Skip to main content

[शशक' १९] - शिक्षा

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
"आई माझ्याकडून कपबशी फुटली. . उठताना चुकून धक्का लागला. मला शिक्षा दे." सात वर्षाचा मोगु आईला सांगत होता. समजूतदार आई मनाशी हसली. " बाळा चूक झालीये ना. त्याची शिक्षा हवीच. तूच ठरव शिक्षा काय घ्यायची ते. तू शहाणा आहेस" " मी दहा मिनीटे कोपर्‍यात अंगठे धरून उभा रहातो" "ठीक आहे. तुला योग्य वाटतय ना " मोगु अंगठे धरुन उभा राहिला. आई अभिमानाने स्वतःशीच हसली. घाईघाईत कपाटात ग्लास ठेवताना तो घरंगळला. ओट्यावर पडून फुटला. समजूतदार आई मोगूला म्हणाली " बाळा आता चूक माझ्याकडून झाली काय शिक्षा देतोस सांग" " अगं आई ते तू चुकून झालं . मुद्दाम होऊन थोडंच केलंस. चुकून झालं त्याला शिक्षा कशाला ? " समजूतदार आईचे डोळे भरून आले.

वाचने 16279
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

+१

आवडली

+१

.

:)

+१

+१

+१

+1

+१

अत्यंत सहजपणे नातं समजावलं आहे

In reply to by नाखु

+१

+१

+१

+१

मुलाचा समजूतदारपणा आवडला

+१

+1

+1

+१


+१