Skip to main content

[शशक' १९] - क्रॉस कनेक्शन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो : आज नक्कि ना ? मी : हो . तो : कसं ओळखायचं ? मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन . तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट. मी : ९ वाजता . भारत कॅफे . तो : डन . .पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड. सकाळची कामं आवरली . इशाचा टिफिन , शाळेची घाई आवरुन मिलिंदचा ब्रेकफास्ट . ”आज साडेआठला निघेन .कॉल आहे एक ,तो आवरुन मिटिंगलाच जाईन “ . झाली का पंचाईत . हा निघाल्याशिवाय निघणं कठिण . तो निघाला कि लगेचच निघु म्हणत घड्याळाकडे पाहिलं . ७ :५० .केसांना कंडीशनर मेहेंदी लावुन , चेहर्यावर फेस पॅक लावुन बेडरूम मध्ये आले तर हादरलेच . बेडवर ऑरेन्ज कलरचा, काळ्या लाइन्स असणारा ठेवनीतला शर्ट ,ब्लॅक पँट . “मिलिंद ?? “

वाचने 42594
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

हा हा हा... तिला एकदम पोटात कुणीतरी बुक्की मारल्यागत वाटलं असंल!!

ब्याडलक दोघांचेही पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अंदाज आला होताच तरीही आवडली.

कोण स्त्री आहे आणि कोण पुरुष हे नीटसं कळत नाहीये. मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन . हे कपडे एक आकर्षक स्त्री घालू शकेल काय या विचारात आहे...इथे 'मी' म्हणजे स्त्री आहे असा अंदाज येतोय पण या कपड्यांनी गोंधळ होतोय... थोडं शुद्धलेखनदेखील (नक्कि, कठिण, निघु, लावुन) व्यवस्थित हवं होतं. असो. कल्पना मात्र चांगली होती.

In reply to by समीरसूर

> तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स > असला शर्ट आकर्षक पुरुष घालू शकेल का?

In reply to by एमी

कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते...कृपया समजावून सांगाल का? स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता वगैरे असा काही संदर्भ आहे का? मला माफ करा. _/\__/\__/\__/\_ माझा काहीही दुसरा उद्देश नव्हता. काय हो सारखं सारखं तेच तेच...कंटाळा नाही येत का? :-) माझा मुद्दा निराळा आहे. जरा समझा करो... जाऊ द्या आता.... :-)

In reply to by समीरसूर

समजवण्यासारखं काही नाही त्यात. तुम्ही जसा "हे कपडे एक आकर्षक स्त्री घालू शकेल काय या विचारात आहे..." विचार केला तसाच मी "ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स असला शर्ट आकर्षक पुरुष घालू शकेल का?" असा विचार केला. आणि तो तुम्ही लिहलेल्या प्रतिसादखाली लिहला.

In reply to by एमी

उत्तरः घालू शकेल. सहसा पुरुष (कुठलाही) शर्ट घालतात; लाल कुर्ता-पांढरा पायजमा स्त्रिया सहसा घालत नाहीत. बाकी ती पायजमाच काय, लुंगी आणि बनियन घालून आणि निळा-काळा रुमाल गळ्याभोवती गुंडाळून, तोंडात गुटख्याचा तोबरा ठेवून 'तो'ला भेटायला गेली तरी माझी हरकत नाही. 'तो' मात्र पळून जाईल एवढे नक्की. बहुतेक मिलींददेखील पळून जाईल. ती बसेल मग (अकारण) ठणाणा बोंबलत आणि पिंका टाकत!!!

In reply to by एमी

अरे वा, चक्क स्माईली!!?? आज पार्टीच करावी लागणार मला...पायजमा घालून. :-) कजरा रे, कजरा रे, धन्य भाग हमारे; नळी फुंकली सोनारे, खारे वारे, मतलई वारे, रे मामा रे मामा रे, हे जी रे, ते जीरे....बघा, पार्टी सुरू व्हायच्या आधीच काय झालंय...हे जीरे, ती मोहरी, दालचिनी भारी भारी, मसाल्याशिवाय खरे सांगा, होईल कशी चिकन करी?? वा वा वा...आयुष्याला चपखल बसेल अशी ओवी झालीये ही... :-):-)

छान ! णाईट रायडर आण्ण्ड व्हाईट लिली नाटक अठवलं.

+1 पायजमा शब्द आल्याने लाल कुर्ता घालणारी व्यक्ती 'तो' की 'ती' हा गोंधळ माझाही झाला (पुढचे वाचेपर्यंत). चुडीदार, सलवार हे शब्द चालले असते. यावरून ही शशक पुरूष सदस्याने लिहीलीय असं समजायला हरकत नाही ;)

In reply to by स्मिता.

पायजमा म्हणतात बरयाच मुली बोलताना. मराठी आंजावर एकेक शब्द पकडून तो योग्य आहे का याचा काथ्या कुटला जातो हे पाहिलं आहे. पण बोलताना एवढं स्पेसिफिक कोणी (सर्वसामान्य लोक) बोलत नाहीत...

In reply to by किसन शिंदे

नाय. पण इथे दोघांनी व्यक्त केलंय तसा गोंधळ मलातरी वाचताना जाणवला नाही. उलट कुर्ती आणि सलवार हे शब्दांचे काँबो मला ऑड वाटले असते. फक्त सलवार शब्द कोणी बोललं तरी मला कंफ्युज होतं, कमीजसोबत आला तर कळत :D

In reply to by एमी

मी कधीही कुठल्याही मुलीला स्वतःच्या सलवारीला, किंबहुना कुठल्याही प्रकारच्या कपड्याला, पायजमा म्हटलेले ऐकलेले नाहीये. कार्यालयात मुली एखाद्या दुसर्‍या मुलीच्या कपड्यांचं कौतुक करत असतांना "अरे वा, अबोली, छान आहे तुझा पायजमा!" किंवा "अरे वाह, समायरा, पजामें में तो कहर ढा रही हो आज. कितनों के कत्ल का इरादा हैं?" असे बोलतांना ऐकलेले नाहीये. अर्थात, माझं सगळंच चुकीचं असल्याने ही माहितीदेखील चुकीचीच असणार याबाबत मला शंका नाही. विशेष म्हणजे एका स्त्री मिपाकरलादेखील हा गोंधळ जाणवला म्हणजे त्यात तथ्य नक्कीच आहे...

In reply to by समीरसूर

> "अरे वा, अबोली, छान आहे तुझा पायजमा!" किंवा "अरे वाह, समायरा, पजामें में तो कहर ढा रही हो आज. कितनों के कत्ल का इरादा हैं?" > लेगिंग शब्द वापरतात. पण लेखकाला इंग्रजी शब्द वापरायला नको वाटला असेल. कुर्ता-पायजमा, कुर्ती-लेगिंग, सलवार-कमीज हे असेचकॉम्बो असावेत शब्दांचे/कपड्यांचे/कपड्यांसाठीच्या शब्दाचे. ते एकदुसऱ्यासोबत वापरले तर गोंधळ उडणार... === बादवे > अर्थात, माझं सगळंच चुकीचं असल्याने ही माहितीदेखील चुकीचीच असणार याबाबत मला शंका नाही. विशेष म्हणजे एका स्त्री मिपाकरलादेखील हा गोंधळ जाणवला म्हणजे त्यात तथ्य नक्कीच आहे... > या वाक्यरचनेत काही चुकल्यासारखे वाटतेय का? मला वाटत 'विशेष म्हणजे' च्याऐवजी 'पण तरीही' हवं होतं :D

In reply to by समीरसूर

https://www.maayboli.com/node/68982?page=1#new हे बघा. आताच तिथे 'माझे कुर्ते-पायजमे' म्हणणारी स्त्री दिसली. (तो माझा आयडी नाही :-P)