Skip to main content
लेखक mayu4u यांनी रविवार, 03/02/2019 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून तो गळ टाकून बसलेला. दुपार होत आली तरी एकही मासा मिळाला नव्हता. उन्हासोबत वाढणाऱ्या भुकेने तो चिडचिडलेला… कंटाळून उठला, तर बाजूला काहीतरी चमकलं! बघितलं तर एका डब्यात सॅन्डविच होतं. "एखाद्या मासेमाऱ्याचं असेल..." पोटात आग पडलेली! इकडंतिकडं बघत त्यानं हळूच ते सॅन्डविच उचललं आणि घाईघाईत एक मोठा घास घेतला. दुसऱ्याच क्षणी कुणीतरी त्याची जीभ खेचतंय असं त्याला वाटू लागलं... ती अदृश्य शक्ती त्याला तलावाकडे ओढू लागली... प्राणभयाने तो किंचाळला, पण घशातून आवाज फुटेना! सुटकेसाठी तो खूप धडपडला, पण अखेरीस त्या शक्तीनं त्याला तलावात ओढून घेतलंच! तलावाचं खळबळलेलं पाणी हळूहळू शांत झालं. तलावातून आणखी एक सॅन्डविच काठावरच्या डब्यात हळूच येऊन पडलं.

वाचने 59964
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया