Skip to main content

[शशक' १९] - ज्योतिष

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुजी - "मुलाच्या कुंडलीत राजलक्षण आहेत, फक्त पाण्यापासुन जपा, खुप जपा" ... ... "आज्जी, सगळेजण जातात सोसायटीच्या पुलमध्ये पोहायला, दहा फुटावरुन उडीपण टाकतात. मीच का नाही जायचे?" "नको रे बाळा, जाउदे त्यांना, तु हा लाडु खा" "जाउदेना आई त्याला, पोहायला शिकला तर कसला धोका रहाणार नाही. मी पुर्णवेळ जवळ थांबेन." "नवसाने झालेले एकुलते पोर, खबरदार पाण्याजवळ नेलेस तर" ... ... 'छे, आता घरी विचारण्यात अर्थ नाही. आजी उगीचच घाबरते. सगळे मित्र हसतात मला. दिवसा शक्य नाही, पण रात्री पुलाजवळचे लाईट बंद झाल्यावर चांगली दहा फुटावरुनच उडी टाकतो, बंटीचे लाईफजॅकेट घालुन.' ... ... 'ठपप..' वॉचमन - "काय पडलं टँकमधे आता? तळाचे प्लास्टरींग रिपेअर करायला आजच तर रीकामा केला होता

वाचने 6558
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

-१ लॉजिकली बरोबर वाटत नाही. कोणी कितीही अंधारात उडी टाकली तरी तलावात पाणी आहे की नाही हे समजतेच की

दहाच्या पूढे वय असेल तर पाय मुरगळला असेल. (माझा पाचवीला मुरगळला होता. आठ फूट उंच टाकीवरून उडी मारली होती.) पण सूर मारल्यावर काय होईल, कल्पना नाही.

एक सत्य घटना. मुलाला पाण्यापासून धोका आहे म्हणून आई वडिलांनी पोहायला शिकवले नाही. पिकनिकला गेला असताना चुकून तलावात पडून 16 वर्षांचा मुलगा पोहोता येत नाही म्हणून गेला. दुर्दैवी!