंतर ज्या प्रकारे मा .मोदींची देहबोली , वक्तव्य होती त्या वरुन मा .मोदीं अतेरिकयाना धड़ा शिकवणार याची खात्री होतीच . झाले ही तसेच 12 मिराज विमानानीं पाकिस्तान मध्ये जावून अतेरिकयाचें तळ उध्वस्त केले व सुखरूप सगळी विमाने परत आली . इथ पर्यंत सगळ ठीक होते !!!!!!! भारतीय 12 मिराज विमानानीं पाकिस्तान मध्ये खोलवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान चवताळून प्रतिहल्ला करण्याची शक्यता गृहित धरून भारतीय हवाई दल आणि सरकारी पातळीवर पूर्वतयारी कमी पडली अस सारख वाटतंय !! पाकिस्तानी एफ 16 च्या प्रतिकारासाठी 50 वर्षांपूर्वीची मीग 21 नक्कीच योग्य नव्हती , आपली दोन मीग पाडली गेली त्यातील एक पायलट पाकिस्तान च्या ताब्यात असल्या मुळे मिराज हल्ल्यामुळे निर्माण पाकिस्तान वरील दबदबा नाहीसा झाला आणि आता त्या पायलट साठी वाटाघाटी करत बसण्याची वेळ भारतावर आली आहे . प्रश्न असा उपस्थित होतो की संभाव्य हल्ला गृहित धरून सुखोई विमाने अगोदरच तैनात का केली गेली नाही ? मला लष्करीदृष्ट्या , व्यूहरचनात्मक वैगेरे ज्यास्त समजत नाही पण मीग प्रकरणात काही तरी चुकले आहे असच वाटतंय . जाणकार काही प्रकाश टाकतील का ?

In reply to by ट्रम्प

हे काहि अत्याधुनिक प्लेन नाहिये, अर्थात ते मिग पेक्शा जरुर ताकदवान आहे. पण जेव्हा डॉगफाइट होते, तेव्हा सगळं काही वैमानिकाच्या स्किल्स्वर असत. इथ डॉग फाईट झालेली आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. जाता जाता: एक अजुन मतप्रवाह असाही आहे, की एफ १६ अन जे एफ १७ हे पाकीस्तानी वायुदलाचे स्ट्राईक प्लेन्स आहेत. पण ते फक्त डिफेन्स करता वापरायचे ह्या मुख्य अटीवर अमेरिकेने त्यांना दिलेले. आजची प्रेस कॉन्फरंस बघतांना ज्या पद्धतीने पाकिस्तानी हल्ला हा अग्रेसिव्ह प्रकारात मोडणारा हल्ला होता अन सोबत एफ १६ चे अवशेष अन त्याच्या खास क्षेपणास्त्राचा दिलेला पुरावा बघता, मिग १६ हे प्यादे म्हणुन एक तरी एफ १६ पाडता याव ह्यासाठी केला गेलेला जुगार असु शकतो. दुर्दैवाने अभिनंदन ह्याचे मिग पडले अन ते तिकडे पकडल्या गेले, पण एफ १६ चे पुरावे आपल्या हातात आले. कराराचा भंग झालाय हे ट्रंपकाकांपर्यतपोचला असेलच. आता अमेरिका काय स्टँड घेते ते बघायला हवे. जर अपेक्षीत परीणाम साधला गेला तर एफ १६ वापरु नये असा अमेरिकेचा दबाव वाढला तर मेजर कॉन्फ्लिक्टमध्ये आपलाच फायदा होइल ;) (असो सध्यातरी ही एक कॉन्स्पिरसी थेअरिच आहे)

In reply to by ट्रम्प

आंतरराष्ट्रीय डिफेन्स मासिकाच्या साईटवर वाचलं की फक्त मिग 21 नाही तर 4 सुखोई 2 मिराज अन 2 मिग 21 होते! त्यात अभिनंदन ह्यांनी लीड घेऊन हल्ला केला. http://tass.com/world/1046940

गेल्या दोनेक दिवसात झालेल्या भारत - पाक हवाई घमासानात सरफेस टू एअर मिसाईल च्या प्रतिस्पर्धी विमान विरोधी वापराचे काही ऐकण्यात आले नाही. डॉ. खरे आणि जाणकारांकडून या बद्दल अधिक समजून घेणे आवडेल.

F १६ मिग कडून पाडले जाणे अमेरिकन सरकार ला अजिबात चालणार नाही. त्यात अमेरिकन सरकारची नाचक्की आहे.

कायप्पा वर आलेला हा लेख , छान वाटला म्हणून टाकला !!!! ..... मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी.... ... कोणत्याही क्षणी चीन चा घास बनू शकणारा भारत मान्यवर मोदी यांनी किती मजबूत केला आहे हे अभ्यासण्या सारखे आहे. हा अभ्यास करतांना आम्हाला अन्न, वस्र,निवारा, कमि कामात अधिक पैसा देणारी नोकरी, भाजी-मिरची आणायला गाडी नेता येत नाही कारण महाग पेट्रोल-डिझेल, नंबर दोन करून पैसा दामदुप्पट करता येत नाही, इ. कारणे बाजूला सारून विचार करावा लागेल कारण पुन्हा एकदा पारतंत्र्य आले की कल्पांती ही सुटका नाही. कांग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, ह्यांना अस्तित्व टिकवून राहण्याशिवाय इतर कशातच इंटरेस्ट नव्हता आणि नाही सुद्धा. आज सर्व विरोधक चीन व पाकिस्तानशी उघड उघड जवळीक करत आहेत हे काय दर्शवते? चीनचा भारताला बरीच वर्षे धोका आहे. एकदा युद्ध झाले आहे आणि गेली काही वर्षे चीन फार आक्रमक झाला आहे.भारताच्या बाजूचे छोटे देश हे परंपरेने भारताकडे मदतीसाठी पाहत असतात. पण UPA च्या काळांत सरकारने ह्या देशांशी काहीही संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे नेपाळ, म्यांमार,श्रीलंकेसारखे देश चीनकडे वळले होते. चीनने भारताच्या सरहद्दीवर पक्के रस्ते बांधले, रेल्वे सरहद्दीजवळ आणून ठेवली. विमानांचे बरेच ताफे सरहद्दीवर आणून ठेवले. सीमेवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सैन्य आणून ठेवले.पण ,भारताची मात्र तशी तयारी नव्हती.नेहरूंचे चीनविषयीचे धोरण पूर्ण फसले होते आणि चीनने भारताचा पराभव केला होता.पण त्यापासून राज्यकर्ते काही फारसे शिकले नव्हते.वाजपेयी सरकारने काही पावले उचलली होती. . मॉरिशसच्या जवळ एक बेट विकत घेऊन त्यावर सैन्य तळ उभा केला. कझाकिस्तान मध्ये एक सैन्य तळ उभा केला. अंदमान निकोबार वर लक्ष्य देऊन तिकडे सैन्य तळ मजबूत केला. वाजपेयी सरकार जाऊन मनमोहन सिंगचे सरकार आले आणि परत दिशा हरवली. चीनने श्रीलंकेमध्ये २ बंदरे विकसित करायला सुरवात केली . नेपाळमध्ये चीनच्या विचारांचे सरकार आणले. बांगलादेश,भूतान वर दडपण आणायला सुरवात केली. चीनने भारताच्या सरहद्दी पर्यंत रेल्वे आणली. ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधले. मनमोहन सिंगच्या सरकारांनी काहीही कृती केली नाही.चीनने पाकमध्ये ग्वादार बंदर विकसित करायला सुरवात केली. समुद्रात कृत्रिम तळ उभे करून भारताला धमकी द्यायला सुरवात केली. पण तरीही भारत सरकार गप्प बसून राहिले. इतका निर्लज्जपणा होता की चीन "धरण" बांधत आहे हे भारताचे सरकार नाकारत राहिले आणि देशाला खोटी माहिती देत राहिले. मोदी सत्तेवर आले तेव्हा परिस्थिती खूपच बिकट होती.नेपाळ,बांगलादेश,लंका हे देश चीनच्या गळाला लागले होते.. चीन, पाकिस्तान मध्ये 'चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' (cpec )ह्या नावाने एक रस्ता विकसित करत आहे. ह्या रस्त्यामुळे बलोचिस्तान मधील ग्वादार बंदर काश्मीरमार्गे चीनला जोडले जाणार आहे. श्रीलंकेची २ बंदरे चीनने विकास करण्यासाठी ताब्यात घेतली होती. नेपाळ,बांगलादेश, म्यानमार,श्रीलंका,पाकिस्तान हे सर्व देश चीनच्या बाजूनी होते आणि भारत वेढला गेला होता. त्याच वेळेला चीनने साऊथ चीन समुद्रात कृत्रिम बंदरे तयार केली आणि भारताला त्या भागात व्यापार करायला मनाई केली. ह्या घडामोडी पाहून सैन्यातील जाणकारांना समजत होते की चीन भारताशी मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. पण भारताकडे पुरेसा शस्त्रसाठा नव्हता.विमाने जुनी झाली होती. दारुगोळा पुरेसा नव्हता. सरकार काहीही करायला तयार नव्हते. मोदींनी अजित दोवालना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नियुक्त केले आणि परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. मोदींनी आजूबाजूच्या देशांना भेटी देण्याचा धडाका लावला.आणि नेपाळ,भूतान,बांगलादेश, म्यानमार परत भारताकडे वळू लागले.मोदींनी व्हिएतनाम,ऑस्ट्रेलिया,जपान सारख्या देशांना भेटी दिल्या आणि त्यांना भारतीय सैन्याची मदत देऊ केली.२ वर्षाच्या काळात भारताने चीनच्या बाजूच्या देशांची साखळी उभी केली आणि चीनला फास लावला. व्हिएतनाम सारख्या देशांना भारत आता मिसाईल ,युद्धनौका,तोफा विकत आहे. व्हिएतनाम जवळच्या समुद्रांत युद्धनौकांच्या संरक्षणांत भारतीय कंपन्या तेलाचे उत्खनन करत आहेत. . अमेरीकेचे भारताशी संबंध खूप सुधारले. श्रीलंकेमध्ये "रॉ" नी कारवाईकरून सत्ता बदल घडवून आणला. नवीन सरकार हे चीनच्या विरोधी आहे. त्यांनी आल्या आल्या चीनशी बंदर विकसित करायचा करार मोडून टाकला. त्याच वेळेला सैन्याचे आधुनिकीकरण करून नवीन शस्त्रे विकत घेण्याचा सपाट लावला. नकाशा पहिला तर समजते की चीनला मोठ्या युद्धाच्या वेळेस सतत तेलाचा पुरवठा फक्त समुद्रातून होऊ शकतो. पण, समुद्रात भारताच्या नाविक दलाचे साम्राज्य आहे. अंदमान निकोबार वर असणाऱ्या सैन्य तळामुळे चीनची रसद भारत तोडू शकतो. मौरिशस जवळच्या सैन्य तळामुळे चीनची रसद तोडता येऊ शकते.त्यामुळे चीनने ग्वादार बंदर विकसित करायला सुरवात केली. त्यामुळे चीनला सतत तेलाचा पुरवठा होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून भारताने इराण मधील चाबहार बंदर विकसित केले आणि एका दगडांत अनेक पक्षी मारले. आता युद्धाच्या वेळेस भारत ग्वादार बंदरांची रसद तोडू शकतो. आज पर्यंत अफगाणिस्तानला गहू पाक मधून जात होता. पण आता भारतातून जाणार आहे. त्यामुळे पाकची अर्थव्यवस्था मागे पडेल. अफगाणिस्तान आणि इराण मुस्लिम देश पाकच्या विरोधांत भारताच्या बाजूनी उभे आहेत. इराणचा चाबहार हा भाग बलुचिस्तानला लागून आहे. त्यामुळे भारताला बलुचिस्तान मध्ये कारवाई करणे शक्य होणार आहे.पाकमध्ये यामुळे काळजीचे वातावरण आहे. इराण मधून चाबहार मधून रेल्वे मार्ग अफगाणिस्तानला जोडणार आहे. त्यामुळे भारताला अफगाणिस्तान,इराण आणि इतर देशांबरोबर व्यापार करणे सोपे जाणार आहे. ह्यामुळे चीनचा ग्वादार मार्ग (cpec) निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. आता नीट पहिले तर भारताने चीनच्या बाजूनी अनेक देशांची (जवळ जवळ ९ देश) साखळी उभी केली आहे.ह्या देशांना भारत शस्त्रे पुरवणार आहे.ह्या सर्व देशांशी चीनचे भांडण चालू आहे. त्याच वेळेला पाकच्या भोवती सुद्धा तसाच फास आवळला आहे. इराण,अफगाणिस्तान,बांगलादेश सारखे मुस्लिम देश भारताच्या बाजूनी आणि पाकच्या विरोधांत उभे आहेत. मोदी वर कट्टर हिंदुत्वाचे आरोप झाले, जातीयवादाचे,मुस्लिम द्वेषाचे आरोप झाले. त्याच मोदींनी इराण,अफगाणिस्तान,बांग्लादेश सारख्या मुस्लिम देशांना पाक विरुद्ध उभे करून दाखवले. अफगाणिस्तान मध्ये आतापर्यंत पाकचा प्रभाव होता. अमेरिका पाक सांगेल तसे अफगाणिस्तानांत करत होते. पाक ह्याचा फायदा घेऊन तालिबानला पुढे करून अफगाणिस्तान अस्थिर करत होते आणि अस्थिरता दाखवून अमेरिकेकडून भरपूर पैसे उकळत होते. अफगाणिस्तानला पाक स्वतःचे एक राज्य समजते. आता अमेरिकेने भारताला अफगाणिस्तानात प्रमुख भूमिका बजावायला सांगितले आहे. त्यामुळे पाकचा डाव पूर्ण फसला आहे आणि भारताच्या फौजा आता अफगाणिस्तानमध्ये काम करत आहेत. आता इराण,अफगाणिस्तान,बांगलादेश,श्रीलंका,भूतान,म्यानमार भारताच्या बाजूने उभे आहेत. भारताने "अग्नी" सारखी अस्त्रे चीनच्या महत्त्वाच्या शहरांवर रोखून तयार ठेवली आहेत. चीनच्या सीमेवर "सुखोई विमाने" तयार ठेवली आहेत. नवीन ड्रोन्स विकत घेऊन समुद्रात चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवली जात आहे.जगभरांतून नवीन आधुनिक शस्त्रे विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. २०२० पर्यंत भारत दोन्ही सीमेवर युद्ध करू शकेल, अशी तयारी भारत करत आहे. एक नवी सैन्य डिवीजन तयार करून १ वर्षात चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहे. .आणि हे सगळे केले आहे फक्त ३ वर्षांमध्ये. मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी. पक्षीय राजकारण दूर सारून देशाचा विचार केला तर २०१९ मध्ये कोण लोकसभेमध्ये जिंकायला हवे, हे सांगण्याची गरज नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा msg पाठवा आणि सर्वजण हा msg नीट वाचा,फक्त पेट्रोल वाढ झालं कि सरकार वाईट होत नाही अश्या अनेक गोष्टी आहेत जिथे सरकारने खूप चांगलं काम केलं आहे.*```*

In reply to by ट्रम्प

काँग्रेस आणि सहयोगी - हे असं चित्र उभं करणं ही मोदींची चाल आहे. सत्तेची लालसा त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आमच्या सरकारने सर्व देशांशी सारखे संबंध ठेवले होते. आमच्यासाठी सगळे सारखे आहेत, सर्वधर्मसमभाव हा आमचा नारा आहे. प्रत्येकाला स्वतःचा फायदा बघण्याचा अधिकार आहे, त्यात चीन आणि पाकिस्तान पण आले. खरं तर या देशाच्या सीमा उगाच आहेत, सगळे एकत्र राहू शकलो तर बरंच होईल. आमचा राहुल सगळ्यांचं नेतृत्व करायला सक्षम आहे. मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते. सेक्युलर मोड - मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते. कम्युनिस्ट मोड - चीनचा एवढा द्वेष करण्याचे काही कारण नाही. जर आपण चीन बरोबर संबंध वाढवले तर सिपेकचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो. पण या फॅसिस्ट सरकारला स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान दुश्मन म्हणून दाखवावे लागतात. चीनला बरोबर घेऊन आपण आशिया खंड ताकदवर बनवू शकतो आणि अमेरिका युरोपला आव्हान देऊ शकतो. त्यांच्या सहयोगाने भारतात पण कम्युनिस्ट राजवट आणता येईल ज्याने सर्व गरिबांना फायदा होईल. लाल सलाम!

In reply to by ट्रम्प

मोदींनी व्हिएतनाम,ऑस्ट्रेलिया,जपान सारख्या देशांना भेटी दिल्या आणि त्यांना भारतीय सैन्याची मदत देऊ केली
या बाबतीत अधिक माहिती मिळेल काय ?

In reply to by ट्रम्प

पण इतकं बालीश कौतुक?
कांग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, ह्यांना अस्तित्व टिकवून राहण्याशिवाय इतर कशातच इंटरेस्ट नव्हता आणि नाही सुद्धा. आज सर्व विरोधक चीन व पाकिस्तानशी उघड उघड जवळीक करत आहेत हे काय दर्शवते?
विरोधी पक्षांना, किंबहुना सर्वच पक्षांना, सत्तेची लालसा असतेच. अस्तित्व पणाला लागलं कि इकडे तिकडे थोडीफार आगळीकही होते. पण म्हणुन विरोधी पक्ष शत्रुच्या वळचळणीला वगैरे लागलेला नाहि.
मोदींनी आजूबाजूच्या देशांना भेटी देण्याचा धडाका लावला.आणि नेपाळ,भूतान,बांगलादेश, म्यानमार परत भारताकडे वळू लागले.
मोदिंच्या भेटींमुळे हे देश भारताकडे कसे काय वळतील? आपला जीडीपी खुप वाढला, आपल्याकडे बिझनेस खुप वाढला, आपल्या शेजार्‍यांना भरपूर अर्थसहाय्य केलं, जॉब आउटसोर्स केलं, तिथल्या सरकारांना स्थीर करण्यात मदत केली... असलं काहि करुन शेजार्‍यांना अपल्याबाजुने वळवता आलं असतं... पण नुसतं भेटी देऊन काय साधणार?
नकाशा पहिला तर समजते की चीनला मोठ्या युद्धाच्या वेळेस सतत तेलाचा पुरवठा फक्त समुद्रातून होऊ शकतो.
म्हणुनच चीनने डायरेक्ट रशीयावरुन एक पाईपलाईन त्यांच्या अंगणात उतरवली आहे. न जाणो उद्या ते अणु इंधनावर चालणार्‍या रेल्वे देखील विकसीत करतील. तसंही त्यांच्या रेल्वेचं जाळं युरोपपर्यंत धडका द्यायचा प्लॅन आहेच.
ह्यामुळे चीनचा ग्वादार मार्ग (cpec) निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.
भारताच्या चाबहारमधल्या गुंतवणुकीचं चीनच्या ग्वादारमधल्या गुंतवणुकीशी गुणोत्तर काढलं तर असं अजीबात वाटत नाहि
आता नीट पहिले तर भारताने चीनच्या बाजूनी अनेक देशांची (जवळ जवळ ९ देश) साखळी उभी केली आहे.ह्या देशांना भारत शस्त्रे पुरवणार आहे.ह्या सर्व देशांशी चीनचे भांडण चालू आहे.
केवळ भारताच्या भरीस पडुन हे देश चीनशी पंगा घ्यायची सुतराम शक्यता नाहि.
त्याच मोदींनी इराण,अफगाणिस्तान,बांग्लादेश सारख्या मुस्लिम देशांना पाक विरुद्ध उभे करून दाखवले.
एकदम कट्टर शत्रुत्व नसेल कदाचीत, हे तीनही देश वेगवेगळ्या कारणांनी तसेही पाकच्या विरुद्धच होते.
भारताने "अग्नी" सारखी ... १ वर्षात चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहे.
म्हणजे जुन्या काळात बंदुकींच्या पलटणींविरुद्ध भाला-तलवार घेतलेली फौज उभी करतोय भारत. क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं वगैरेंचं महत्व निर्वीवाद आहे, पण चीनचं युद्धतंत्र अत्याधुनीक सायबर वॉर वगैरे पद्धतीचं असणार आहे. २१व्या शतकाला साजेसं युद्धतंत्र चीन वापरणार हे नक्की. त्याचा पहिला फटका भारताला बसु नये हिच इच्छा.
आणि हे सगळे केले आहे फक्त ३ वर्षांमध्ये. मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी.
मोदी आणि कंपनीचा कामाचा धडाका थक्क करणारा आहे हे सत्य आहे.
पक्षीय राजकारण दूर सारून देशाचा विचार केला तर २०१९ मध्ये कोण लोकसभेमध्ये जिंकायला हवे, हे सांगण्याची गरज नाही.
पसंतीच्या दृष्टीने मोदी इतरांपेक्षा बरेच पुढे आहेत हे ही सत्य आहे. देशापुढे उभी असलेली आव्हानं बघता उगाच वेगळा प्रयोग करण्यात अर्थ नाहि... तरिही... बारामतीकर काकांच्या नेतृत्वात गांधी-ममता-मायावती वगैरे मंडळी विरहीत मजबूत सरकार बनणार असेल तर आम्हाला चालेल :)

In reply to by अर्धवटराव

मोदींचं कौतुक आहे, पण ह्या ढकलपत्रात लिहिणारा वाहवत गेला आहे.तोंड फाटेस्तोवर स्तुती करताना वास्तवाशी परखड राहणे त्याला जमलेले नाही.

In reply to by अर्धवटराव

पक्ष आणि सरकार वेगवेगळे असतात, हे जनतेला कळेल, तो सुदीन.. जरा जास्तच वाहवला आहे कौतूककर्ता. सद्यसरकारचे कौतूक आहेच त्यांनी केलेल्या कार्यासाठी, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संबंध आणि कार्य हे 'लॉन्ग टर्म' असतात. चाबहारसाठी भारताचे प्रयत्न बरेच पुर्वी सुरु झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील जनतेचा धर्म हा नगण्य मुद्दा असतो. तिथे इंधनसुरक्षा, नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता, आर्थिक फायदे इत्यादी महत्त्वाचे असतात.
पण चीनचं युद्धतंत्र अत्याधुनीक सायबर वॉर वगैरे पद्धतीचं असणार आहे. २१व्या शतकाला साजेसं युद्धतंत्र चीन वापरणार हे नक्की.
बरोबर.. चीन कदाचित भारताशी पारंपारीक युद्ध करणार नाही. सिंगल चाईल्ड पॉलिसी राबवल्यामुळे चीनसाठी सीमेवरुन 'बॉडीबॅग्स' परत येणं परवडणारं नाही, असं लष्करीतज्ञांचं मत आहे. 'चायनीज मनी ट्रॅप' बद्दल नेटवर बरंच साहीत्य उपलब्ध आहे.

/\ /\. = )

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अनिरुद्ध.वैद्य, अहो, साहजिकच आहे पब्लिकने धुमाकूळ घालणं. चौकीदार म्हणाले ना की पायलट प्रोजेक्ट ठीक झाला, आता प्रत्यक्ष काम करायचंय म्हणून! आ.न., -गा.पै.