Skip to main content

[शशक' १९] - कल्याण

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुलासाठी माध्यम मराठी की इंग्रजी निवडावं? हा प्रश्न पडला होता. मायमराठीत प्राथमिक शिक्षण उत्तम हे तज्ञांचं मत योग्य वाटत होतं. इंग्रजी माध्यमातली मुलं स्पर्धेत पुढे जातात. तिथेच मुलाचं कल्याण होईल असं जनमत होतं. मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपण मुलाच्या कल्याणात बाधा आणली असं नको व्हायला म्हणून निमूटपणे इंग्रजी नर्सरीसाठी प्रवेश घेतला. शाळा जूनमधे चालू होण्यापूर्वीचा एक रविवार मुलाला चित्रातून ओळख करून देण्यासाठी निवडला. पुस्तकातल्या "अॅपलच्या" चित्रावर बोट ठेवून "अॅपल" म्हणायला सांगितलं. पण मुलगा म्हणाला "सफरचंद". मी पुन्हापुन्हा सांगूनही तो मलाच त्या चित्रासाठी त्याने अलिकडेच शिकलेला शब्दोच्चार शिकवत राहिला. "स-फ-र-चं-द". त्याचं कल्याण कशात ते त्याच्याकडूनच कळालं. मराठी माध्यम निवडलं. कल्याण झालं.

वाचने 4628
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ए - फॉर सेब बी - फॉर गेंद सी - फॉर बिल्ली डी- फॉर कुत्ता असे म्हणणार्‍या मुलांचा व्हीडीओ आठवला पैजारबुवा,

अगदी माझा मुलगा पण F फॉर माशा आणि E फॉर हत्ती असे बरेच म्हणतो. प्रसंगोचित कथा

+१

छान!

उत्तम

मस्तय शशक . आवडली

वास्तव .....

+१