Skip to main content

[शशक' १९] - गिनी पिग

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/02/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी " पक्या, बिंधास लिही. जिंकशील" " प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय" " ठीकाय, ह्या "खास"पेनने लिहून बघ. हे पेन नोबेल विजेते शास्त्रज्ञ नारगोळकरांना आजच मी बँकेत सही करायला दिलं होतं " " तुझ्या पेनने काय वेगळे दिवे लागणार? पण दे." . प्रणवचं पेन लिहायला घेतलं अन शशक झरझर सुचत गेली. मग फटाफट टंकून "कांदाभजी" वर टाकली. . माझ्या विजेत्या कथेला प्रतिसाद देणाऱ्या बहुतेकांनी लिहिलं होतं "कसलेल्या वैज्ञानिकाने लिहिल्या सारखी उत्तम जमलीय." . प्रणवच्या "ब्रेन-हॅकिंग-पेन" च्या यशाने मी स्तिमितही झालो होतो....अन चिंतितही !

वाचने 13329
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

+१ -गा.पै.

पेन नव्हे, कीबोर्ड आणला असेल नारगोळकरांचा.

+१ आधी आवडली नव्हती पण वाचता वाचता शेवटच्या लाईन वर आलो आणि आवडून गेली शेवटच्या पंचलाईनमुळे

+१

येक नम्बर राव . मस्तच

+१

शेवटचा पंच जोरदार

+१

+१

बहुदा मी इथे मिपावरच अशी कथा वाचली होती त्यातली पात्रे कलकत्यातील असावीत . दोघे कथालेखक असतात. त्यांच्यात खूप स्पर्धा असते. एक लेखक दुसऱ्या लेखकाला पेन भेट देतो. इथे हा लेखक त्या पेनने लिहीत असताना ज्याने भेट दिली तो लेखक त्याचा बॅकअप घेतो आणि ती कथा स्वताची म्हणून त्याच्या आधीच प्रकाशित करतो. अगदी थेट तशीच नसली तरी तशीच काहीशी ही कथा वाटली.

छान विज्ञानकथा

+१

हा हा. शेवट चांगला आहे.

+1

+१

+१


+१

+१

+१

नावीन्यपुर्ण कथा.. आवडली.

+१

म्हणूनच बॅंक वाले पेन बांधून ठेवतात.