सहा इंच स्क्रीन असणारे मोबाईल

हर्शरन्ग's picture
हर्शरन्ग in तंत्रजगत
13 Dec 2018 - 2:04 pm

आजकाल नवीन फोन घ्यायचा झाला की सगळे पर्याय 6 इंच फोनचेच असतात. मला स्वत:ला ही साईझ थोडी मोठी वाटते. 5 इंचाच्या आसपास स्क्रीन असणारे फोन आहेत पण प्रोसेसर, बॅटरी, कॅमेरा इत्यादी बाबतीत मोठ्या फोन्स ना पर्याय नाही. ज्या व्यक्तींची उंची कमी आहे त्यांच्या लहान हातात तर हे मोठे फोन फारच गैरसोय करताना दिसतात.
या विषयावर आपली काय मतं आहेत?

प्रतिक्रिया

आणि १४४० बाइ ७२० म्हणजे फारच कमी रेझ०

mrcoolguynice's picture

13 Dec 2018 - 5:42 pm | mrcoolguynice

आयफोन ६ घ्या ,
खिशात सहज मावतात , हाताळायला सोपे , चांगला परफॉर्मन्स

पाषाणभेद's picture

13 Dec 2018 - 6:09 pm | पाषाणभेद

मोबाईल फोन कोणता घेवू, हा चांगला का तो चांगला? नवा आलेला फोन आदी धागे बंदच करावेत. एकतर आम्ही जो सांगू तो फोन दुसरा कधीच घेत नाही. अन नवनवीन फोन तर येतच असतात. अन व्यक्तीपरत्वे बजेट, आवडीनिवडी बदलतात. मग उगाचच हे धागे बायटी अन बँन्डविड्थ वाढवतात.

>>धागे बंदच करावेत>>>
हाहाहा!

धर्मराजमुटके's picture

13 Dec 2018 - 7:25 pm | धर्मराजमुटके

नोकिया ३३०१ घ्या. आपली पसंती कायम नोकीयालाच ! अडाणी फोन घेतला म्हणजे स्वतःचा स्मार्टपणा सिद्ध करायची गरज लागत नाही, बोटांना आणि डोळ्यांना बर्‍यापैकी आराम मिळतो. :)
ता.क. प्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन वर योग्य ते फिल्टर्स सेट करुन तुम्हाला हवा असलेला मोबाईल मिळू शकतो.

येथील सदस्यांना विनंती : कोणीतरी दरमहा "चालू घडामोडीसारखा" मोबाईल, कार, बाईक यांसाठी एखादा वाहता धागा काढा की .....

उपयोजक's picture

17 Dec 2018 - 7:20 pm | उपयोजक

व्यनि करतो.

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2018 - 5:00 pm | चौथा कोनाडा

सध्या साडेपाच इंची फोन वापरतोय. सरावानंतर हाताळायला अवघड वाटत नाहीय.

कौन्तेय's picture

2 Jan 2019 - 5:56 pm | कौन्तेय

फुल्ल एचडीपेक्षा जास्त रेझोल्युशन, जास्त रॅम, जास्त मोठा प्रोसेसर, दोन - दोन असे चार कॅमेरे ... बाकी फिंगर प्रिंट स्कॅनर, सहा इंची स्क्रीन या सगळ्या गफ्फा आहेत.

सामान्य व्यवसायी वा विद्यार्थी व्यक्तीला अँड्रोइड फोन वापरायचा असल्यास खरी गरज आहे ती -
फुल एचडी रेझ (१९२०*१०८०) ... १४४४ वा १२८० सुद्धा ओके
३ जीबी रॅम
बऱ्यापैकी क्वाडकोअर वा ड्युअल कोअर प्रोसेसर
६४ जीबी साठवण (+ बरेच जीबी वाढीव कार्डाचे)
३/४००० मि.अॅ.अवर बॅटरी
उत्तम कॅमेरा (मागचा पुढचा दोन्ही छान असावेत) १३ वा ८ मेगापिक्सेल
डबल सिम. हवे असल्यास.

बास्स्!
याच्या पलिकडे जे काही सांगितले जाते ते वाढीव तरी आहे वा अतिशयोक्त तरी.
मी वर दिलेल्या स्पेक वर चांगले जड गेम्सही खेळता येतात.
या आकडेवारीचा चांगल्या कंपनीचा फोन आजमितीस दहा ते बारा हजारांना भेटत आहे.

... ...

माझा एक आक्षेप याच अनुषंगाने आहे. सांगतो.
इतका किचकटपना करण्यासाठी मि.पा. शिवाय दुसरी जागा ती कोणती!

जर विज्ञान, तंत्रज्ञान पुढे जात आहे, तर आपल्या सर्व गॅजेट्सना अधिकाधिक साधन संपदा (रिसोर्सेस) लागावी हे चुकीचे आहे. उलट ती कमी होत गेली पाहिजे. आपणां प्रत्येकाकडे ढीगाने पडलेले जुने संगणक, जुने फोन्स आहेत. ते उत्तम चालणारे आहेत, पण आता चालत नाहीत. कारण व्हर्शन्स अपग्रेड झाली म्हणे.
आता यातली अपरिहार्य नफेखोरी आपण जाणत असलो तरी हे थांबायला हवे आहे हेही आपण जाणतो.
कुणीतरी अत्यंत सुलभ ओपन सोर्स साॅफ्टवेअर्स बनवायला हवी आहेत की ज्यांमुळे या जुन्या उपकरणांत जान फुंकता येईल.
माहिती असल्यास कृपया कळवावीत.

माझा एक आक्षेप याच अनुषंगाने आहे. सांगतो.
इतका किचकटपना करण्यासाठी मि.पा. शिवाय दुसरी जागा ती कोणती!

Sahamat

जर विज्ञान, तंत्रज्ञान पुढे जात आहे, तर आपल्या सर्व गॅजेट्सना अधिकाधिक साधन संपदा (रिसोर्सेस) लागावी हे चुकीचे आहे. उलट ती कमी होत गेली पाहिजे.

Context : electricity consumption

Then

Tungston bulb > tube light > lcd > led

Similarly

Android old version > android new version > kai os > any future inventions

कंजूस's picture

15 Jan 2019 - 4:14 pm | कंजूस

>>kai os > colorOs वगैरे android fullमधून कायकाय कापले आहे?

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2019 - 7:09 am | चौथा कोनाडा

ओ हर्षरंग (नाव टाईप करताना चुकले क्षमस्व)
शेवटी कुठला घेतला, वापरताना काय अनुभव, लिहा की. का नुसतं खडा टाकून पळून जाताय ?

हर्शरन्ग's picture

15 Jan 2019 - 12:32 pm | हर्शरन्ग

उशीर झाला ... क्षमस्व
शेवटी 6 इंचाचाच zenfone max pro m2 घेतला

आतापर्यंत पंधरा मोबाईल फोन घेतले. त्यातले सात स्मार्टफोन आहेत. शेवटी realme 1 4gb ram 64 GB internal memoryहा घेतलेला फोन आवडला. आता नवीन घ्यायचा मोह आवरायचा असे ठरवले.