Skip to main content
लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 16/02/2019 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी दिवस सोफिया सरळच पडून राहायची. ऊन तिला सहन व्हायचं नाही आणि रात्री कधीकधी तर पायही वाकडे व्हायचे. आज व्हॅलेंटाईन डे. तो आज येणार अशी कुजबुज तिच्या कानी पडली होती. याच दिवसाची वाट बघत तिनं कितीतरी रात्री एकटीनं काढल्या होत्या. आज मात्र तो येऊच नये असं तिला मनोमन वाटत होतं. अखेर तो आलाच. लिलीची पांढरी फुलं घेऊन!!! तिनं घट्ट मिठी मारत विचारलं, "दुखलं?" तो: "...हो. थोडंसं....छातीत. ...व्हेंटिलेटर बंद केला तेव्हां." त्याच्या नवीन सुटावर तिचे अश्रू ओघळले. त्यांच्या लग्नाच्या दिवशी ओघळले होते तसे... ---------------------------------------------- सोफियाच्या थडग्याशेजारी असलेल्या त्याच्या थडग्यावर मजकूर लिहून पेंटर उभा राहिला. विल्सन स्मिथ मृत्यू: १४ फेब्रुवारी २०१९ RIP

वाचने 19807
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

+१ मरणाबद्दल असूनही सुंदर म्हणावी अशी शशक !