Skip to main content

मरणावरती बोलू काही

लेखक खिलजि यांनी सोमवार, 24/12/2018 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
तर मिपाकरांनो , आज आपण सर्व एका आगळ्यावेगळ्या , काही प्रमाणात नकोश्या वाटणाऱ्या या मरणावर बोलूयात . कदाचित हा विषय , मला माहित नाही पण याआधी इथे चर्चिला गेलाही असेल पण मी बोका साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत तोच विचार मनात घोळवत आलोय ... जगण्याचं कारण इथे प्रत्येकाकडे असतं किंबहुना ते असावंच लागतं, तेव्हा कुठे जगणं जीवन बनतं . पण मरणाबद्दल काय ? त्याच्या बद्दल कुणाकुणाला काय वाटतं .. मला विचाराल तर मला मरणाकडून फार सुंदर अपेक्षा आहेत .. वयाची अठ्ठाविशी ओलांडण्यापूर्वी मला सीमेवर वीर मरण पाहिजे होतं पण आता ते शक्य नाही . कारण मी ती वयोमर्यादा ओलांडल्यामुळे कुठल्याही सैनिक/पोलीस भरतीसाठी पात्र ठरत नाही . आता निदान कुढत कुढत अक्षरशः कुणावरतरी ओझं बनून मरायचं नाही आहे . मला मरण हे नैसर्गिक आलेलं आवडेल . कुठलातरी असाध्य आजार होऊन, औषधे खाऊन , मरणासन्न होऊन मरायचं नाही आहे . मला मरण्यापूर्वी किमान पन्नास झाडं लावून त्यांचं यथासांग संगोपन करायच आहे . ती पूर्णपणे जोमात वाढलेली बघायची आहेत. रक्तदान करायचं आहे . आतापर्यंत दहावेळा केलेलं आहे . त्यामध्ये सात वेळा मी माझ्या आईसाठी दिलेले आहे आणि तीन वेळा मित्रांसाठी . पण किमान शंभरी गाठायची आहे . आणि मेल्यानंतर माझ्या वापरण्यायोग्य अवयवांचे दान , कुणातरी गरजूला . मागील गेले तीन वर्षे , आईच्या आजारपणापासून मी नित्यनेमाने वाशीखाडीपुलावर उभा राहून दोनशे रुपयांचा खाऊ समुद्रात अर्पण करतो . सुरुवातीला मी वीस रुपयांचा खाऊ द्यायचो , आता वाढत जाऊन ते दोनशे रुपये झालेले आहेत . आशा आहे कि ते असेच वाढत जाऊन लवकरच दोन हजार रुपये व्हावेत . चिक्कार दानधर्म करायचा आहे आणि समाधानाने वर जायचे आहे . तर पन्नास झाडे , रक्तदान , अवयव दान ( मरणोत्तर ) आणि दानधर्म आणि वाराच्याकडून बक्षीस म्हणून एक सुखासीन मरण पाहिजे . कसं ते त्याने ठरवावं पण त्याआधी निदान कर्णाच्या बाजूला नसलो तरी एक पाऊल मागे असावं .. हीच त्या विधात्याकडून अपेक्षा आहे .. मला मिपाकरांच्या मरणाबद्दलच्या संकल्पना ऐकायला आवडतील .. जेणेकरून मीही ठरवेन कि मरण कसं असलं पाहिजे .. कृपया आपला अभिप्राय इथे नोंदवावा आणि हो उद्या मी नसणार आहे तेव्हा मी आपले अभिप्राय परवा वाचेन बरं का आणि त्यावर प्रतिसादेन . नाताळाच्या आगाऊ शुभेच्छा सर्वाना . सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचने 27551
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

इतकेच सांगू शकेन की मरणाइतका अन्य कुणी सच्चा सखा नाही. मरणाहून अधिक शाश्नत, सत्य असे अन्य काहीही नाही.

टर्मिनेटर साहेब , हा जो कबुतरांचा त्रास होतो ना त्याला आपणच जबाबदार आहोत .. जर आपण आपापल्या खीडक्या नीट मोकळ्या ढाकळ्या ठेवल्या तर मला वाटते कबुतरे तिथे संसारच मांडणार नाहीत . स्वतः बघितलेले आहे म्हणून सांगतो . आमच्या इथे लोकांनी कबुतरे येऊ नये म्हणून , जाळ्या लावलेल्या आहेत आणि बरीच अडगळ तिथे मांडून ठेवलेली आहे . मी टॉप फ्लोअरला राहत असल्याने माळ सर्व व्यवस्थित दिसते . होते काय कि , त्यातील बर्याच जाळ्या कालांतराने खराब होतात आणि कबुतरांना म्हणा किंवा चिमण्यांना म्हणा तिथे आयते बस्तान मांडायला वाव मिळतो .. पिलावळ वाढली तर आणि उडून गेली तर ठीक पण काही कारंणाने कावळ्यांनी हल्ला चढवला तर तिथे त्या अडगळीतच घाण होते आणि मला वाटत सणासुदीखेरीज आजकाल कोण अश्या ठिकाणी साफसफाई करत नाही . तेव्हा मग पुढे सर्व घाणीचे साम्राज्य चालू होते .. बाकी मी जे काही करतो ते माझे नित्यकर्म म्हणून करतो आणि पुढेही करत राहीन . धन्यवाद

स्वतःपुरते बोलायचे झाले तर असे काहीतरी करत असताना अचानक मरण यावे, असे वाटते: ... .

बिस्किटे समुद्रात टाकण्याची आयडिया एकदम भारी. ती बिस्किटे मैद्याची-अर्थात ग्लुटेनयुक्त असल्याने खरेतर मुलांनीच काय, कोणीही खाऊ नयेत.

मी डेस्क टॉप समोर बसलो आहे . यु ट्यूब वर नय्यर चे गीत नटखट मधुबाला सादर करतेय ... हावडा ब्रीज ये "क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया .. . अन माझे व निसर्गाचं दिल वेगळं राहत नाही ,,,, मान डेस्कवर कलते ......शांतपणे ... बायको स्वयंपाक घरातून येते .." अहो जेवायला चला ...... आय ऍम नो मोअर ... !

जब्बरदस्त कल्पना .. मला आवडली .. मलाही वाटते कि मरण्याआधी माझ्या प्राणप्रिय बायकोला माझी काही कृष्णकृत्ये सांगून मरावं .. वरच्याने एक मुभा दिली पाहिजे , ती हि कि निदान काही मिनिटे आधी तरी कल्पना यावी कि मी जाणार आहे आणि ती शेजारी असावी . तिने काही बडबड करण्याआधी मी तिला सर्व सांगून टाकावे आणि अचानक एक तीव्र कळ आली पाहिजे आणि खेळ खल्लास .. कशी वाटली कल्पना ..

In reply to by खिलजि

कृष्णकृत्ये करू नयेत, केली तर लपवू नयेत आणि लपवली तर कधीही उघड करू नये. मरताना बायकोला आपली कृष्णकृत्ये सांगितली तर बायकोला आपल्या बद्दल काय वाटेल याचा विचार करून पहा. ती फारच वाईट असतील तर बायको आपला द्वेष करणार असेल तर मरताना तिला दुःख देऊन काय मिळवणार? आणि तेवढी वाईट नसतील तर आता आपल्या मनावर आपण ओझं बाळगताय ते तिला आजच सांगून मोकळे व्हा.

In reply to by सुबोध खरे

खरंय , तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे .. विचार केला जाईल यावर , धन्यवाद साहेब .. अमूल्य मार्गदर्शनाबद्दल

मी कमावलेले ९९% पैसे मला हवे तसे खर्च करून (१% अंत्यविधीसाठी शिल्लक ठेवून) मरावेसे वाटेल. कसं आहे ना , प्रत्येकाच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. काही सुप्त आकर्षण असतात जसेकी दारू , सिगारेट , गांजा , कुठल्या जागेवर जाणे (हिमालय , काशी , कुठले देवस्थान वा कुठला किल्ला दुर्गम जागा वगैरे ) नर्मदा परिक्रमा , पंढरपुरची वारी , वेगवेगळ्या देशातले पदार्थ खाणे , कुठले तरी संगीत ऐकणे , कोणते तरी चित्र डोळे भरून पहाणे , कुण्यातरी व्यक्ती बरोबर वेळ घालवणे , काहीतरी वस्तू खरेदी करणे ,याशिवायही भरपूर काही इच्छा असू शकतात पण काही कारणांमुळे मुख्यतः समाजाचे अदृश्य जोखड असल्यामुळे पूर्ण करायच्या राहून जातात. तर अश्या माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून मरण आलेले आवडेल. मग पन्नाशीत का साठीत का चाळीसीत त्याने फरक पडणार नाही.