सकारात्मक कटाक्ष - १ (हेल्मेटसक्ती)

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in काथ्याकूट
5 Dec 2018 - 5:03 pm
गाभा: 

गाभा : विचारांचं सामर्थ्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो.
सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते.
त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं.
मनात येणाऱ्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा.
जर आपण परिस्थितीच्या अवगुणांकडे न पाहता गुणांकडेच पाहले, तर आपण त्या परिस्थितीत आनंदी राहू शकतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हेल्मेटसक्तीकडे जर मी सकारात्मकपणे पाहिले तर खालील फायदे माझ्या मनात येतात. तुम्हालाही काही फायदे अढळलयास प्रतिक्रियेत आवर्जून द्यावेत.

१. हेल्मेटचा वापर मी, गाडी पार्क केल्यावर किरकोळ खरेदीकरता, एखाद्या परडीसारखा करतो, १ डझन केळी सहज मावतात, खरेदी झाल्यावर गाडीपाशी गेल्यावर केळी डिकीत ठेवायची.

२. मोबाईल ब्लूटूथ चा वायफळ खर्च वाचावा, हेल्मेट घातलेले असताना कोपच्यात, कानापाशी मोबाईल घुसडा, आणि मस्त राईड करत करत मोबाईल संभाषण चालू ठेवा.

३. तुम्ही साखळी चोर असाल तर, सीसीटीव्ही च्या कक्षे बाहेरील स्पॉट हेरण्यात वेळ वाया घालवू नका, तर सरळ टिंटेड हेल्मेट वापरा

प्रतिक्रिया

पंजाबमध्यल्या अतिरेकी काळात ते गौरी लंकेश प्रकरणातही ओळख लपवण्यासाठी मास्कसारखा हेल्मेटचा उपयोग झालेला असण्याची शक्यता वाटते.

चौथा कोनाडा's picture

5 Dec 2018 - 11:00 pm | चौथा कोनाडा

१. तुम्ही नेहमी फक्त केळीच घेता का ?

बटाटेवड्यात घालण्यासाठी आलेही घेतो.

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2018 - 4:05 pm | टवाळ कार्टा

चांगल्या गोष्टींचा उलटा उपयोग भारतीय कसा करतात याचे उत्तम उदाहरण

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2018 - 5:34 pm | चौथा कोनाडा

:-)

अहो बरेच उपयोग आहेत राव तसं बघायला गेले तर ..

१) हेल्मेट हाणामारीमध्ये पटकन काढून दुसऱ्याच्या डोक्यात मारावे आणि मग चटकन स्वतःच्या डोक्यात घालावे ..

२) कुणाची वाट बघत असलो कि हातात घेऊन मस्तपैकी ठेका धरावा आणि खुशाल झाकीर भाई बनून जावं ...

३) हेल्मेटला आतून असं काही फाडावे कि त्यामध्ये आपली चोरून करायची व्यसनं उदाहरणार्थ तंबाखूची पुडी किंवा मावा यथेच्छ लपवला जाऊ शकतो आणि घरात चान्गली संधी साधून निवांत हाणला जाऊ शकतो ..

इरसाल's picture

8 Dec 2018 - 12:28 pm | इरसाल

हे आणी बाकीचे सुचवतील ते वापर करुन झाले की उरलं सुरलं असलेले डोकं सुरक्षित ठेवण्याकरता पण वापरता येईल.

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2018 - 5:48 pm | चौथा कोनाडा

मी काय म्हंतो, स्मार्ट सायकल योजना करून त्याचा कचरा केला

त्या पेक्षा सक्ति न करता हेल्मेट फुकट वाटली असती तरी फायदा झाला असता.

सुबोध खरे's picture

19 Dec 2018 - 9:27 am | सुबोध खरे

बऱ्याच लोकांचं हेल्मेट डोक्यापेक्षा जास्त मौल्यवान असतं.

चिर्कुट's picture

19 Dec 2018 - 10:27 am | चिर्कुट

एक नंबर...लय हसलो..

सुबोध खरे's picture

19 Dec 2018 - 11:03 am | सुबोध खरे

काही लोकांचा आरसा डोक्यापेक्षा जास्त मौल्यवान असतो म्हणून हेल्मेट आरशावर ठेवलेले असते.