Skip to main content

[शशक' १९] - तिकीट

[शशक' १९] - तिकीट

Published on 12/02/2019 - 18:05 प्रकाशित मुखपृष्ठ
"हॅलो..प्रदेशाध्यक्ष साहेब..तात्याराव बोलतो" "हा बोला.." "आमच्या तिकीटाचं सांगणार व्हते तुमी?" "तिकीट कन्फर्म आहे तुमचं ह्यावेळी..खोके पाठवा आन तयारीला लागा निवडणुकीच्या" "बरं...करतो व्यवस्था.." काही दिवसांनी.. "प्रदेशाध्यक्ष..गेम खेळू नका आमच्यासोबत..आप्पासाहेबाकडून पन खोके मागवल्याची खबर लागली आम्हाला" "विश्वास नाही का आमच्या शब्दावर? इलेक्शनसाठी मागवले त्यांच्याकडून खोके..तिकीट तुम्हालाच मिळणार तात्याराव ..कन्फर्म!" "मिळायलाच पाहिजे...लालनबाईचं प्रकरन अजून ताजं हाय....बाईला बोलतं करायला फार वेळ लागणार नाही आम्हाला...ध्यानात ठेवा" "आहे ध्यानात" . . . "हॅलो आप्पासाहेब..प्रदेशाध्यक्ष बोलतो.. तात्यारावांचं तिकीट कन्फर्म करावं लागेल असं दिसतंय.." "मग?" "करून टाका कन्फर्म.. "बरं.." "तात्याराव मांडलिकांचा अपघाती मृत्यू"….. पेपरमधील बातमी.. "द्रष्टे नेतृत्व हरपले," प्रदेशाध्यक्षांची शोकसंवेदना.

याद्या 50127
प्रतिक्रिया 50

कथा म्हणून आवडली. पण हे इतकं सहज सोपं असतं का कोणालाही मारणं?

In reply to by ज्योति अळवणी

हो

डिट्टो सिंवासन आठवला .. यांचा सत्कार करा , नि त्यो माणूस गायब .. जबराव जबराव जबराव

+१ विकृत राजकारणाचा आरसा. आपल्यासाठी हे पचवणं सोपं नसलं तरी सत्तापिपासू साठी अगदी अवघड नाही.

राजकारण हे असच असते

आवडली. 'सरकारनामा' आठवला. "सत्कार करा ह्यांचा" - यशवंत दत्त.

कथा आवडली, पण आजकाल पक्षबदलावर भर देतात म्हणे.. +१