[शशक' १९] - मासा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
5 Feb 2019 - 10:55 pm

श्रावणीला दगा देऊन व्हेरोनिकाशी सतिशने लग्न केले हे माझ्या पचनी पडले नाही. चांगला श्रीमंत मासा लागला होता माझ्या आणि श्रावणीच्या गळाला !!
पुढच्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीत मुद्दाम त्यांच्या घरी अचानक धडकलो . तिला बघून चाटच पडलो. इतकी सोज्वळ, सुंदर आणि सालस मुलगी ह्या ओबडधोबडला मिळाली याचा मला हेवा वाटला. गप्पा मारताना लक्षात आले की व्हेरोनिका फक्त सुंदरच नाही पण हुशारही आहे. विविध विषयात पारंगतही होती. चांगली मासोळी छे जलपरीच लागली की याच्या गळाला !!
सतिश नसताना एकदा तिला मी या विषयावर छेडले तर तिच्या सोज्वळ चेहर्याचा रंग बदलला आणि रूक्ष स्वरात ती म्हणाली,

"रेसिडन्स परमिट फुकट मिळतो काय? चांगलाच मासा लागलाय आता माझ्या गळाला !!".

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

6 Feb 2019 - 10:15 am | जव्हेरगंज

निम्मी कथा कळली. निम्मी नाही.
पण शेवट झकास...

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Feb 2019 - 10:35 am | ज्ञानोबाचे पैजार

कथा ठीकठाक आहे
पैजारबुवा,

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2019 - 7:33 pm | मराठी कथालेखक

छान..फक्त हा लिहिणारा 'मी' कोण आहे हे नीटसं कळालं नाही.. श्रावणीचा बाबा असेल बहूधा.

सिद्धार्थ ४'s picture

7 Feb 2019 - 11:01 am | सिद्धार्थ ४

+१

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2019 - 1:38 pm | ज्योति अळवणी

मी कोण?

योगी९००'s picture

7 Feb 2019 - 3:57 pm | योगी९००

मी कोणीही असू शकतो...श्रावणीचा बाबा असू शकतो किंवा तिचा होणारा नवरा ज्याने ह्या ओबडधोबड श्रीमंताला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता...पण नक्की कोण कोणाच्या जाळ्यात सापडलेय हे शेवटच्या वाक्यावरून कळतंय... +१

विनिता००२'s picture

7 Feb 2019 - 3:57 pm | विनिता००२

व्हेरोनिका हे नाव परदेशी आहे, मग देशी मुलाशी लग्न करुन तिला कसे परमिट मिळाले ?

मासा ती असती तर जास्त वास्तव झाली असती. :)

पद्मावति's picture

7 Feb 2019 - 4:06 pm | पद्मावति

कथा आवडली +१
विनिता, मला वाटतं, तेच धक्कातंत्र आहे. व्हेरोनिका हि ऑस्ट्रेलियन नागरिक आणि सतीशने तिच्याशी सिटीझनशिपसाठी लग्न केले हे फार सरळधोपट झालं असतं. या कथेत नेमकं विरुद्ध आहे.

योगी९००'s picture

7 Feb 2019 - 7:23 pm | योगी९००

कदाचित उलट पण असू शकेल...सतिश श्रीमंत आहे म्हणून श्रावणी त्याच्या मागे असेल पण सतिशने अचानक व्हेरोनिकाशी लग्न केले असावे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी. तो तिला पैसे देणार असेल त्या नागरिकत्वासाठी...

व्हेरोनिका ही रशियन /मेक्सीकन मुलगी आहे.
सतिश हा ऑस्ट्रेलियात स्थाईक झालेला भारतीय आहे.
कथा श्रावणीचा बाबा साम्गतोय.
" रेसिडन्स परमिट फुकट मिळतो काय? चांगलाच मासा लागलाय आता माझ्या गळाला " हे वाक्य पूर्वी श्रावणीच्या बाबाने उच्चारले होते.
ते वाक्य सतीश ने व्हेरोनिकाला शिकवून ठेवलेले होते. व्हेरोनिकाने ते आत्ता म्हणून दाखवले इतकेच.
पण श्रावणीचा बाबा सतीश च्या घरी गेलाच कशाला?

योगी९००'s picture

7 Feb 2019 - 7:27 pm | योगी९००

पण श्रावणीचा बाबा सतीश च्या घरी गेलाच कशाला? - असेल पुर्वीची ओळख...नाहीतर याचे काय चाललंय ते पहायला. मुद्दाम त्याने व्हेरोनिकाला विचारलेच ना की कसे काय याच्याबरोबर लग्न केले ते?

तेजस आठवले's picture

7 Feb 2019 - 6:45 pm | तेजस आठवले

श्रावणीची आई आणि श्रावणी सतीश नावाचा मासा श्रावणीचे आमिष दाखवून गळाला लावायचा प्रयत करत होती. पण तो व्हेरोनिकाच्या गळाला लागला.कारण एकच.

बोरु's picture

14 Feb 2019 - 8:17 pm | बोरु

निवेदक पुरुष आहे. अनेकदा ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्याच्याकडे दुसरं सबळ कारण आहे. ते बहुधा श्रावणीचे तेथील वास्तव्य. म्हणजे श्रावणीला सतीशचा पैसा भावला होता, पण रेसिडेन्स परमिटची निकड नव्हती किंवा व्हेरोनिका खरंच दिसण्यात उजवी होती व शिवाय तिने अचूक गळ टाकला.
फक्त व्हेरोनिकाने या त्रयस्थाला कबुली देण्याचे कारण काय ?