Skip to main content

[शशक' १९] - भूक

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते. एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला. फिरून फिरून तो दमला. त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक ! ते कसे मिळवावे? तो विचारात पडला. कोल्हा हुशार होता, लोक त्याच्या हुशारीला लबाडी म्हणत. पण लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे? तर कोल्ह्याने युक्ती केली. एका रात्रीत एक गाय आणि एक डुक्कर मारले आणि त्या माणसांच्या वस्तीत टाकून दिले. त्यानंतर अनेक दिवस कोल्ह्याला माणसाच्या मांसाची ददात राहिली नाही.

वाचने 28477
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

+१

+१.

+१

.

+१ Sandy

मस्त

पहिल्यांदा काही कळलेच नाही, उशीरा ट्युब पेटली पैजारबुवा,

उत्तम

+१

आवडली. वास्तवदर्शी.

निव्वळ अप्रतिम

+१


+१

हा कोल्हा चिनी म्हणायचा कि पाकिस्तानी का आपला नेता , हिंदुस्थानी ?

+१ -दिलीप बिरुटे

+१

+१

-1 कोल्ह्याच्या ऐवजी कावळ्याच्या नावाने हि कथा कायप्पावर ढकलपत्रात वाचली असल्याचे स्मरते .

In reply to by किसन शिंदे

स्पर्धेमधे जिंकणाऱ्यात वगैरे यायची शक्यता निर्माण झाली तर 'बाद ठरवायचे का' यावर विचार चालू करावा. तोपर्यंत विचार करायची गरज नाही. हे म वै म. चित्रपट, मालिका, साहित्य यामध्ये सारख्याच कल्पना बऱ्याचदा रिपीट होत रहातात. त्यांचं एक्सिक्युशन कसं केलं आहे हेदेखील महत्वाचं असतं.

In reply to by असहकार

सहमत. चोप्य पस्ते कथा ठोकून दिलीये इथे.

+1

आवडली!

+१

+१

पण एक छिद्रान्वेष. गाईचं ठिक आहे पण नुसतच डुक्कर मारल्यावर विशिष्ठ धर्मातली लोकं काही करणार नाहीत हो. हां, मटणाच्या दुकानात (जवळ) टाकलं असतं तर शक्यता होती. पण मग शब्दसंख्या वाढायची भीती आहेच.

जबरि

+१

-१

+१

+१

माझ्यासारख्या पाल्हाळ-वेल्हाळ माणसाला १०० शब्दात काही लिहिणे म्हणजे शिक्षाच. तरीही कथा आवडून घेतलेल्या सर्व वाचकांचे आभार. _/\_ काहींना 'भूक' ही कथा अन्यत्र वाचली असल्यासारखे वाटले, त्याबद्दल: एमी यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे चित्रपट, मालिका, साहित्य यामध्ये सारख्याच कल्पना बऱ्याचदा रिपीट होतात. कथा कल्पना नाविन्यपूर्ण नाही हे मान्य आहे. मला ही कथा बराकपूर छावणी येथे मंगल पांडे स्मारकाला दिलेल्या भेटीवरून सुचली - दीड शतकापूर्वी गाय आणि डुकराची चरबी वापरलेली काडतुसे ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना दिल्याचा प्रसंग आठवून. पिताश्रींना कथा वाचायला दिली तर त्यांना माझ्या जन्मापूर्वीचा लेख टंडन चा 'जहाँ प्यार मिले' (शशी कपूर - हेमा मालिनी) चित्रपट आठवला, पण तो चित्रपट मी आजवर बघितलेला नाही. मी कथा कोठूनही 'कॉपी पेस्ट' केली नाही एव्हढेच सांगू शकतो. लोभ असावा, अनिंद्य