✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आता पुलवामा.

श
शब्दानुज यांनी
गुरुवार, 02/14/2019 - 23:14  ·  लेख
लेख
सगळ्या न्यूज चॅनलवरची आजची ही बातमी. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालेला आहे. यात आपले चाळीसहून अधिक जवान शहीद झालेले आहेत.जैश -ए - मोहम्मदने याची जबाबदारी घेतली आहे. या हल्यात माझ्या माहितीप्रमाणे दोन थिअरी समोर आल्या आहेत. एका कारमद्दे सुमारे दोनशे किलो स्फोटके भरलेली होती हा यातला समान धागा. एका थिअरीप्रमाणे ही स्पोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर जावून धडकली आणि स्फोट झाला. दुस-या थिअरीप्रमाणे रिमोटने कारमधील स्फोटके उडवण्यात आली. यानंतर ठरलेली छापील 'मुहतोड जवाब'ची उत्तरे आपण ऐकत राहायची. निशेषाचे फलक नाचवायचे. पुन्हा सर्जिकल स्ट्राईक की अजून काही यावर चर्चा होणार आणि प्रश्न तसाच भिजत पडणार. बाहेरचे लोक येऊन स्थानिक तरूणांना भडकावतात हे समजू शकते पण हे तरूण भडकले जातातच कसे ? जर ते लोक ब्रेन वॉशकरु शकतात आपले सरकार काही लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नेमून पडद्याआड वा समोरासमोर तरूणांना समजावू शकत नाहीत का ? सेनेपेक्षा पुर्ण सायलॉजिस्टकडून ट्रेन झालेले धर्मोपदेशक तरूणांना असल्या मार्गापासून जाण्यास का बरे रोखू शकणार नाहीत ? असे करायचे कि सरळ मिलिटरीला मोकळे मैदान द्यायचे ? बंदूकीचा धाकावर शांतता किती दिवस टिकवून ठेवता येते ? बाकीचे देश सरळसरळ दुस-या देशात आपले सैन्य घुसवतात तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव नसतो. भारतानेच हे असले दबावाचे अोझे किती दिवस वागवायचे ? असला दबाव न झुगारता येण्यासारखा असतो का ? आर्थिक निर्बंध लागल्यास काही दिवस आर्थिक निर्बंध सहन न होण्याइतकी आपली अर्थव्यवस्था कमकुवत आहे का ? आपल्याच भागावर दुसरा देश राज्य करतो आहे , तिथून दहशतवादी कॅंप चालवत आहे हे उघड असताना आपण तो मिळवण्यासाठी काहीच का करायचे नाही ? एवढे आधुनिक तंत्रज्ञान आणि सैन्य केवळ स्वसंरक्षणार्थच का वापरावे ? स्वताः युद्धाची सुरवात आपण करत नाही ही मिरवण्याची गोष्ट आहे का ? छोटमोठ्या उपचारच सतत घेत रहावे की सरळ एक शस्त्रक्रिया करून, त्यातला धोका स्विकारून मोकळे व्हावे ? मुद्दे विस्कटलेले आहेत ह्याची जाणीव आहे. काहिंना हे बालीशही वाटतील तरीही जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. अवांतर वादावादी नसतील ही अपेक्षा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44113 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 11:52 नवीन
तसे धरले तरी भारतीय होलसेलरच खड्ड्यात जातो, पाकिस्तानच्या प चे 100 व मोदी सरकारचे 200 खिशातून घालवून तो माल घरात ठेवणे परवडणार नाहीच, पाकिस्ताआतून भारतात शेती माल , द्राय फ्रुट , जिप्सम व सिमेंट येते म्हणे. भारत पाक मुख्य दळणवळण गुजरात बंदरातून चालते म्हणे ! गुजरातवाले बघून घेतील ना ?
↩ प्रतिसाद: डँबिस००७

तुम्ही डोक्यावर पडले आहेत हे

डँबिस००७
Sun, 02/17/2019 - 12:07 नवीन
तुम्ही डोक्यावर पडले आहेत हे सिद्ध करत आहात !!
↩ प्रतिसाद: Blackcat

तुम्ही डोक्यावर पडला आहात

विशुमित
Sun, 02/17/2019 - 13:27 नवीन
तुम्ही डोक्यावर पडला आहात म्हणून तुमच (असं) डोक चालतय.
↩ प्रतिसाद: Blackcat

आता कोण्ही विचारेल मग आयात बंदी का करत नाही

Rajesh188
Sun, 02/17/2019 - 11:39 नवीन
जागतिक व्यापार विषयी काहीतरी जागतिक नियम आहेत आणि ते सर्व राष्ट्रांना लागू आहेत त्या मुळे बंदी करता येत नाही पण हेवी duty लावायचा अधिकार प्रत्येक देशाला आहे . Aikdya देशाच्या वस्तू चांगल्या असतील आणि त्या महाग सुधा खरेदी करायची तयारी आसेल तर रोखू शकत नाही

Aikdya देशाच्या वस्तू

डँबिस००७
Sun, 02/17/2019 - 12:06 नवीन
Aikdya देशाच्या वस्तू चांगल्या असतील आणि त्या महाग सुधा खरेदी करायची तयारी आसेल तर रोखू शकत भारतातील ग्राहक हा स्वस्त वस्तुच घेणारा ग्राहक आहे त्या मुळे चीनच्या भरमसाठ वस्तु ईथे विकल्या जातात पण त्याच बरोबर चीनच्या वस्तुवर बॅन घालण्याची साद आली तर चीनच्या वस्तुंवर ग्राहक स्वतः बॅन घालायला पुढे येतो. पाकिस्तान भारताला स्वस्त अ‍ॅग्री प्रोडक्टस देत आहे जे भारतात सुद्धा पिकतात ! त्यानिमित्त्याने भारतातील शेतकरी आपला माल जास्त विकु शकतील. WTO च्या जागतिक व्यापार नियम नुसार इतर देशांच्या वस्तुवर बंदी करता येत नाही त्यामुळे भारत हे करत नव्हता

....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 12:41 नवीन
तस काय नाय होणार. भारत पाक मुख्य व्यापार गुजरातेतूनच होतो , चार दिवसांनी राष्ट्रप्रेमाची भरती ओसरली की पुन्हा होईल पूर्वीसारखे. डोवालच्या ब्रिटिश पोराच्या कम्पनीत एक पाकिस्तानी पार्टनर आहे म्हणे, त्याचे दुकान झाले का बन्द ? पाकिस्तानने इतके भारतीय लोक मारले म्हणून इतकी रिएक्शन , मग ब्रिटिशांनी काय कमी भारतीय मारले होते ?
↩ प्रतिसाद: डँबिस००७

पाकिस्तानने इतके भारतीय लोक मारले म्हणून इतकी रिएक्शन ...

बबन ताम्बे
Sun, 02/17/2019 - 12:57 नवीन
पाकिस्तानने इतके भारतीय लोक मारले म्हणून इतकी रिएक्शन ...... मग ब्लॅककँट, काय रीऍक्शन द्यायला हवी भारताने हे सांगता का प्लिज ?
↩ प्रतिसाद: Blackcat

काही नाही हो !!!!!

ट्रम्प
Sun, 02/17/2019 - 17:51 नवीन
त्या काळ्या मावुला रेल्वे स्टेशन वर 5 रु चा कुल्हड़ मधला चहा पिवून स्टेशन वरचे फुकट चे वाय फाय वापरून प्रतिसाद टंकायची सवय आहे , त्या मुळे तो सतत वायफट बरळत असतो .
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

!!

शब्दानुज
Sun, 02/17/2019 - 13:17 नवीन
आपण काय टाईप करत आहात याची नक्की जाणीव आहे का आपल्याला ? एकाने खुन केला म्हणजे दुस-याला खुन करण्याचा परवाना मिळत असतो का ? इंग्रजांनी मारले म्हणून पाकिस्तानने येऊनही मारावे असे वाटते का तुम्हाला ? आणि अमूकने तमूकला मारले एवढाच याचा मर्यादित अर्थ नसतो. काही गणवेशधारी सैनिकांना मारणे हे त्या देशाच्या सार्वभौमत्माला दिलेले आव्हान असते. त्यासाठी तितकाच ताकदीचा प्रतिसाद देणे आवश्यक असते. हे सरळसरळ युद्धासाठी आव्हान देण्यासारखेच आहे. व्यापारावर निर्बंध हे तर काहिच नाही. आपल्या जागी जर ईस्राइल , अमेरिका असती तर सरळ युद्ध झाले असते याचे भान ठेवा.
↩ प्रतिसाद: Blackcat

...

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 13:54 नवीन
पाकिस्तानने येऊन खून करावेत , असे मी म्हटले नाही, हल्ल्याचा निषेधच केला आहे, डोवालचे दुकान बंद झाले का , इतकेच विचारले
↩ प्रतिसाद: शब्दानुज

....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 13:59 नवीन
टाटा उद्योग पाकिस्तानशी अजिबात व्यवहार करत नाही , असे फेसबुकवर आले होते.
↩ प्रतिसाद: Blackcat

सहमत

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/17/2019 - 14:22 नवीन
सहमत. वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धंजली. अजित डोवाल ह्यांच्या मुलाची ब्रिटनमध्ये हेज-फंड कंपनी असल्याचे वाचले होते. ती कंपनी त्याने जेमीनी सर्विसेस ह्या सौदी कंपनीला विकली. ह्या शिवाय 'इंडिया फाउंडेशन' ह्या संस्थेवरही तो आहे. ह्या संस्थेत अनेक राजकारणी पण आहेत. काही महिन्यांपुर्वी ह्या संस्थेला पैसा कोठून मिळतो अशी विचारण झाली होती पण त्याल उत्तर देण्यास सर्वानीच नकार दिला. असो. गेल्या २ महिन्यात ३/४ हल्ले सी.आर.पी.एफ.वर झाले होते. डिसेंबर- अनंतनाग- https://www.ndtv.com/india-news/6-security-personnel-injured-in-grenade-attack-in-jammu-and-kashmirs-anantnag-1966740 ११ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/militants-hurl-grenade-at-crpf-bunker/712500.html ११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-palladium-grenade-blast-343653.html
↩ प्रतिसाद: Blackcat

व्यापारावर निर्बंध हे तर

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 18:02 नवीन
व्यापारावर निर्बंध हे तर काहिच नाही. आपल्या जागी जर ईस्राइल , अमेरिका असती तर सरळ युद्ध झाले असते याचे भान ठेवा. मग मोदीना करायला सांगा युद्ध , त्यासाठीच तर निवडून दिले होते ना ?
↩ प्रतिसाद: शब्दानुज

लोकांच्या सांगण्यावरून थोडीच

शब्दानुज
Sun, 02/17/2019 - 19:59 नवीन
लोकांच्या सांगण्यावरून थोडीच होणार आहेत युद्धे ? आपला शस्त्रसाठा काय आहे , किती आहे तिथली भौगोलिक परिस्थिती काय असल्या गोष्टी माहिती नसताना केवळ आपण युद्ध करा असे मोघम बोलण्यात काही अर्थ नाही. आणि पंतप्रधानांना सल्ले देण्याइपत मी मोठा नाही. अमेरिका सारखा देश शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान, बळकट अर्थव्यवस्था याबळावर दादागिरी करू शकतो. आपणास ती मुभा सहज उपलब्ध नाही. केवळ हल्याची तिव्रता दाखवण्यासाठी अमेरिका युद्ध करेल असे म्हटले आहे. बाकी आपण सरकार विरोधी जरी असाल तरी सरकार शक्य ती कारवाई करेल यावर विश्वास ठेवण्याखेरीज तुमच्या वा माझ्या हातात काही नाही. तेव्हा वाट पहा.
↩ प्रतिसाद: Blackcat

...

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/17/2019 - 20:16 नवीन
हायला , काँग्रेसच्या काळात तर लोक सरकारला बांगड्या पाठवत होते की. मी नुसते युद्ध करायला सांगितले तर सरकारविरोधी? जाईल तिथे गांधींना नमस्कार करतात अन आता नेहरूंचे पंचशील की पंचतत्वे! हे भाजप आहे की काँग्रेस ?
↩ प्रतिसाद: शब्दानुज

तुमच्या भ्रष्ट काँग्रेसने

डँबिस००७
Sun, 02/17/2019 - 20:45 नवीन
तुमच्या भ्रष्ट काँग्रेसने केले होते ना राज्य ६५ वर्ष मग का नाही केला बंदोबस्त अहिंसेच्या मार्गाने ? ब्रिटीशांना देशा बाहेर घालवल अहींसेच्या मार्गाने मग देशा बाहेर कधी कधी आक्रमण / युद्ध करणार्या देशाशी अहिंसा कामी आली नाही ?
↩ प्रतिसाद: Blackcat

इथली चर्चा वाचून मिपा प्रशासन

टवाळ कार्टा
Sun, 02/17/2019 - 16:51 नवीन
इथली चर्चा वाचून मिपा प्रशासन झोपा काढत आहे याची खात्री पटते
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा