Skip to main content

[शशक' १९] - आरसा

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/02/2019 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुरूप राणीने देशातले आरसे फोडून टाकले. तळी, विहिरीसुद्धा बंद. पण जसिंताच्या अप्रतिम सौंदर्याचं वर्णन वॅलेंटिन तिला प्रेमभराने सतत ऐकवत असे. एके दिवशी दोघांचं लग्न ठरलं. मग आली थेरडी भिकारीण. राणीने पढवलेलं गरळ ओकून गेली.. "किती ग बाई कुरूप तू! काय ते तिरळे डोळे..काजळासारखा चेहरा..पिवळे फताडे दात..विद्रुप कान.." दुखावून, शरमून जसिंताने लग्नाला नकार दिला. वॅलेंटिन म्हणाला, "च्च! आरसा हवा एखादा...चल राणीकडे." "बापरे, किती भयाण दिसते ही." राणी हसली. "डोकं फिरलंय राणीचं! " वॅलेंटिन भडकला. "उडवा त्याचं डोकं." कुऱ्हाडीचं पातं लख्खकन चमकलं. क्षणभर आरशात एक सुंदर चेहरा.. एक भयाण. दोन कर्कश किंकाळ्या घुमल्या. मारेकरी दचकला. वार चुकून वॅलेंटिन वाचला. -------------------------------------------------------------------------------- ही कथा खालील कथेवर आधारित आहे. https://www.gutenberg.org/files/10577/10577-h/10577-h.htm#link2H_4_0005

वाचने 5775
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

+१

+१

मस्तच

+१

अप्रतिम

मला कथा कळलीच नाही. मूळ कथा वाचल्यावर मग कळली. :(

+१