Skip to main content

[शशक' १९] - भेट

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 12/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
दरवाजा उघडला. तर हा! समोर गुलाबासकट गुलाबाची कुंडी घेऊन... (हम्मम... मवाली कुठला...) (तेवढ्यात बाबांचा प्रश्र्न..) कोण आहे गं? मी चाचपडत... गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलणार तोच. बाबा बोलले "रोपटे घेऊन आलाय... हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..." त्यानेच दिलेल्या कुंडीतलं गुलाब त्याच्या उशाशी ठेवून मी निघाले... निघण्यासाठी दरवाजा उडण्या आधी पुन्हा एकवेळ वळुन त्याच्याकडे पाहीलं. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. आजुबाजुला स्तंब्धता, शांतता आणि व्हेन्टीलेटरचा भीतीदायक आवाज. माझे डोळे बांध फुटावा असे वाहत होते... मी दार उघडला आणि मेंहदी भरलेल्या पावलांनी धावत सुटले... व्हेन्टीलेटर शिवाय कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. खळकन काचा फुटल्या. अकराव्या मजल्यावरून खाली... आणि वार्डचा दरवाजा बंद झाला.

वाचने 6994
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

+१ आवडली.

हा ये रे! तिकडे गॅलरीत ठेव..." त्यानेच दिलेल्या कुंडीतलं गुलाब
या दोन वाक्यांत प्रवेश बदलतो का? (म्हणजे टेक 2 असं काहीसं?)

+१

खूपच सुरेख. प्रेमाच्या पहिल्या भेटीपासून आता नायकाचे आजारपण (कि भावांनी/बाबांनी मारले?सैराट)आणि नायिकेचे दुसऱ्यासोबत लग्न ठरले आहे। पण तिला ते करायचे नसल्याने तिची आत्महत्या .एवढा मोठा आवाका तुम्ही शंभर शब्दात सामावू शकलात याबद्दल खरच अभिनंदन

In reply to by श्वेता२४

तुमच्यामुळे समजली कथा. नायक अाजारी पडला, कशाने वगैरे काही समजलेच नव्हते.

In reply to by श्वेता२४

मलाही आधी कळाली नव्हती. आधी सगळा प्रसंग एकाच ठिकाणी झालाय असं वाटलं, त्यामुळे त्याने आणलेली गुलाबाची कुंडी आणि त्यातला गुलाब त्याच्याच उशाशी कसा ठेवला हे समजत नव्हतं. आणि गॅलरीत कुंडी ठेवल्यामुळे शेवटी खळ्ळकन तीच पडली असावी असं वाटलं होतं. तुमच्यामुळे आता पूर्ण उलगडा झाला!

+१

आवडली पैजारबुवा,

+१

आवडली.

+१

सुन्न झाले. आवडली म्हणणं जड जातंय

+1

+1


+१

ते वर लिहिल्याप्रमाणे जरा २ प्रसंगांची सांगड घालताना जड जातं.

+१