गिरणीचा तो गप्प धुरांडा
ओकीत नाही आता धूर
परि भोंग्याची उगा भैरवी
ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!!
आताच चंद्रकांत गोखले यांची काहि मुक्तके वाचली त्यावरुन हा सारा लेखन प्रपंच करत आहे मिपाकर ह्याविषयी सांगोपांग चर्चा करतील अशी आशा आहे
उध्वस्त गिरणगावांचे प्रातिनिधिक स्वरुप एका बाजुला बंद गिरणीची चिमणी तर एका बाजुला धनदाडंग्यांचे
टोलेजंग टॉवर आता गिरण गावाचे टॉवर गाव नाव होणार
१९८० सालि बोनसची टक्केवारी वाढवून मिळावी म्हणून गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला. या संपाचे नेतृत्व शिवसेनाप्रणीत गिरणी कामगार सेनेने केले. संपाला चार दिवस झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, बोनस रक्कम वाढवून मिळणे अवघड असून संप मागे घेण्याचे आवाहन करताच कामगारांनी नाराजी व्यक्त करून मैदान सोडले. थेट डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपर येथील कार्यालयावर ते धडकले. कामगारांच्या आग्रहाखातर सामंत यांनी लढ्याचे नेतृत्व करायचे मान्य केले. केवळ बोनसच्या मागणीसाठी संप न करता ५८ कापड गिरण्यांतील अडीच लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावेत म्हणून १८ जानेवारी १९८२ पासून संप पुकारण्यात आला. संपाला गिरणी कामगारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहा महिने होऊनही गिरणी कामगार कामावर जात नव्हते. मुजोर गिरणी मालक व भांडवलशाहीला शरण गेलेल्या सरकारची संप दडपून टाकण्याची भूमिका यामुळे १९८२च्या दीर्घ काळ चाललेल्या ऐतिहासिक संपाचा अंत कामगारांच्या अध:पातात झाला.
मुंबईतील मालकांनी संप मोडण्यासाठी गिरण्या सुरू केल्या खऱ्या, परंतु अधिक काळ गिरण्या चालविणे त्यांना शक्य नव्हते. गिरण्यांतून मिळालेले भांडवल त्यांनी पूवीर्च इतर उद्योगांमध्ये गुंतविले होते. सरकारचे दुर्लक्ष, आधुनिकीकरणाचा अभाव व गैरव्यवस्थापन यामुळे हा उद्योग आजारीपणाच्या विळख्यात सापडला. मुंबईतील गिरणी मालकांनाही हा उद्योग चालविण्यात रस राहिला नव्हता. गिरण्याच्या जमिनीवर त्यांचा डोळा होता. आधुनिकीकरणासाठी बिनव्याजी भांडवलाची आवश्यकता असल्याने अतिरिक्त जमीन विक्रीची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी गिरणी मालकांनी सुरू केली. कामगार संघटनांचा जमीनविक्रीला प्रखर विरोध होता. सरकारही परवानगी देण्यास तयार नव्हते. जमीन विक्रीची परवानगी न दिल्यास आपण गिरण्या बंद करू अशा धमक्या मालकवर्ग देऊ लागला. १९८७ ते १९८९ या कालावधीत मालकांनी दहा गिरण्या बंद केल्या. २० हजार कामगारांचे संसार त्यांनी रस्त्यावर आणले.
तर ह्या मुंबईतल्या गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?
१ संपाचे नेतृत्व करणारे डॉ दत्ता सामंत
२ मुजोर गिरणी मालक
३ आपले नालायक राज्य सरकार
छायाचित्र गुगलसेवे वरुन
लेखाचा भाग मटा वरुन

वाचने
13703
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे मत काय?
असे का ?
In reply to तुमचे मत काय? by mamuvinod
परा साहेब हे माझे विचार नाहि म्हटले मी
In reply to असे का ? by परिकथेतील राजकुमार
वरिल सर्व जण
In reply to तुमचे मत काय? by mamuvinod
नालायक राज्य सरकार
शिवसेनाप्
अहो मराठी माणुस
In reply to शिवसेनाप् by मराठी_माणूस
लाल बावटा?
In reply to अहो मराठी माणुस by घाशीराम कोतवाल १.२
परिस्थिती
धन्यवाद
In reply to परिस्थिती by चिरोटा
पूर्वी झालेली चर्चा
तुमची प्रतिक्रिया
In reply to पूर्वी झालेली चर्चा by सुनील
+१
In reply to तुमची प्रतिक्रिया by प्रदीप
बँग ऑन
In reply to +१ by विकास
असेच म्हणतो
In reply to तुमची प्रतिक्रिया by प्रदीप
सगळेच
आय्.टी
मीही असे ऐकले!
In reply to आय्.टी by चिरोटा
कामगारांचा दोष
In reply to मीही असे ऐकले! by पिवळा डांबिस
थॅन्क्यू,
In reply to कामगारांचा दोष by विकास