देवपूजा झाली. माईंनी देव्हाऱ्यात निरांजन ठेवला. वाटीतले कुंकू कपाळावर लावले. डोक्यावरून पदर घेवून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
सर्व आटोपून त्या इस्पितळात पोचल्या. मुलगा ICU बाहेर ताटकळत उभा होता. डॉक्टर नुकतेच भेटून गेल्याचे कळाले.
"काय रे, काय म्हटले डॉक्टर?" त्यांनी मुलाला विचारले.
"Tracheotomy Tube काढली कि जातील दोन तीन दिवसात." पोरगा चिंताग्रस्त होता. डोळ्यात पाणी तरळले होते.
"मग कधी काढायची?" अधिरपणा न लपवता माई म्हणाल्या.
तितक्यात कोणीतरी भेटायला आले. माई पुढे झाल्या.
अथपासून इथंपर्यंत नवर्याच्या आजारपणाची कॅसेट वाजवून माईंनी पदराने डोळे पुसले. दोन हुंदके दिले. भेटायला आलेले माईंचे सांत्वन करू लागले.
पित्याच्या शेवटच्या क्षणीही आईच्या कोडगेपणाची मुलाला किव येत होती.
--------------------------------------------------------------
--सत्य घटनेवर आधारित --
वाचने
4879
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे!
कोडगेपणा काये यात? दांभिकपणा
बऱ्यापैकी सहमत. ह्यात
In reply to कोडगेपणा काये यात? दांभिकपणा by एमी
सूर्योदयस्थानपृच्छा करेन म्हणतो
In reply to कोडगेपणा काये यात? दांभिकपणा by एमी
काही = नाही
माईची असे वागण्यामागची
आजारी पेशंट ला लाईफ सपोर्ट
वयोव्रुद्ध झालेला कोम्यात गेलेला ,बेड सोर्सेस झालेला पेशंट आय सी
In reply to आजारी पेशंट ला लाईफ सपोर्ट by विजुभाऊ
+१
हे सर्व प्रतिसाद, ही कथा
कोडगेपणाची कीव येत नाही.
+१
+१