आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
नमस्कार मंडळी
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पुढील वर्षी माझे चिरंजीव इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. इयत्ता ७ वी पर्यंत त्याची इंग्लिश माध्यम शाळेतील प्रगती समाधान कारक व उल्लेखनीय आहे. आतापर्यंत त्याला कुठल्याही क्लासेस ची गरज पडली नाही. शाळेच्या अभ्यासासोबत त्याने तबला व गिटार वादन शिकून घेतलं, सोबत स्थानिक व्हॉलीबॉल क्लब कडून १८ वर्षाखालील वयोगटातून जिल्हास्तरावर खेळतो आहे. १ महिन्यापूर्वी त्याने अखिल भारतीय स्तरावरील RIMC ची प्रवेश परीक्षा दिली. परीक्षा त्याला अवघड गेलेली आहे हे त्याने स्पष्टपणे सांगितले. त्यांनंतर नुकतीच त्याने नवीन मागणी केलेली आहे ती म्हणजे कोटा, राजस्थान पॅटर्न च्या क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायचा कारण त्याच्या वर्गमित्राने तिथे मागील १ वर्षांपासून प्रवेश घेतला आहे शिवाय प्रवेश घेतल्या नंतरची वर्गमित्राची प्रगती खूप चांगली आहे. वर्गमित्राचा मोठा भाऊ गेल्या ४ वर्षांपासून त्या क्लासचा विद्यार्थी असून त्याची प्रगती देखील लक्षवेधक आहे. माझ्या मुलाच्या म्हणण्यानुसार तो कुठलाही क्लास नसल्यामुळे वर्गमित्रापासून मागे पडत चालला आहे, RIMC ची प्रवेश परीक्षा देखील त्यामुळे अवघड गेली कारण शाळेमधील अभ्यासक्रम पुरेसा नाही. त्याची शाळा देखील नावाजलेली असून शाळेने आतापर्यन्त अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. पण शाळेतील शिक्षिका व शिक्षक सुद्धा उघडपणे अशा क्लासेस ची पाठराखण करतात. मुळात माझा प्रश्न हा आहे कि, अशा क्लासेस ची अवाढव्य फी भरून अपेक्षित प्रगती होते का ? ह्याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत ? खरोखरंच अशा क्लासेस मुळे जे ई ई मेन्स व अडवान्सड, नीट, इतर कॉम्पेटेटिव्ह परीक्षा, एन. डी. ए. आदी परीक्षेमधील यशाचा मार्ग सुकर होतो काय ? ह्या क्लासेस व्यतिरिक्त इतर कुठल्या पद्धतीने आपण ह्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो ? सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत हाय पेड क्लासेस एक यशस्वी टूल बनले आहे का ? शालेय शिक्षणावर माझा पूर्ण विश्वास आहे पण त्याव्यतिरिक्त ह्या क्लासेस चा खरोखर उपयोग होतो का ?
याद्या
5801
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
कळीचा प्रश्न !!
होय...
सध्या तरी ही शिक्षण पद्धती
In reply to होय... by समीरसूर
क्लासेसचं 'मटिअरिअल', नोट्स
अग्रवाल क्लासिज ??????
In reply to क्लासेसचं 'मटिअरिअल', नोट्स by कंजूस
अररर.
In reply to अग्रवाल क्लासिज ?????? by रानरेडा
बंदही झाले का? हो ३० वर्षापूर्वी
In reply to अररर. by कंजूस
धन्यवाद कंजूस काका !
In reply to क्लासेसचं 'मटिअरिअल', नोट्स by कंजूस
मुलांना जर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायचे असेल तर....
धन्यवाद मुवि,
In reply to मुलांना जर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायचे असेल तर.... by मुक्त विहारि
उद्या जाऊन माझ्या मुलाने शेती केली तरी मला काहीही हरकत नाही.
In reply to धन्यवाद मुवि, by nashik chivda
हे एक कायप्पा ढकलपत्र आहे.
या विषयावर माझा लेख