मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - सौंदर्य

साहित्य संपादक · · स्पर्धा
"काळेभोर, लांबसडक केस म्हणजेच स्त्रीचं खरं 'सौंदर्य'!" ब्युटीपार्लर मध्ये नवीनच आलेली स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या. "माझे केस कमी करायचेत!" कमरेपर्यंत कमी केल्यावर म्हणाली, "अजून थोडे". थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!". सगळेच चक्रावतात; एवढे दाट केस कमी करतेय! पण आग्रहास्तव अगदी कानापर्यंत कमी करून एकदम टॉमबॉय लुक देतात. स्वतःच प्रतिबिंब न्याहाळत हरवून गेलेल्या त्या मुलीकडे स्वप्नाली प्रश्नार्थक नजरेने पाहते, तर ती एकदम ओंजळीत तोंड लपवून रडायला लागत म्हणते, "माझे केस एवढे कमी करा की माझ्या घरचे कोणी माझे केस ओढू शकणार नाहीत!" __________________________________________________________________________ डिस्क्लेमर: कथाबीज हे आंतरजालावरच्या वाचनावर आधारित काही गोष्टींचा कोलाज आहे.

वाचने 10672 वाचनखूण प्रतिक्रिया 18

हे कनफ्युजन टाळण्यासाठीच कटिंगला गेलो की आम्ही डोक्यावर पहिले झिरो मशिन चालवुन घेतो. त्याचे दोन फायदे होतात दहा मिनिटात कटिंग होते आणि मग महिना दिड महिना पहावे लागत नाही. आज तिसरा फायदाही समजला. पैजारबुवा,

मराठी कथालेखक Wed, 02/20/2019 - 23:52
भूतकाळ स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या. वर्तमानकाळ थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!".
स्वतःच प्रतिबिंब न्याहाळत हरवून गेलेल्या त्या मुलीकडे स्वप्नाली प्रश्नार्थक नजरेने पाहते, तर ती एकदम ओंजळीत तोंड लपवून रडायला लागत म्हणते,
काळाची गडबड झालीय सगळीच