Skip to main content

[शशक' १९] - पूर्ण-अपूर्ण

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
वैदेही बाल्कनीत उभी होती. रिमझिम पावसात एकमेकांना बिलगत, मस्ती करत चाललेले अविनाश आणि नैना तिला दिसलेत. दहा वर्षांचा भूतकाळ तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा एकदा तिला आठवला. अशाच एका पावसाळी सायंकाळी अविनाशसोबत भविष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकपणे त्याने तिला त्याचे विचार ऐकवलेत. "मूल नको" हे विचार तिच्या सुखी संसाराच्या कल्पनेत अजिबातच बसणारे नव्हते. दोन वर्षांपासूनचं त्यांचं नातं तिने तडकाफडकी संपवलं. पुढे नैनाने अविनाशला त्याच्या विचारांसह स्वीकारलं. सतीशशी लग्न करुन वैदेहीने संसार थाटला आणि दोन मुलांना जन्म दिला. मात्र त्यानंतर सतीशचा तिच्यातला रस संपल्याने त्याने तिला घटस्फोट दिला. स्वतःला सावरत वैदेही बाल्कनीतून परतली. .. तसंही रेडिओवरचं 'खाली हाथ शाम आयी है..' आता संपतच होतं.

वाचने 4199
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

+1

.

+१

सतीश शी लग्न करुनही तिला मूल होऊ शकले नाही व त्याचा तिच्यातील इंटरेस्ट संपल्याने त्याने तिला घटस्फोट दिला ..असे लिहीले असते तर अधिक परिणामकारक झाले असते का?

In reply to by आंबट गोड

तुमी म्हणता तसा शेवट झाला असता तर मी प्लस 1 दिली असती या कथेला. शेवट जरा फिल्मि वाटला.

एकदा निर्णय घेतल्यावर वाईट वाटणं ठीक; पस्तावा असू नये असं वाटतं. तरीही +१

+१