Skip to main content

आणखी काही मुक्तके

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 16/03/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती अशाश्वताच्या वळुनी मुठी, शाश्वतावर चढवु हल्ला, असंतोषाचा करुनी भाला, काळावरती घालु घाला..!!
गवंडी घाम घालतो रक्त सडा अन जखमातुन गळतो पू मरणारा परी मरे परंतू जगणा-यांचे त्यावर कंपू...!! भिकारी बन्द गिरणीच्या गेटा वरती भीक मागतो एक भिकारी घेउनी हडांची जीर्ण पंजरी द्या हो म्हणतो मला नोकरी अन गिरणीचा तो काळाठिक्कर असूनी दगड क्षणांत रडला हे श्रमाचे हात बळकट नको पसरवुनी दाउ वदला... गिरणीचा तो गप्प धुरांडा ओकीत नाही आता धूर परि भोंग्याची उगा भैरवी ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2086
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

गिरणीची कविता उत्तम.. एकदम भिडणारी ! -- लिखाळ.

लै बेस्ट ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

दिसते. मुक्तके आवडली. (गिरणीच्या कवितेतली शेवटची एक सहज-भावूक समारोपी ओळ मर्ढेकरांनी लिहिली नसती असे वाटते - हा तुमचा खास आपला शिक्का.)

खास! (गिरणगावी)बेसनलाडू

खरच मर्ढेकरांची आठवण झाली. उत्तम. *चिरविजयी*

चांगले आहे.

गिरणीचा तो गप्प धुरांडा ओकीत नाही आता धूर परि भोंग्याची उगा भैरवी ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!! हे गिरणगावचे दाहक सत्य आहे गिरण्याबंद झाल्या गिरिणी कामगार बेरोजगार झाला त्याच्या हातचे काम सुटले बायका पोर रस्त्यावर आले खायचे वांदे झाले मग ह्या गिरणी कामगारांच्या मुलांसमोर एकच पर्याय उभा होता मारा वा मरा मग जन्माला आले गॅगवार उदय झाला भाइ आणी दादा लोकांचा मग हिच पोर कधि विरुध गॅग किवा पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडली ( गिरणगावातला) घाशीराम कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

व्वा, सुरेख !! स्वप्नातले महाल कसे रत्नजडीत असतात वास्तवातल्या झोपड्यांना वेदनांचेच टेकु असतात. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)