Skip to main content

[शशक' १९] - क्लिन बोल्ड

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
अल्झायमरग्रस्त वृद्ध भाऊसाहेब म्हणजे जणू अजाण बालक.जानकी वहिनींसाठी पति पत्नीतील संवाद कधीचाच संपुष्टात आला होता.भाऊसाहेबांशी शब्दांच्या भाषेत केलेला संवाद म्हणजे जणू भिंतीशी संवाद करणं.साहजिकच दैनंदिन बाबींसाठी जानकी वहिनींनी शब्दाबरोबर अभिनयाची कास धरलेली. गेल्या आठवड्यात अचानक थंडीची लाट आली.मूल झालेल्या भाऊसाहेबांनी घरच्या मंडळींची नजर चुकवून कसं कोण जाणे पण फ्रीज ऊघडून पेप्सीची बाटली तोंडाला लावली.परिणामी शिंकांचा सपाटा सुरू आणि आसपासच्या मंडळींवर शेंबडाचं तुषार सिंचनही! सारं काही समजत असलं तरीही क्षणभर का होईना जानकी वहिनी रागावल्या आणि अभिनय करीत म्हणाल्या -खिशातलं कुठे आहे?ते तोंडावर धरा. यावर भाऊसाहेबांची गुगली-तुला रुमाल म्हणायचं आहे का ? वहिनी क्लीन बोल्ड.

वाचने 10520
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

निरागस गोष्ट आवडली पैजारबुवा

+१

+१ Sandy

.

परिणामी शिंकांचा सपाटा सुरू आणि आसपासच्या मंडळींवर शेंबडाचं तुषार सिंचनही! याची गरज नव्हती हो! बाकी जबरी! +१

जमलीं

छान!

+१

आवडली

+१ आवडली!

+१

+१.

.

+1

.

+१


+ १

+१

+१