मुक्त स्रोत – भाग १

टीपीके's picture
टीपीके in तंत्रजगत
13 Dec 2018 - 7:40 pm

आता समजा तुम्हाला घर बांधायचे आहे, तर कायकाय लागेल?

कच्चा माल

सिमेंट
विटा
खिडक्या
दारे
लोखंड (सळ्या)
वायर्स
बटणे
पाईप्स
नळ
टाईल्स
रंग
फॅन
बल्ब
इत्यादी इत्यादी

या व्यतिरीक्त अनेक औजारेही लागतील, जसे

घमेली
फावडे
पकड
रंगकामाचा ब्रश
इत्यादी इत्यादी
घर किंवा इमारत जितकी मोठी तितकी प्रगत साधने लागतील

वरील प्रत्येक गोष्ट समजा तुम्ही स्वतः तयार करायची ठरवलीत, तर तुमचे घर नक्की कधी बांधून होईल? कधीच नाही. बरोबर ना?

अशावेळीच व्यवसायांचा उदय होतो. बरोबर ना?

आता समजा एखाद्या कंपनीने वरील प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करण्याचे ठरवले, तर तुम्ही घर बांधायचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकता, हो की नाही.

पण समजा, काही तांत्रीक कारणांमुळे कच्चा माल आणि औजारे एकाच कंपनीची घ्यायची सक्ती असेल तर तुम्ही कंपनीची निवड कशी कराल? कोणी म्हणेल अमूक कंपनीचे नळ चांगले नाहीत. अमूक कंपनी कडे ६च प्रकारचे रंग आहेत. तमूक कंपनीचे बल्ब चांगले नाहीत आणि त्यांच्याकडे ट्युबलाईट्स पण मिळत नाहीत. उदया बाजारात एल् ई डी बल्ब आले तरी जो पर्यंत तुमची कंपनी (म्हणजे तुम्ही घर बांधण्यासाठी ज्या कंपनीकडून सामान घेतले होते ती) असे बल्ब तयार करत नाही, तो पर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही.

या पुढे, घरात काही दुरूस्ती निघाली तर ती फक्त कंपनीच्याच अभियंत्याकडून करून घ्यायची नाहीतर संपूर्ण घराची वाॅरंटी संपली, नाही नाही, नुस्ता बल्ब बदलला तर घर कोसळूनच पडायची भिती with 80% probability.
आता समजा, तुमच्या घरातला बल्ब गेला तर दोन दिवस अभियंत्याची वाट बघत बसायचे आणि त्याने बल्ब बदलायचे ५००० रू मागीतले तरी गपगुमान दयायचे, जरी एखादी नविन कंपनी कमी लाईट बिल येणारा एल् ई डी बल्ब २०० रूपयात देत असेल तरी, नाहीतर ...

हे उदाहरण आणखीही खुप वाढवता येइल,

तर, आता तुम्ही घर बांधाल?

पण असतात काही महाभाग, जे तरीही घर बांधतातच ( का साठी वाचा, सेलींग द व्हील , फेज १ ऑफ सेलींग (जयंतकाका या पुस्काचा अनुवाद तुम्ही मनावर घ्याच))

संगणकही (खरे तर कोणतेही नविन तंत्रज्ञान) घरासारखाच असतो. असंख्य गोष्टी सुयोग्यपणे एकत्र आणूनच एक वापरण्यायोग्य संगणक तयार होतो, जसे, हार्डवेअर जसे सी पी यू, हार्ड डिस्क, ग्राफीक कार्ड, नेटवर्क कार्ड, कळफलक, माऊस, मॉनिटर, विद्युत जोडणी उपकरणे इ. इ. आणि सॉफ्टवेअर जसे ऑपरेटिंग सिस्टीम (जसे आजकाल विंडोज, लिनक्स, मॅक आहे तसे), Language compilers, network and administration tools, software development tools and productivity tools like, MS office, CAD, CAM, email tools, internet browsers, scanning, printing, audio video players and editors, games etc etc. (माफ करा, पण सुयोग्य आणि रूळलेले मराठी शब्द सुचत नसल्याने इंग्रजीच शब्द वापरले).
खरं तर सॉफ्टवेअरची आजची यादी (लिस्ट) न संपणारी आहे, जी सुरवातीच्या काळात मुख्यतः ऑपरेटिंग सिस्टीम, Language compilers, network and administration tools, software development tools पर्यंतच मर्यादीत होती.

तर सुमारे १९९०-९५ च्या आधी आय बी एम्, डिजीटल, बेल् लॅब्ज अशा काही मोजक्या संगणक पुरवणाऱ्या सबकुछ हम पद्धतीच्या दादा कंपन्या होत्या (काही प्रमाणात काळाप्रमाणे बदलल्याने आणि इतर काही कारणांने आय बी एम् आजही टिकून आहे). त्यांचे ग्राहक म्हणजे अतीप्रचंड बँका, विमा कंपन्या, विमान कंपन्या, मोठ्या उत्पादन कंपन्या. संगणकिकरणाच्या अतिप्रचंड खर्चामुळे हे ग्राहकही फक्त अती महत्वाच्याच किंवा ज्यामुळे धंदा बुडू शकेल अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी संगणकीकरण करत.
अर्थात या वेळी पुरवठादार कंपन्या, ग्राहक आणि कुशल मनुष्यबळही मर्यादीत होते. धंदयामधे टिकून रहाण्यासाठी संगणक पुरवठादार आपले तंत्रज्ञान प्राणापलीकडे जपत, त्यातही नक्कल करणे सोपे असल्याने सॉफ्टवेअर संबंधीत आराखडा, रूपरेषा आणि Source code (म्हणजे प्रोग्रॅम्स) फार जपले जात. कारण उत्तम आणि नविनतम सॉफ्टवेअर हेच त्यांना त्यांच्या स्पर्धकांपासून वाचवू शकत असे. त्या काळी कुशल मनुष्यबळही मर्यादीत पण अत्यंत कुशल संगणक अभियंते होते आणि उत्तम पगारावर काम करणारे होते.

आता त्याच वेळी, १९७०-८५ या काळातील काही घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ,

१७७० – बेल लॅब्जने युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणली. त्याच बरोबर C Language ही आणली. याच्या अत्यंत लवचीक आराखड्यामुळे (Architecture) लवकरच ही फार लोकप्रिय झाली.
१९७४ - इंटेलने ८०८० चीप बाजारात आणली.
१९७८ - इंटेलने ८०८६ चीप बाजारात आणली. आजही आपण याचीच (आराखडा, रूपरेषा) अतीसुधारीत आवृत्ती (X86) वापरतो. मूर्स लॉ चा जन्म झाला, ज्यानुसार प्रत्येक १८ महिन्यांमधे संगणकाची शक्ती दुप्पट तर किंम्मत निम्मी होऊ लागली.
१९७० च्या दशकात संगणक आणि युनिक्स विदयापिठांमधे दिसु लागले आणि अजून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले.
१९८१ – आय् बी एम् ने पहीला पी सी बनवला तो on Open Architecture वर असल्य़ाने इतरही कंपन्या याच आराखड्यावर पी सी बनवू लागल्या. एकच सॉफ्टवेअर अनेक कंपन्यांच्या पी सी वर चालू लागले. स्पर्धमुळे पी सी ची किंमत कमी झाली आणि विक्री वाढली. आजपर्यंत जे संगणक फक्त मोठ्या कंपन्यांमधे किंवा प्रथितयश विदयापिठांमधे होते ते घरांमधे दिसू लागले.

परंतू आतातर सॉफ्टवेअर हिच कंपन्यांची खरी शक्ती झाली कारण एकदाच बनवलेले सॉफ्टवेअर कितीही वेळा विकता येते आणि अमर्याद नफ्याची संधी मिळते. ह्या मुळे मायक्रोसॉफ्ट, लोटस सारख्या छोट्या कंपन्या अल्पावधीत फार मोठ्या आणि ताकदवान झाल्या.

क्रमशः

पुढे

फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन आणि संगणक उदयोगावरील परीणाम
शो मी द मनी. बिझनेस मॉडेल्स
भारतावरील परीणाम आणि भारताचे योगदान
पुढील संधी

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2018 - 8:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

माहिती रोचक आहे, पण कुठेतरी वाचल्या सारखी वाटली. अच्युत गोडबोलेंचे पुस्तक ?

टीपीके's picture

13 Dec 2018 - 9:46 pm | टीपीके
टीपीके's picture

13 Dec 2018 - 9:46 pm | टीपीके

नाही हो, मी नाही वाचले त्यांचे पुस्तक. मीच लिहिले आहे. पुढील भागात काय विषय आहेत त्याचीही हिंट दिली आहे. तेही मॅच होते का? असेल तर मग मी पुढे नाही लिहीत, डायरेक्ट शेवटचा भाग लिहितो, मला खरं तर तोच जास्त महत्त्वाचा आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Dec 2018 - 2:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

तसे काही नाही, लिहिण्याची शैली थोडी सारखीच वाटली म्हणुन म्हणालो. तुम्ही लिहा बिनधास्त

मुक्त स्रोत याबद्दल काय?

mrcoolguynice's picture

14 Dec 2018 - 8:48 am | mrcoolguynice

नै पन मी कै म्हंतो ....
एव्हढं घर बांधण्यात वेळ पैसे श्रम घालवण्यापेक्षा ....
सर्व्हिस अपार्टमेंट घ्यायचं , अँड पे पर युज ....
बदलत्या काळानुसार ...

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Dec 2018 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

अमेझॉन वेब सर्व्हिसेस किवा मायक्रोसॉफ्ट अझुअर , पे अ‍ॅज यु गो

मार्मिक गोडसे's picture

14 Dec 2018 - 11:15 am | मार्मिक गोडसे

रेती व खडी न वापरता घर बांधले तर ते बल्ब लावण्यापूर्वीच कोसळेल.