नमस्कार.
बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आहे. डोक्यात एक विषय घोळत आहे त्याविषयी लिहितोय.
प्रश्न - भारताबाहेरच्या विकसित म्हणाल्या जाणाऱ्या जगात नोकरीची संधी आल्यावर भारत सोडावा ?
एक जवळचा मित्र सध्या भारतातच एका शहरात राहतोय. खाऊन पिऊन सुखी म्हणता यावे इतके उत्पन्न आहे. नौकरीही चांगली आहे. त्याचे आणि बायकोचे आई बाबा काही तासात घरी येऊ शकतील हि सोय हि आहे. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी व्यवस्थित सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे दोघे नौकरी करत असल्यामुळे. तो राहतो ते शहर दोघांनाही आवडते. त्यांचे आई वडीलही येऊन भरपूर दिवस राहतात.
युरोपमधल्या एका चांगल्या शहरात नौकरी त्याला स्वतःहून, न शोधता मिळत आहे. पगाराविषयी काही माहिती नाहीये, पण किती असेल तो अंदाज आहे.
सुरुवातीला दोघेही खुश होते पण आता विचार करताय तेव्हा तितकेसे खुश नाहीत.
+ कारणे ( महत्वाच्या क्रमानुसार)
दोघांना फिरण्याची खूप आवड आहे. पूर्ण युरोप तिथे राहून फिरून होईल असे वाटते. ते काय इथून जाऊन होणार नाही
पोरीला एक जागतिक अनुभव मिळेल, मित्रालासुद्धा - पुढे करियर मध्ये कामाला येईल
नवीन भाषा, संस्कृती आणि पाककृती
- कारणे
दोघांच्या आई वडिलांपासून दूर राहावे लागेल.
इथे जी सपोर्ट सिस्टिम आहे ती काही तिथे उभी राहणार नाही.
नवरा बायको दोघेही तसे इन्ट्रोव्हर्ट असल्यामुळे मित्रमंडळी कमी आहेत, तिथे गेल्यावर हे अगदीच एकटे पडायची हि शक्यता.
दोघांनाही एकाच वेळी नोकरी मिळाली नाही तर उत्पन्न कमी होऊ शकेल काही दिवस . ( हे सगळ्यात कमी महत्वाचे. उत्पन्न वाढेल हि पण तो सध्या तरी डिसिजन फॅक्टर नाहीये )
आणि- सगळे व्यवस्थित चालले असतांना स्वतःचा देश सोडावा का?
मिपाकरांपैकी कोणी हा डायलेमा अनुभवाला आहे का? असल्यास काय तोडगा काढला? इतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे?
धन्यवाद...
वर्गीकरण
वाचने
33441
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोघांचा एकत्रित पगार कमी होऊन
हो
In reply to दोघांचा एकत्रित पगार कमी होऊन by टवाळ कार्टा
सर्वात पहिल्यांदा :-- आपण देश
Couldn't agree more
In reply to सर्वात पहिल्यांदा :-- आपण देश by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to Couldn't agree more by फेरफटका
काही मुद्दे
> त्याच्या पत्नीला तिथे नोकरी
In reply to काही मुद्दे by मराठी कथालेखक
एमी आणि मराठी कथालेखक
In reply to > त्याच्या पत्नीला तिथे नोकरी by एमी
अगदी
होय माईसाहेब
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
युरोपमधल्या एका चांगल्या
एक जवळचा मित्र सध्या भारतातच
अहो योगेश
In reply to एक जवळचा मित्र सध्या भारतातच by कानडाऊ योगेशु
एक जवळचा मित्र सध्या भारतातच
इतरांनी त्यांच्या मतानुसार,
नाही हो
In reply to इतरांनी त्यांच्या मतानुसार, by यशोधरा
अशात कुटुंबाला सारासार विचार
In reply to नाही हो by खंडेराव
माझा इथला प्रतिसाद उडवला
In reply to इतरांनी त्यांच्या मतानुसार, by यशोधरा
भारत सोडावा ??
हो
In reply to भारत सोडावा ?? by अर्धवटराव
नक्की जा.शुभेछया
संधी मिळणे
In reply to नक्की जा.शुभेछया by डाम्बिस बोका
माझा व्यतिगत अनुभव..
बापू
In reply to माझा व्यतिगत अनुभव.. by बन्या बापु
सरकारनी देश सोडून जाणाऱ्या लोकांसाठी आर्थिक अनुदान द्यावे
माई मोड ऑन
In reply to सरकारनी देश सोडून जाणाऱ्या लोकांसाठी आर्थिक अनुदान द्यावे by Rajesh188
आमचाही माई मोड
In reply to सरकारनी देश सोडून जाणाऱ्या लोकांसाठी आर्थिक अनुदान द्यावे by Rajesh188
स्थलांतर खिडकी
+१
In reply to स्थलांतर खिडकी by स्वधर्म
बिंधास्त जा हो.
धन्यवाद
In reply to बिंधास्त जा हो. by विजुभाऊ
मनाची तयारी बरीचशी झालेली
गवि
In reply to मनाची तयारी बरीचशी झालेली by गवि
जा
बिनधास्त जावे...
+१
In reply to बिनधास्त जावे... by समीरसूर
हो
In reply to +१ by गवि
भविष्य उज्वल आसेल तर नक्की जावे पण मातृभूमी विसरू नये
नक्की जा. जीवन समृद्ध होईल.
नक्कि जा
सर्व मिपा करांचे आभार!
व्हिएन्ना उत्तम आहे सर्वच
In reply to सर्व मिपा करांचे आभार! by खंडेराव
आजची आपल्या देशाची परिस्थिती बघता जरूर जावे... पण.....
हॅपी जर्नी.
आईवडील दूर होतील......
:-) मार्मिक !
In reply to आईवडील दूर होतील...... by जेम्स वांड
Bharat सोडून कोण जात
गैरसमजूतीवर/अज्ञानावर
In reply to Bharat सोडून कोण जात by Rajesh188
गैरसमजूतीवर/अज्ञानावर आधारलेला प्रचंड गैरसमज !!! याबद्दल काही संदर्भ?!
भारत सोडून गल्फ मध्ये जाणारे हे मुख्य ता कष्टकरी वर्ग आहे बिगारी,ड्रायव्हर, नर्स आणि कमी दर्जाचे कामं करणारे गल्फ मध्ये जातात .खाडी देशात अनेक क्षेत्रांत... इंजिनियर्स, डॉक्टर्स, मॅनेजर्स, व्यवसायधंदा चालवणारे इतर व्यावसायिक, अगदी सरकारी ऑफिसांतले तज्ञ/तंत्रज्ञ, इत्यादी सर्व स्तरांमध्ये... भारतीय आहेत आणि तेथे सन्मानाने काम करत आहेत व उच्च्पदेही भूषवित आहेत. उद्योधंद्यात यशस्वी होऊन अमेरिकन डॉलर्समध्ये मल्टीबिलियनेर झालेले भारतीयही तेथे आहेत. किंबहुना, बहुतेक सर्व खाडी देशांना विकसित करण्यात सर्व स्तरांच्या भारतियांचा हातभार लागला आहे. "खाडी देशांमध्ये, लहान पासून उच्च अश्या सर्व व्यवसाय/नोकरीच्या स्थरांतील लोकांची गरज भागवली जाते", हे सर्वसामान्य ज्ञान, खूप अभ्यासाने नाही तर, केवळ वर्तमानपत्रांतील जाहिराती वाचल्यास सहज मिळते ! खाडी देशात उच्च यश मिळवलेल्या अनिवासी भारतियांबद्दलही जालावर भरपूर माहिती आहे !! :)अमेरिकेत जाणारे हे उच्य शिक्षित आणि हुशार लोकं असतात पण त्यांची हुशारी भारतातील भ्रष्ट लोकांना आवडत नाही त्यामुळे त्यांची योग्य संधी नाकारली जाते म्हणून ते अमेरिकेत जातात तिथे त्यांना योग्य मान मिळतोअमेरिकेत जाणारे सगळेच उच्चविद्याविभूषित नसतात तर सर्वच स्तरातले असतात, हे जालावर सहज उपलब्ध असलेल्या अमेरिकेन सरकारच्या इमिग्रेशन पॉलिसीबद्दल थोडेसे वाचन केले तरीही ध्यानात येते. किंबहुना, अमेरिका हा असा एक विशेष विकसित देश आहे की जेथील लिगल इमिग्रेशन सिस्टिममधून तेथे जाणार्या बहुसंख्य लोकांना त्यांच्या पात्रतेवर (मेरीट) नाही तर इतर, राजकिय-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर-अमेरिकेची गरज, इत्यादी मुद्द्यांवर स्विकारले जाते. या पॉलिसीवर, त्या देशातील स्थानिक उच्चतांत्रिक उद्योगधंद्यांकडून, सतत टीका होत असते. तुमचा गैरसमज, "अमेरिकेचे H1B आणि Green Card हे व्हिसा, केवळ संगणकशास्त्रातील पदविधरांना मिळतात", या गैरसमजूतीवर आधारीत असावा असा अंदाज आहे. सन २००० ते २०१० मध्ये सुमारे १.४ कोटी, म्हणजे दर वर्षी सरासरी १२.७ लाख लोक अमेरिकेत स्थलांतरीत झाले. त्यापैकी, सन २००३ मध्ये सर्वात जास्त म्हणजे १,९५,००० (एकूणाच्या सुमारे १५%) H1B व्हिसा दिले गेले. ते प्रमाण २००४ मध्ये ८५,००० (६५,००० सर्वसाधारण आणि २०,००० उच्च्विद्याविभूषित, म्हणजे एकूणाच्या सुमारे ६.७%) असे खाली आणले गेले आहे व ते या वर्षीपर्यंत (सन २०१९) तसेच कायम आहे. अमेरिकेला गरज असलेले मानवी संसाधनाला आकृष्ट करण्यासाठी H1B व्हिसा निर्माण झाला आहे व त्यासाठी शिक्षण ही 'मूलभूत अट' नसून 'देशात उपलब्ध नसलेले मानवी संसाधन आयात करणे' ही आहे... मुख्य म्हणजे H1B व्हिसा केवळ संगणकतज्ञांसाठी नसून त्यात नर्स, शिक्षक, वेटर, आचारी, हॉटेलमधील सेवांसाठी लागणारे कर्मचारी, इत्यादी अनेक व्यवसाय अंतर्भूत आहेत. सद्या, अमेरिकामान्य शिक्षण असलेल्या नर्सेसना H1B ची पायरी ओलांडून सरळ Green Card (जे फक्त मुख्य उमेदवारासाठी नसून, त्याच्या सर्व कुटूंबासाठी, म्हणजे पती/पत्नी आणि २१ वर्षाखालील मुले यांना एकाच वेळी, मिळते), किंबहुना त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण घेण्यासाठी, नोकरी देणार्या संस्थेकडून, मदतही मिळते आणि नोकरीसाठी आवश्यक परिक्षांची केंद्रे भारतात उघडली आहेत ! त्याविरुद्ध, Green Card मिळण्यासाठी डॉक्टर्ससाठी अनंत अडचणी आहेत आणि दहा-पंधरा वर्षे लागतात ! :) अमेरिकेत स्थलांतरीत होणार्या लोकांमध्ये उच्चशिक्षित लोकांचे प्रमाण असे आहे : (संदर्भ : https://www.pewresearch.org/fact-tank/2018/09/14/education-levels-of-u-… ) सन १९६० साली हे प्रमाण २.६% पदव्युत्तर शिक्षण आणि २.५% पदवी शिक्षण असे होते. ते हळू हळू वाढत सन २०१६ मध्ये केवळ १२.८% पदव्युत्तर शिक्षण आणि १७.२% पदवी शिक्षण इतकेच वाढलेले आहे. थोडक्यात, सद्या अमेरिकेत स्थलांतरीत होणारे ७०% लोक अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतात ! :)आता थोडेसे, "परदेशात स्थायीक झाल्यानंतर किंवा तेथे कामासाठी दीर्घ वास्तव्य असताना", लोकांत मिळणार्या मानाबद्दल, या पृथ्वीवर उत्तम आणि वाईट अशी वागणूक सर्वच ठिकाणी बाजूबाजूला आस्तित्वात असते... मग तो भारत असो की इतर कोणताही देश. त्या वागणूकीचा प्रकार खालील गोष्टींवर अवलंबून असतो : १. तुम्ही कोणत्या संस्थेत (ऑर्गॅनायझेशन) काम करत आहात २. तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात ३. तुम्ही आपल्या कामातली आपली पात्रता आणि तिची संस्थेला असलेली गरज, आपल्या कामाच्या प्रतीने, किती प्रमाणात पटवून दिलेली आहे. बाकी सगळ्या अंधश्रद्धा आणि कुरबुरी आहेत. पूर्णविराम.
अमेरिकामान्य शिक्षण असलेल्या
In reply to गैरसमजूतीवर/अज्ञानावर by डॉ सुहास म्हात्रे
या बाबतीत अनेक संस्था कार्यरत
In reply to अमेरिकामान्य शिक्षण असलेल्या by शलभ
अमेरिकेत जाणारे हे उच्य
चूक तर झालीय कबूल
मग सोडला की नाही भारत ?