Skip to main content

[शशक' १९] - PhD

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
"phd झाली. आता नो अमेरिका. आधी लग्न.आता चर्चा नाही" वैशाली हिरमुसली. दुसऱ्या दिवसापासून ती हसतमुखाने घरच्या रेस्टॉरंटमध्ये लक्ष घालू लागली. बाबा खुश. तिने आलेल्या गिऱ्हाईकांसाठी स्वतः बनवलेले सूप द्यायला सुरुवात केली. ह्या ऑफरमुळे गर्दी वाढली. अचानक 2 दिवसानंतर तक्रारी सुरू झाल्या. काहीही खाल्लं तरी एकच चव लागत होती. कधी कॉफी तर कधी उसाचा रस. बाबा वैतागले. काहीच समजत नव्हतं. सगळं तपासून झालं. त्यांनी चाखून बघितलं, सगळं तर ओके होतं. त्यांनी वैशालीला सूप आणायला सांगितलं ते पिलं आणि बिर्याणी खाल्ली, चक्क कॉफी. बाबा हसले. ते म्हणाले,"चल मी पण येतो तुला सोडायला अमेरिकेला, मलाही कंटाळा आलाय". मनात म्हणाले,"ही आहेच हट्टी".

वाचने 4431
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

सविनय हट्ट!

फार नाही जमली

PhD आर्युवेदामधे केली व काढा सुप म्हणुन दिला एवढे कळलें

+१