Skip to main content

टीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा

लेखक mrcoolguynice यांनी शुक्रवार, 23/11/2018 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे. माझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत. रोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात. परंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात. विरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून "पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा ", असे गप्प करू इच्छित नाही. असे का ? तर वर उल्लेखल्याप्रमाणे ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत. म्हणून ते माझी मदत मागत आहेत, मला खात्री आहे की या साईटवर मोदीजींची बाजू मुद्देसूदपणे अभ्यासूरित्या मांडणारे लोकं असतील व ते मला माहिती देतीलच. तर टिना म्हणजे TINA = There Is No Alternative = एक प्रकारची परिस्थिती. मोदीजी = सध्याचे आपले पंतप्रधान (चर्चेदरम्यान) कौतुक करण्याची (बाबांची) इच्छा = अभ्यासपूर्ण मुद्देसूद परंतु प्रेमाने बाजू पटवून देणे, व त्यासाठीचा डेटा गोळा करणे. मी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून . संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो, कि जे, युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ? संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ? लोकांना ते (विवेकानंदांच्या शैलीन ) कसे समजावुन सांगता येऊ शकतील ? . *जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व. जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ? (*लक्ष्यात घ्या मी मोदीजींची बाजु मुद्देसूद मांडता यावी या अंतस्थ हेतूने विचारतोय) माझे बाबा, "मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी " अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात . समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y, यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे. उदा. एकहाती मोदीजी X असे काय निर्णय घेऊ शकतात, की युतीचे मोदीजी घेऊ शकत नाही Y. *कृपया मोदीविरोधकांनी किंवा इतरही कोणी, मला वैयक्तिक इन्स्लटिंग प्रतिसाद देऊ नये. *तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.

वाचने 65365
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

>>एक त्रिकाल अबाधित सत्य -- "अच्छे दिन" कधी ही येत नाहीत. हे सर्व सुशिक्षितांना २०१४ साली समजले असते तर? >>याप्रमाणेच सरकारने जन्म दरिद्री माणसाला फुकट घर दिले, फुकट गॅस सिलिंडर दिला किंवा शौचालयासाठी सबसिडी दिली कि पुढच्या वेळेस तो त्याचा हक्क होतो तरीही मोदी असली आश्वासने देत असतात आणि फुकट गॅसही देतात, शौचालयासाठी सबसिडीही देतात. तुम्हाला जे समजते ते मोदींना समजत नाही असे म्हणताय..... --------------------------------------------------------- या पूर्वीची सरकारे गरीबी हटाव म्हणा, कर्जमाफी म्हणा काहीतरी आश्वासने देत असत. त्यातली काही पुरी करण्याचा प्रयत्न करीत. यश मिळत असे-नसे. अशा वेळी त्यांना या आश्वासनाचे काय झाले असे विचारल्यावर ते काही प्रमाणात आम्ही आश्वासने पुरी केल्येत, अजून वेळ लागेल अशी काहीतरी सारवासारव करीत असत. "दिलेली आश्वासने हे चुनावी जुमले होते" असे माजोरडेपणे सांगणारे हे पहिलेच केंद्र सरकार आहे.

In reply to by नितिन थत्ते

"दिलेली आश्वासने हे चुनावी जुमले होते" असे माजोरडेपणे सांगणारे हे पहिलेच केंद्र सरकार आहे. https://www.facebook.com/DhongiAamAadmiParty/videos/2161436194118963/

In reply to by मामाजी

कर्जमाफी सोल्युशन नाही. सोल्युशन लंबा होगा असं म्हणाला. कर्जमाफी देणार नाही असं म्हणाला नाही. "ते केवळ निवडणुकीतलं आश्वासन होतं" असंही म्हणाला नाही.

In reply to by नितिन थत्ते

पोपट मेलेला नाहीये पण डोळे उघडत नाहीये, चोच वासली आहे हृदयाची धड धड ऐकू येत नाहीये पण पोपट मेलेला नाहीये.

In reply to by विशुमित

नोटबंदी चा घाव आपल्या खूपच वर्मी बसलेला दिसतोय. मुघलानां जसे सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसे आपल्याला दोन वर्षां नंतर सुध्दा प्रत्येक पोस्ट वर नोटबंदीच दिसते काहो? नाही म्हणजे इथे चाललेला विषय शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासन बद्दल आहे व त्यात पण आपल्याला नोटबंदी दिसली म्हणून विचारतो.

In reply to by मामाजी

आम्हाला कसला ही घाव बसला नाही... माझ्याकडे मोजून पाचशे च्या 8 अणि हजारची 1, असे फक्त 5 हजार होते. घाव कशावर बसला आहे ते एक एक समोर येतच आहे. नाहीतर खुश होऊन लोकानी शत प्रतिशत निवडून दिले नसते का?? ... अवांतर- संभाजी महाराजांना पकडून नेले तेव्हा हेच धुरिन्दर धनाजी संताजी कोठे होते अशी शंका संजय सोनवनीनी त्यांच्या ब्लॉग मधे उपस्थीत केली आहे. बाकी विषय काय चालू आहे हे मला चांगले समजते मामा जी! काळजी नसावी!

In reply to by नितिन थत्ते

सत्ता स्थापन होऊन दहा दिवस झाल्यावर झोडपा की वचन न पाळल्यास. सोल्युशन लंबा होगा असं म्हणाला. मध्य प्रदेशात डायरेक्ट गोळी घालून शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवतात हे माहीत नाही वाटतं?

In reply to by मार्मिक गोडसे

हे तेव्हा अजित पवारांना पण सांगायचे होते की जेव्हा ह्यांनी मावळ च्या शेतकर्यांवर आनी धुळ्यात कोळी समाजाच्या मोर्चावर गोळीबार केला तेव्हा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

महाराष्ट्रातील मतदारांनी धडा शिकवला की त्यांना, म. प्र. च्या सरकारला ती कृती योग्य वाटली असणार.

हिंदू "नागरिकों" ने हिंदू "वोटर" बनने से इनकार कर दिया ????? छत्तीसगड = मुस्लिम लोकसंख्या २%, हिंदु लोकसंख्या ९०%+ मध्यप्रदेश = मुस्लिम लोकसंख्या ७%, हिंदु लोकसंख्या ९०%+ राजस्थान = मुस्लिम लोकसंख्या ९%, हिंदु लोकसंख्या ९०%+ अरेरे .... हिंदुहितमें नक्की कोण बात कर रहा हय ? याची मतदारांना काही काळजी ??

https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-… लोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला. ‘देशाचं समर्थपणे नेतृत्व करू शकेल असा दुसरा नेता आहेच कुठे?’ असा प्रश्न काही मंडळी सतत उपस्थित करीत असतात. ‘कडबोळ्याचं सरकार म्हणजे देशाचं वाट्टोळं!’ असंही म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्ष इतिहास काय दर्शवतो? आपल्याकडे आतापर्यंत प्रत्येक सत्ताधारी पंतप्रधानाचा पराभव हा विरोधकांपेक्षा त्यांच्या स्वत:च्या चुका, भ्रष्टाचार, नाकर्तेपणा वगैरे कारणांनीच झाला आहे. इंदिरा गांधी हरल्या त्या समोर मोरारजी देसाई होते म्हणून की काय? किंवा राजीव गांधी यांच्या मोदी यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट बहुमतास विश्वनाथ प्रताप सिंग हे थोडेच पर्याय ठरले? किंवा नरसिंह राव यांना पाडून जनतेनं पेंगत्या देवेगौडा यांना पसंत केलं की काय? २००४ साली अटलबिहारी बाजपेयी सरकार पडलं तेव्हा कोणता पर्याय समोर होता? यातल्या प्रत्येक पंतप्रधानाला सत्ता सोडावी लागली त्याला ते स्वत:च कारणीभूत होते. म्हणजेच समोर पर्याय आहे म्हणून पंतप्रधानाला सत्ताच्युत करा असं कधीही आपल्याकडे झालेलं नाही. होणारही नाही. तर.. सत्ताधारी पंतप्रधान हा फारच डोकेदुखी होऊ लागलाय, त्याला आता घरी पाठवायला हवा असं जेव्हा जेव्हा मतदारांना वाटलं तेव्हा समोर पर्याय तयार झाला. पर्याय आधी आणि मगच सत्ताबदल असं कधीच घडलेलं नाही. तर मतदारांचा सत्ताबदलाचा निर्धार आधी आणि त्यातून मग पर्यायाचं उभं राहणं- असा हा क्रम आहे. हे असंच आपल्याकडे होतं. आणि असंच होणार. याचं साधं, पण अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे- आपल्याकडे विरोधी पक्ष जिंकून सत्तेवर येत नाही; तर सत्ताधारी पराभूत होतो.