शिक्षणाच्या आईचा घो
रविवार आंबट गोड.
शनिवारी लेकीचा दुसर्या टेस्टचा निकाल लागला.निकाल म्हणजे ॲक्च्युली निकाल.मागच्या एक्झामला ज्या विषयांत कमी मार्क्स होते त्यात यंदा जास्त आणी ज्यात जास्त होते त्यात कमी ?
निकालून बाहेर पडल्यावर काहीच न बोलता आमची वरात घराकडे निघाली.बारा वाजले असतील घड्याळातले आणी माझ्या चेहऱ्यावरचे.पाच मिनीट शांतता होती.साधारण दोन किलो मिटर नंतर मागुन हळुच आवाज आला "बेयर ,भुक लागलीये"
च्ययाला ! हिच्या भविष्याच्या काळजीने माझं सगळंच आटलय आणी हिला भुक लागते ?
"काय खाणार ?" मी
"हं ! बेयर आपण अन्नपुर्णात जाउ .मटर पनिर आणी बटरनान खायचय .मस्त असतं तिथलं" मांजर बोलली.
" बब्या ! आभ्यासाचं मनावर घे रे प्लिज " आम्ही
"अंsss ! बेयर ,बारा वाजलेत आणी मला भुक लागलीय आधी जेउयात मग घरी गेल्यावर बघु" मांजर
"ओके" आम्ही
टरटरीत जेवण करुन घरी गेलो तर मांजर शांतपणे चेंज करुन झोपुन गेली.
आज रविवारी सकाळीही दहा वाजेपर्यंत ढाराढुर.कसंबसं उठवुन मी संतापात बडबड करायला सुरुवात केल्यावर मांजर आवरुन अभ्यासाला बसली.तासाभराने पुन्हा पहिले पाढे पंचावन .
शांतपणे टिव्ही अॉन करुन माझं ब्लड प्रेशर वाढवलंच.पुन्हा बोंबाबोंब.
शेवटी कंटाळुन पाच वाजता घराबाहेर चालता झालो .अर्धा तासात फोन " बेयर ! तु कुठंयस ? मला बोअर होतय."
झक मारत होतो तिथुन परत आलो आणी मांजरीला घेउन बाहेर पडलो.
"बब्या थोडा अभ्यास कर ना रे " मी
"बेयर ! सकाळपासुन तुझं ऐकुनही मी माझा मुड चांगला ठेवलायआता उगाच बोअर करु नको. मी माझं करीअर ठरवीन आणी ते चांगलच असेल.सारखं अभ्यास करुन मला अशक्त बकरी बनायचं नाहिये.आता गप मॕक डी ला चल" मांजर
बेयर फ्लॕट
याद्या
13506
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
लय भारी!!!!
कडक
:) मस्तच.
बाबौ !
हा हा !!
In reply to बाबौ ! by चौथा कोनाडा
बेयर स्ल्येड ! :)
ख्याक
बेयर फ्लॅट
भयंकर सुसाट
In reply to बेयर फ्लॅट by श्वेता२४
एकदम जबरदस्त.
Hmmmm
In reply to एकदम जबरदस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला काय लिवलंय ओ भौ
डोंट वरी आल इज वेल
In reply to च्यायला काय लिवलंय ओ भौ by खिलजि
मागच्या वर्षी थोरले बाळराजे ,
In reply to च्यायला काय लिवलंय ओ भौ by खिलजि
मागच्या वर्षी थोरले बाळराजे , इतिहासात फार उलथापालथ करून आले .. इतिहास असा काही वळवला कि विचारू नकाआँ, आता तर तुम्हाला काळजीच नको. असे करण्याची हातोटी असणारी माणसे राजकारणात फार वर जातात आणि त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिक्षणाची गरज नाही. किंबहुना, असे औपचारीक शिक्षण घेतलेले अनेक ब्युरोक्रॅट्स आणि उद्योगवीर त्यांच्या पुढेमागे करत असतात ! :) ( हे उघड सत्य आहे, तरीही, हघ्याहेवेसांन)बेयर
टेडी बेअर अस्वल
In reply to बेयर by धर्मराजमुटके
प्राणीमात्रांकडून लई अपेक्षा
भारी , आमच्याकडे लेकीने
आयला ! मला वाटलं बेंड फक्त
In reply to भारी , आमच्याकडे लेकीने by जेडी
नाही हो नाही, एकाच बोटी चे
In reply to आयला ! मला वाटलं बेंड फक्त by प्रमोद पानसे
मीच एकटी आहे का कि जिला हे
वीणा ताई
In reply to मीच एकटी आहे का कि जिला हे by वीणा३
हे लै भारी आहे
In reply to वीणा ताई by सुबोध खरे
माझंही तुमच्या सारखंच झालंय.
In reply to मीच एकटी आहे का कि जिला हे by वीणा३
सगळं तुच बघ ,इथे फक्त गप्पा
In reply to मीच एकटी आहे का कि जिला हे by वीणा३
मला तर पालक स्वतःचा इगो
In reply to मीच एकटी आहे का कि जिला हे by वीणा३
अर्धवट राहिला प्रतिसाद.
In reply to मला तर पालक स्वतःचा इगो by यशोधरा
+१
In reply to अर्धवट राहिला प्रतिसाद. by यशोधरा
हो, खरे आहे एक्का काका, पण हे
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
"मुलांचे योग्य तेवढे लाड करणे
In reply to मीच एकटी आहे का कि जिला हे by वीणा३
Home Schooling,
आमच्या कडे पण दीड दोन लाखाला.
विजूभाऊ, तळ्यात उतरून
In reply to आमच्या कडे पण दीड दोन लाखाला. by विजुभाऊ
बी एस सी नंतर करीयर नसते, असे
In reply to आमच्या कडे पण दीड दोन लाखाला. by विजुभाऊ
तुमचा प्रतिसाद वाचुन आताच
In reply to आमच्या कडे पण दीड दोन लाखाला. by विजुभाऊ