Skip to main content

[शशक' १९] - टर्मिनेशन लेटर

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवडाभर बेंगलोर मध्येच तळ ठोकून होतो, पूर्ण टीमला कामाला लावलं पण कॉन्ट्रॅक्ट मिळवलंच. मुबंईत उतरल्यावर फोन सुरु करताक्षणी वाजला "सर, सकाळी अख्या टीमला टर्मिनेशन लेटर मिळाली" रडवेल्या आवाजात सुबोध. "काय? काहीतरी घोटाळा झालाय, मी बघतो". साहेबाना फोन लावला, त्यांनी उचलाच नाही. टॅक्सी करून थेट ऑफिसला. मधेच टीम मधल्या दोघं तिघांचे फोन तेच सांगायला, बायकोचा फोन तर घेतलाच नाही. संताप संताप नुसता. मला न सांगता विचारता टीमला टर्मिनेट केलं. तिरमिरीतच साहेबांच्या ऑफिसत घुसलो जाब विचारायला साहेबानी बसायची खूण केली पाणी पुढं केलं. "निर्णय पार वरून झालाय" साहेब म्हणाले "तू आज ऑफिस मध्ये येणार नसशील म्हणून तुझं टर्मिनेशन लेटर घरी पाठवले आहे"

वाचने 11186
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

कडक!!! =))) अश्या केसेस बघितल्या आहेत. +१

In reply to by जव्हेरगंज

खरं!!??? औघडे राव!

+१

+१

+१

कोणीतरी समजावा तर मतदान करता येईल

In reply to by ज्योति अळवणी

कथानायक कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बेंगलोर गेलेले असतो, तो परत आल्यावर त्याला कळते कि त्याच्या पूर्ण टीमला नोकरीवरून काढून टाकले आहे म्हणून तो जाब विचारायला जातो तर साहेब म्हणतो टीमच सोड तुलाच काढून टाकलंय

+१

.

आजच्या घडीचे करकरीत वास्तव. आवडली.

कटू वास्तव

+१

+1

चाबूक, काहींना पचणार नाही,आणि पटणार तर नक्कीच नाही

+१

+१


+१

वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी कथा.

+१

अनेक वर्षे वाचनमात्र होतो. लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता. सर्वांचे मनापासून आभार