मिपा प्रतिज्ञा
मिपा माझे संस्थळ आहे. सारे मिपाकर तत्वतः माझे बांधव आहेत. माझ्या मिपावर माझे प्रेम आहे. माझ्या मिपावरील समृद्ध आणि विविध माहितीने लगडलेल्या इतर मिपाकरांचा मला आदर आहे. त्या माहितीचा कीस काढण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी मिपामालकांचा ,मिपाकरांचा आणि इतर वडीलधार्या माणसांचा शक्य तेवढा (च!) आदर करेन आणि प्रत्येकाशी जमेल तितपत सौजन्याने वागेन. माझे मिपा संस्थळ आणि माझे मिपाबांधव ह्यांच्याशी जमेल तितका वाद घालण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. फक्त माझ्याच रेटलेल्या मुद्द्याची भलामण आणि तळी उचलणे यातच त्यांचे सौख्य सामावलेले आहे !
आवडली
भारी भीष्मप्रतिज्ञा!
पोस्ट la अनुसरण च reply देईन
छान
एकसाथ नमस्ते
आमच्या खरडवहीवरून ढापलेली
In reply to आमच्या खरडवहीवरून ढापलेली by विंजिनेर
सगळे जुने मिपाकर कधी कधीच
In reply to सगळे जुने मिपाकर कधी कधीच by यशोधरा
रामराम! बरी आसा मां यशोतै?
In reply to रामराम! बरी आसा मां यशोतै? by विंजिनेर
होय, बरा आसय, तुम्ही?
आवडली प्रतिज्ञा
वाह, प्रतिज्ञा खासच. :)