Skip to main content

[शशक' १९] - प्रतीक्षा संपली

गुरुवार, 14/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तो कंटाळला होता ती असंबद्ध आणि सततची बडबड ऐकून. मागचे शंभर वर्षे तो इथे पोस्ट होता. वेगवेगळ्या भाषा पण तोच हिंसकपणा आणि तीच चर्चा. सुरुवातीला त्याला वाटलं की चुकांतून आणि इतिहासातून शिकतील पण कसलं काय. इथे इतिहासाचं चक्र असतं एवढं मात्र त्याला कळलं. त्याला जेव्हा पोस्ट सोडायचा आदेश आला आणि ते ही पोस्ट कायमची मोकळी ठेवत आहेत असं कळलं तेव्हा त्याला हर्षवायू झाला. असेही संवाद करायचे प्रयत्न विफल झाले होते पण प्रोटोकॉलप्रमाणे त्याने एक शेवटचा संदेश पाठवला. आधीप्रमाणे त्याला उत्तर आले नाही. परत निघायच्या आधी त्याने एकदा डोळेभरुन त्या निळ्याशार गोळ्याकडे बघितले. अँटेना आत घेतला आणि निघून गेला त्याच्या घराकडे.

वाचने 6974
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सुरेख

+१

आवडली!

So true!

+१

+1

आधीप्रमाणे त्याला उत्तर आले नाही. असे का झाले ? पृथ्वीप्रमाणेच त्याच्या ग्रहावर मारामार्‍या सुरू होऊन संदेशवहन यंत्रणा बंद पडली की काय ?

.

+1


काय कल्पना आहे ,मस्त

+१

1+