कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर! म्हणून उदासीन पंथी!
जगणे माझे कसे, उमगले मला आज रे
क्षणाक्षणाचे मरणे करते हसुन साजरे
सुखमय आयुष्याचे फसवे देखावे ते
डामडौल तो पोकळ छळतो पुन्हा आज रे
भेसुर वास्तव कुरतडते या मुक्या मनाला
या दुखण्याला नाहि उतारा, ना इलाज रे
नुसती घुसमट, रडणे, कुढणे अन तडफडणे
अस्तित्वाची माझ्या वाटे मला लाज रे
गुन्हा न ठाउक तरी भोगणे जन्मठेप ही
श्वास पहार्यामधले, केवळ नाइलाज रे
संपव मैफल रंगहीन अन केविलवाणी
जीवनगाणे बेसुर झाले, तुटे साज रे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2205
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मैफल
शब्दबद्ध चांगली केली आहेस.
छान लिहले
विमनस्क
ओह
छान.
गुन्हा न
धन्यवाद.