युट्यूब रिअ‍ॅक्शन व्हिडीओ कशा बनवाव्यात ? (माहिती हवी)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
10 Dec 2018 - 12:31 pm
गाभा: 

निसटत्या बाजू मांडणे हि माझी स्पेशॅलिटी आहे. गेल्या आठवड्याभरात पाक पंप्र इम्रानखानानी बरीच विवाद्य विधाने केलीत, त्यात बलोचीस्थानी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या त्याच्या भाषणाचा उहापोह करत इम्रानच्या निसटत्या बाजू युट्यूबरूनच हिंदी आणि इंग्रजीतून का मांडू नयेत असा विचार केला. मला त्यावर एखाद दोन रिअ‍ॅक्शन व्हिडीओ बनवून युट्यूबर टाकणे आवडेल.

रिअ‍ॅक्शन व्हिडीओमध्ये सहसा युट्यूबर उपलब्ध असलेला व्हिडीओ स्क्रिनच्याखाली छोट्या आकारात खाली दाखवत रिअ‍ॅक्शन व्हिडीओ करणारी व्यक्ती आपले मत त्यावर व्यक्त करते. सर्वसाधारणपणे मत देणारी व्यक्ति त्यात सहसा स्वत: च असते. मला जो रिअ‍ॅक्शन व्हिडीओ बनवायचा आहे त्यात स्वतःस प्रदर्शित करण्यात रस नाही. मला इम्रान खानचा युट्यूबखाली दाखवत स्क्रिनवर बूलेट पाँईट मध्ये मुद्दे लिहून त्यांचे विवेचन करणे असे स्वरूप ठेवायचे आहे.

मी युट्यूबवरून माझ्या सॅमसंग मोबाईल आणि एचपी लॅपटॉपच्या दृष्टीने काही फ्री सॉफटवेअरचा शोध घेतला . काही माहिती अंतरजालावर मिळते पण इंटर अ‍ॅक्टीव्ह व्हिडीओ बनवण्याच्या दिशेने अद्याप फारशी प्रगती करू शकलो नाहीए.

रिअ‍ॅक्शन व्हिडीओ बनवण्यासाठी शक्यतोवर वेळेचे बंधन नसलेले सोपे सॉफटवेअर जमल्यास फ्री, फ्री नसेल तर छोटा मोठा खर्च असलेले सॉफटवेर आणि रिअ‍ॅक्शन व्हिडीओ बनववण्याच्या दृष्टीने माहिती आणि मार्गदर्शनाची विनंती आहे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

10 Dec 2018 - 1:44 pm | शब्दानुज

आपण असा दुस-याचा व्हीडीअो सहजासहजी वाप-याअगोदर व्हीडीअो कॉपीराईटबद्दल पुर्ण माहिती घ्यावी. अन्यथा दुर्देवाने आपले अकाउंट बंदही होऊ शकते.

कॉपीराईट गोष्ट महत्वाची असली तरी १) माझा स्वतःचा कॉपीराईट विषयक पुरेसा अभ्यस आहे २) समिक्षण आणि टिकेसाठी कॉपीराईट कायद्यात पुरेसे अपवाद उपलब्ध आहेत .

या दृष्टीने दुसर्‍या व्हिडीओचा आवश्यक तेवढाच भाग कटपेस्ट करून कसा वापरता येईल या बद्दलही जाणकारांनी माहिती द्यावी.

तरी सुद्धा आपण मनमोकळेपणने लक्षवेधण्यासाठी अनेक आभार.

मराठी कथालेखक's picture

10 Dec 2018 - 3:57 pm | मराठी कथालेखक

रिअ‍ॅक्शन व्हिडिओ म्हणजे नेमके काय हे समजण्याकरिता तुम्ही एखाद्या रिअ‍ॅक्शन व्हिडिओचा दुवा दिलात तर ही संकल्पना नीट समजू शकेल आणि तुम्हाला मदत करता येईल.
व्हिडीओ एडिट करण्याकरिता अनेक अ‍ॅप्लिकेशन्स मिळू शकतील. पुर्वी विन्डोज एक्सपी वर 'विंडोज मूवी मेकर' हे अ‍ॅप्लिकेशन असायचे. चांगले होते ते ही.

माहितगार's picture

10 Dec 2018 - 5:05 pm | माहितगार

खालील व्हिडीओत अर्णब गोस्वामीवर अनेकजण मिळून रिअ‍ॅक्शन देत आहेत पण बहुतेक रिअ‍ॅक्शन व्हिडीओत एक ते तीन व्यक्ती एखाद्या दुसर्‍या व्हिडीओतील कंटेंटवर रिअ‍ॅक्शन देत असतात. विषय म्नोरंजन , धार्मिक, राजकीय काही पण असू शकतात.

युट्यूबर रिअ‍ॅक्शन व्हिडिओ म्हणून सर्च केले तर अनेक रोचक उदाहरणे मिळू शकतील

माहितगार's picture

10 Dec 2018 - 5:11 pm | माहितगार

अर्थात वर धागा लेखात म्हटल्याप्रमाणे रिअ‍ॅक्शन देताना मला स्वतःला दिसण्यात रस नाही - माझे मुद्दे केवळ टेक्स्ट्ने नमुद करुन माझा आवाज येईल हे पहायचे आहे चेहरा न्को आहे .

माहितगार's picture

10 Dec 2018 - 5:51 pm | माहितगार

अजून एक उदाहरण (अ‍ॅडल्ट डिस्क्रीशन ) इंग्लिश मुव्ही मधील लव्ह सिन्स म्हणून दाखवलेल्या सिन्सचे कायद्याच्या दृष्टीकोणातून विश्लेषण एक आमेरीकन लेडी अ‍ॅड्व्होकेट रिअ‍ॅक्शन व्हीडिओच्या माध्यमातून करत आहे.

हे थोडे पिक्चर इन पिक्चर टाइप असे हवे आहे वाटतं

माहितगार's picture

10 Dec 2018 - 7:46 pm | माहितगार

होय बरोबर .

चैतू's picture

11 Dec 2018 - 12:28 am | चैतू

हे एक चांगलं software आहे. खरं तर हे videos edit करायला वापरतात, पण तुमच्या कामासाठी पण याचा उपयोग होऊ शकेल.

सोन्या बागलाणकर's picture

19 Dec 2018 - 3:23 am | सोन्या बागलाणकर

तुम्ही एक मोठी चूक करताय माहितगारसाहेब.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला व्हिडिओमध्ये दाखवायचं नाहीये पण असं केलं तर तो reaction video होणार नाही. Reaction video त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजमुळे जास्त पॉप्युलर होतात. केवळ बुलेट पॉईंट टाकून विडिओ बनवला तर तो तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहचवता येणार नाही असं मला वाटतं.

राहिली टेकनॉलॉजिची बात तर आजकाल तुमचा स्मार्टफोन वापरूनही तुम्ही HD quality विडिओ बनवू शकता. विडिओ एडिटिंग साठी प्रोफेशनल सॉफ्टवेअर जसं Adobe Premiere Pro उत्तम पण काही मोफत पर्यायही (उदा. HitFilm Express)आंतरजालावर उपलब्ध आहेत. अर्थात यासाठी विडिओ एडिटिंगची प्राथमिक माहिती असणं आवश्यक आहे पण youtube वर शोधल्यास बऱ्याच ट्यूटोरिअल्स मिळतील.

Screen रेकॉर्डिंगसाठी Desktop वर icecream screen recorder एक चांगला पर्याय आहे. यात फ्री व्हर्जनमध्ये ५ मिनिटांची रेकॉर्डिंग लिमिट आहे. अँड्रॉइड फोनवर AZ screen recorder नावाचे अँप या कामासाठी उत्तम आहे.

उपक्रमासाठी शुभेच्छा!

माहितगार's picture

19 Dec 2018 - 1:01 pm | माहितगार

बागलाणकरजी माहिती पूर्ण प्रतिसादासाठी आभार, आपण म्हणता त्या प्रमाणे व्हिडिओ एडीटींगच्या प्रोफेशनल सॉफ्टवेअरसाठी बरेच ट्रायल एरर आणि प्रेक्टीस लागेल असे दिसते. मला कुणी VSDC म्हणून एका सॉफ्टवेअरची डाउनलोड केले पण नेमके विंडोज क्रॅश होण्याचा योग आला आणि तसेही माझ्या आडिओ प्रयोगांनी मुलांच्या अभ्यासात व्यत्ययाची शक्यता दिसल्याने मोर्चा माझ्या सॅमसंग फोन कडे नेला. मला जे करायचे आहे त्यास किमान दोन ते तीन लेयर्स लागतील असे वाटते आणि आपण म्हणता तसे Adobe Premiere Pro लेयर्स प्रयोगासाठी कदाचित सुलभ असेल असे युट्यूब पाहून वाटते.

पण Adobe Premiere Pro तसेच गूगल प्लेवरील गोष्टींवर खर्च करण्यात वेगळीच अडचण समोर आली म्हणजे माझीवाली नॅशनलाईज्ड बँक त्यांच्या यादीत नसल्याने पेमेंट ट्रँझॅक्शन होत नाहीएत , आता त्यासाठी दुसर्‍या बँकेच्या अकाऊंटला नेट बँकींग फॅसिलीटी चालू करुन घेणे आले. त्यासाठी वेळही लागेल.

मध्यंतरात स्मार्ट फोनूवर लेयर सुविधा देणारे काईनमास्टर नावाचे अ‍ॅप पाहिले असता ते माझ्या वाल्या सॅमसंगवर लेयर उपलब्ध करत नाही म्हणाले. प्ले स्टोअरवरून शोधून VKinny नावाचे अ‍ॅप घेऊन वापरले त्यात दोन लेयर मिळताहेत, एका लेयर मध्ये रिस्पाँड करायची क्लिप छान स्टार्ट आणि स्टॉप करताकंपलस, किंवा पिडीएफ ला त्याच लेयर मध्ये घेऊन बुलेट पॉईंट्स ना ऑडीओ जोडता येतोय. त्यांची दुसरी लेयर मात्र कॅमेरासाठी राखीव झाली आहे ,( शिवाय कॅमेरा लेयरचा कॅप्चर बेक्कार ब्लर आहे - एनी वे मला तुर्तास कॅमेरात रस नाही).

VKinny त रिस्पाँड करायची क्लिप + पिडीएफ किंवा पिक्चर बुलेट पॉईंट्स हे दोन्ही एकाच वेळी दोन वेगळ्या लेयरमध्ये ठेऊन वापरता आले असते - म्हणजे रिस्पॉन्स देण्याची क्लिप तुकड्या तुकड्यात वाजवली आणि नंतर त्या मागचा पिडीएफ वरील बुलेट पाँट वाचले- तर माझा प्रश्न तात्काळ मिटला असता पण अशी सुविधा त्यात नाही. सध्या तुर्तास दुसरा मार्ग रिस्पॉन्स देण्याची क्लिपला दुसर्‍या अ‍ॅप मध्ये नेऊन तुकडे करायचे (ते व्हिडिओ एडिटर नावाच्या अ‍ॅप मध्ये करतोय ) आणि प्रत्येक तुकड्यासाठी VKinny वर पिडिएफ लेयरला आवाज द्यायचा. मग VKinny वर तयार केलेली क्लिप रिस्पॉन्स देण्याच्या तुकड्याला परत व्हिडिओ एडिटर मध्ये जोडायची , असा द्राविडी प्राणायाम करावा लागेल असे दिसते आहे.

आपण सुचवलेले AZ screen recorder स्क्रीन रेकॉर्डींगसाठी उपयुक्त दिसते आहे. बुलेट पॉईंट वाचून दाखवण्याचा पार्ट VKinny
प्रमाणे कदाचित AZ screen recorder मध्येही करता येईल असे दिसते पण यातही लेयर्सची सुविधा नसणे आणि दुसरी क्लिप इंपोर्ट करुन प्ले करण्याची सुविधा दिसत नाहीए.

मोबाईलवर रिस्पाँड करायची क्लिप + पिडीएफ किंवा पिक्चर बुलेट पॉईंट्स हे दोन्ही एकाच वेळी दोन वेगळ्या लेयरमध्ये ठेऊन वापरता येण्यासारखी काईन मास्टर सारखी दुसरी अ‍ॅप ऊपलब्ध होऊ शकल्यास बरे होईल असे वाटते. Adobe Premiere Pro किंवा HitFilm Express मध्ये असे करणे जमू शकेल का ? (फारतर घरी ऑडीओ रेकॉर्ड करणे जिकिरीचे होत असल्याने फारतर लॅपटॉपची दुसरीकडे ने आण करावी लागेल) .

बाकी reaction video मध्ये इमोशनल रिस्पॉन्सच्या दृष्टीने बॉडी लँग्वेजचे महत्व असेल हे खरे पण एनी वे एकतर अभ्यासपुर्ण मुद्देसूद मांडणीवर माझा भर असतो, माझ्या रिस्पॉन्समध्ये इमोशनल कंटेंट कमी असेल . दुसरी अडचण एकतर या माध्यमाची अद्याप सवय झालेली नाही, आणि सगळे मुद्दे नुसतेच आठवणीत ठेऊन नेमकेपणाने बोलणे कदाचित कठीण असू शकेल त्यापेक्षा लिहिलेले मुद्दे वाचून दाखवणे तुर्तास या माध्यमाची सवय होई पर्यंत सोईचे जाईल असे वाटते. त्या शिवाय व्यक्तिगत आयुष्यात खासगी व्यवसायात कार्यरत लोकांना लोकांना न रूचणार्‍या भूमिकांची मांडणी गैरसोईची ठरू शकते. असंख्य लोकांना व्यक्ति आणि व्यक्तीच्या भूमिका यात फरक करणे जमत नाही त्यामुळे तो त्रासही ओढवून न घेण्याच्या दृष्टीनेही स्व-दर्शन टाळलेले बरे असे तुर्तासतरी वाटते. असो पुन्हा एकदा माहिती पूर्ण प्रतिसादांसाठी आभार.

@ चैतू

आप्ण म्हणता तसे Windows movie maker
चा पर्याय चांगला होता पण आता त्यास विंडोजचा सपोर्ट नसल्याने अधिकृत डाऊनलोड ऑप्शन बंद झालेत. आणि इतरत्रच्या डाऊनलोडचे प्रयत्न दुर्दैवाने फसले म्हणून तो नाद तुर्तास सोडलाय. पेमेंट करण्यातील तांत्रिक अडचणी सुटल्या तर Adobe Premiere Pro वापरुन पहावे असा विचार करतोय

टर्मीनेटर's picture

19 Dec 2018 - 1:38 pm | टर्मीनेटर

वरील प्रतिसादातील बागलाणकरांच्या मताशी सहमत.
तुम्ही तयार करणार असलेल्या व्हिडिओ मध्ये तुमचा स्वतःचा चेहरा नसला तरी त्याजागी तुम्ही एखाद्या ॲनिमेशनचा (उ.दा. Talking Tom) वापर करू शकता. बुलेट पॉइंटस वाचण्या पेक्षा ते नक्की प्रभावी वाटेल. आवाजही तुमचा अथवा ईतर कोणाचा देऊ शकता.
मी व्हिडिओ एडिटिंग साठी VideoPad Video Editor हे सॉफ्टवेअर वापरतो. ट्रायल व्हर्जन वापरून बघा आवडलं तर प्रो व्हर्जन घेऊ शकता. थोडं R&D करावं लागेल पण हे सॉफ्टवेअर खूप चांगले आहे. त्याची download लिंक खाली देत आहे.
https://videopad-video-editor.en.softonic.com/

माहितगार's picture

19 Dec 2018 - 2:31 pm | माहितगार

VideoPad Video Editor हे बिगीनर्ससाठी दिसतय तेव्हा डाउनलोड करुन वापरुन बघतोय. तुम्ही सुद्धा म्हणताय तेव्हा प्रत्यक्ष दिसण्याचा विचार करावा असे वाटू लाग्लेय, पण खरेच मला जे बोलायचे आहे ते जसेच्या तसे तोंडपाठ करणे होत नाही आणि सध्याच्या ट्रायल मध्ये अजून तरी 'अं' वगैरे असे उद्गार निघून अडखळायला होते आहे. आधी साधे बनवून त्यावर काही जणांची मते घेऊन मग स्वतः सहित व्हिडिओंचा विचार करताही येईल नाही असे नाही.

आपण म्हणताय तसे कार्टूनचाही प्रयोग काही जमल्यास करुन पहातो . माहितीपुर्ण मार्गदर्शनासाठी अनेक आभार

टर्मीनेटर's picture

19 Dec 2018 - 2:51 pm | टर्मीनेटर

पण खरेच मला जे बोलायचे आहे ते जसेच्या तसे तोंडपाठ करणे होत नाही आणि सध्याच्या ट्रायल मध्ये अजून तरी 'अं' वगैरे असे उद्गार निघून अडखळायला होते आहे.

हि समस्या मलाही भेडसावते :) त्यामुळे मी Documentary बनवण्याचे प्रयत्न करणे सोडून दिले आहेत. पण कार्टूनचा प्रयोग करून बघा, सलग व्हॉईस ओव्हर रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, आणि एकदा जमायला लागले तर स्वतः प्रत्यक्ष दिसण्यासाठीचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा!

माहितगार's picture

19 Dec 2018 - 2:54 pm | माहितगार

@ टर्मीनेटर

व्हिडिओपॅड डाऊनलोड करुन त्यात एक फोटो आणि एक क्लिप अ‍ॅड केले पण फोटो पार्ह्श्वभूमी वर ठेऊन दुसर्‍या लेयरवर क्लिप कशी चालवावी लेयर कुठून सुरु करावी किंवा लेयरला काय म्हणतात ते कळले नाही. आपल्याला कल्पना असेल तर कळवणे.

जुन्या व्हर्जनवर आधारित असला तरी हा व्हिडिओ संदर्भासाठी उपयोगी पडेल.
https://www.youtube.com/watch?v=oXpgIRhw3Ck

माहितगार's picture

19 Dec 2018 - 4:17 pm | माहितगार

अनेक आभार, थोडे ट्रायल अँड एरर केल्या नंतर माझे काम बरेच सोपे होईल असे वाटते आहे . करून बघतो . खूप खूप धन्यवाद.

सोन्या बागलाणकर's picture

20 Dec 2018 - 2:47 am | सोन्या बागलाणकर

माहितगारसाहेब ,
माझ्या माहितीप्रमाणे hitfilm express मध्ये तुम्ही कितीही लयेर्स बनवू शकता.
तुम्ही म्हणता तसा अं चा प्रॉब्लेम सगळ्याच नवख्या youtubers ला भेडसावतो पण त्याने काही फरक पडत नाही.
लोकांना कॉन्टेन्टशी मतलब असतो त्याचं सादरीकरण तितक्या प्रोफेशनली झालं नाही तरी चालतं.
प्रोफेशनल लोक टेलिप्रॉम्प्टर वापरतात पण तुम्ही लॅपटॉपवर तुमची टिपणे ठेवून वाचलीत तर हा त्रास बराच कमी होऊ शकतो.
शिवाय तुम्ही ऑडिओ वेगळा रेकॉर्ड करून नंतर मिक्स करू शकता. ज्यामुळे तुम्ही हवे तेवढे रिटेक करून जो आवडेल ती ऑडिओ क्लिप वापरू शकता.

माहितगार's picture

20 Dec 2018 - 8:26 am | माहितगार

चांगली सूचना आहे नक्कीच करून पहातो. मार्गदर्शनासाठी अनेक आभार.

कंजूस's picture

20 Dec 2018 - 5:53 am | कंजूस

दिलेल्या विडिओचा कोड पाहिल्यावर त्यात एक इनक्रिप्टेड मिडिया हे फीचर दिसत आहे. म्हणजे तुमची वेबसाइट असेल तर हा रिअॅक्शनचा दुय्यम विडिओ अपलोड करून ठेवायचा, तो तुम्हाला बदलता येतो. एक प्रकारचा वेरिअबल. मूळ युट्युब विडिओ सुरू केला की मधल्या चौकोनात तुमच्या साइटवर ठेवलेला विडिओ दिसत राहणार.
मिपावर शक्य नाही.
--
टर्मिनेटर यांनी इजिप्त धाग्यात स्लाइडशो टाकला होता तो त्यांचा ब्लॅाग वापरून, इम्बेड केलेला. तसं काहीसं करावं लागेल

दुसरा एक प्रकार अधिकृत आणि शक्य असा करता येण्यासाठी पहिला विडिओ हासुद्धा तुमचाच असायला हवा. (कॅापी राइट आणि तांत्रिक बाबतीत गरज म्हणून)
"एकात एक दोन विडिओ दाखवता येतील का?" असा प्रश्न धरून -
समजा दोन विडिओज तुमचेच आहेत आणि ते पिक्चर इन पिक्चर टाइप एकत्र करण्याचे एखादे अॅप असेल तर त्याने ते एकत्र करून एक नवीन तिसरा विडिओ करणे. नंतर तो युट्युबवर अपलोड करणे आणि त्याचा प्लेअर मिपावर देणे.

-------
लेखाचा विषय - इम्रान खानच्या क्लिपमध्ये तुमचा रिअॅक्शन विडिओ टाकता येईल का?
अ) युट्युबवरचा कोणताही विडिओ उतरवणे अधिकृत नाही. विंडोजवर काही अॅप्स ते करून देत असली तरी ते तो वापरणे योग्य नाही.
ब) तुम्ही अधिकृत पत्रकार म्हणून इम्रानच्या सभेला जाऊन विडिओ काढल्यास तो अधिकृत होईल आणि तो वापरता येईल.
क) पहिली क्लिप प्ले होताना युट्युब साइट अक्सेस होते, त्यातली आतली विडिओ क्लिपसुद्धा युट्युबवरच असेल तर कसं शक्य होईल?

माहितगार's picture

20 Dec 2018 - 8:24 am | माहितगार

लक्षवेधल्या बाबत आभार, परंतु माझ्या माहितीनुसार भारतीय कॉपीराईट कायद्यातील अपवाद समजून घेतल्यास या संदर्भाने कायद्यातील कलम ५२ (१) a ii अनुसार समिक्षण आणि टिकेसाठी पुरेशी मोकळीक आहे. आणि अशा अडचणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुलभूत आधिकाराच्या आड उभ्या टाकू शकत नाहीत.

* कलम ५२ (१) a ii : Certain acts not to be infringement of copyright -The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,-a fair dealing with any work, not being a computer programme, for the purposes of-—criticism or review, whether of that work or of any other work संदर्भ

मिपावर प्रदर्शित करायचे झाल्यास आपली माहिती उपयूक्त ठरू शकेल, अर्थात तुर्तास तरी माझी प्रस्तावित निर्मिती इंग्रजी आणि हिंदीतून आणि विशीष्ट आंतरराष्ट्रीय श्रोता समोर ठेऊन करु इच्छित आहे.

आपल्या प्रतिसादातील काही तांत्रिक बाबी अद्याप नीटश्या उमगल्या नाही. अजून एक दोनदा वाचून पहातो.

१) कॅापी राइट मुद्दा बाजूला ठेवू. म्हणजे असं की तुम्हाला हा विडिओ तुमच्या मेमरी स्टोरिजवजवर घेता आला आहे तर पुढे -

२)"तांत्रिक बाबी अद्याप नीटश्या उमगल्या नाही. "
याबद्दलच आहे.
३) क्रमांक (१)मुळे पहिली पायरी पार पडली.
४)) आतली रिअॅक्शन क्लिपसुद्धा आहे.
५) तर आता दोन्ही मिळूनची एकच विडिओ क्लिप कोणत्यातरी सॅाफ्टवेर/अॅपने बनवा. म्हणजे ही एक नवीनच विडिओ क्लिप होईल. ती युट्युबवर चढवायची.
--------------
दुसरे एक थोडेसे समांतर उदाहरण - माझ्याकडच्या पाचसहा फोटोंचा स्लाइडशो ( म्हणजे एक विडिओच असतो) तो मी अॅप वापरून बनवला आणि तो युट्युबवर अपलोड केला की तो जसा बनवला ( ट्रान्झिशन टाइम,थीमसह) तसा चालतो.

माहितगार's picture

20 Dec 2018 - 5:29 pm | माहितगार

हां लेयर्सचा पर्याय जमला नाही तर अगदी आपण म्हणता तसेच करावे लागेल ओरीजनल व्हिडिओ स्प्लिट करुन घेऊन प्रत्येक तुकड्या नंतर आपली रिस्पॉन्स क्लिप टाकता येऊ शकेल. एखाद दोन अ‍ॅप वापरुन हे तुलनेने सोपे जाईल असे वाटते.

लेयर्सच्या पर्यायात रिअ‍ॅक्शन देण्याचा ओरीजन व्हिडिओ पिक्चर इन पिक्चर असा छोट्यासाईजमध्ये आणि तुकडे तुकडे करुन घेता येईल . पिक्चर इन पिक्चर मध्ये तीन पर्याय शक्य होतील १) दुसर्‍या लेयरवरील व्हिडिओत आपण स्वतः दिसत प्रतिक्रीया नोंदवणे २) किंवा टर्मिनेटर म्हणतात तसे अ‍ॅनिमेशन दाखवणे ३) तिसरा पर्याय मी जो विचार करत होतो तो आपले म्हणणे टेक्स्टमध्ये मांडणे आणि फक्त वाचून दाखवणे . सुरवातीस तिसरा पर्याय सोयीस्कर जायील असे वाटते. लेयर्सचा पर्याय अधिक प्रोफेशनल दिसेल.

तरी टर्मिनेटर आणि बागलाणकर अनुभवी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार रिस्पॉन्स देताना स्वतः दिसलेले चांगले. त्यावर विचार करतोय. बघुया आता किती जमते ते .

मार्गदर्शनासाठी अनेक आभार.

अगोदरची पोस्ट >>>लक्षवेधल्या बाबत आभार, परंतु
20 Dec 2018 - 8:24 am | माहितगार
लक्षवेधल्या बाबत आभार, परंतु माझ्या माहितीनुसार भारतीय~~~~"

हे मान्य करून तुम्हाला ती क्लिप वापरण्यासाठी स्टोरिजवर उपलब्ध आहे त्याच्या पुढची कृती दिली.

कंजूस's picture

20 Dec 2018 - 6:37 pm | कंजूस

>>लेयर्सचा पर्याय अधिक प्रोफेशनल दिसेल.>>

खूप हाइटेक होण्याचा उद्देश काय?

मिपा किंवा इतर संस्थळाबाबत बोलायचं तर तुमचा दृष्टीकोन,मतं वाचकापर्यंत पोहोचवणे एवढंच असतं . म्हणजे १) युट्युब लिंकमधला विडिओ पाहा आणि त्यातील ००:१५,०१:३४,वगैरे वाक्यांवर(२) ही माझी मतं . पुरतय.

माहितगार's picture

20 Dec 2018 - 6:54 pm | माहितगार

हम्म, आपण टेक्स्ट बद्दल टिका करताना आधी तो टेक्स्ट क्वोट करतो आणि मग त्या खाली टिका लिहितो. नुसतीच टिका लिहिली तर वाचक किंवा श्रोत्यास मूळ टेक्स्ट काय ते शोधत फिरायला लागेल त्या शिवाय लेखक किंवा सादरकर्ता काय म्हणतोय याचा वाचक किंवा श्रोत्यास नीटसा संदर्भ लागणार नाही.

तसेच व्हिडिओवर रिस्पॉन्स बाबतीतही आहे, श्रोत्यास इतरत्र शोधत बसण्या एवजी सरळ तिथेच मूळ ऐकुन त्यावरील आपली टिका ऐकण्यास मिळणे बरे पडेल असे वाटते.

>>तसेच व्हिडिओवर रिस्पॉन्स बाबतीतही आहे>>

हो. पण बरेच लोक मिपा आणि इतर साइटस मोबल्यातच पाहू लागल्याने सर्वांनी मोबाइलयोग्य थीम वापरायला सुरू केली. तर या इटुकल्या पडद्यावर त्याच्या आत आणखी एक पडदा उघडायचा म्हणजे गर्दी होते. डेस्कटॅाप पेजसारखे पॅापअपसुद्धा डोकेदुखी होते. एवढंच काय लोकांना चोवीस इंची स्टॅन्डर्ड टिवि नको, अठेचाळीस, बावन हवाय!

( जस्टिन बिबर तरुण गायक म्हणे मुद्दामहून व्हिजिए रेझ विडिओ अपलोड करतो, एचडी नाही. लोकांना फार ब्वॅाक केलं की घाबरतात. जरा टुमदारच आवडतं -प्लेझंटली सिम्पल.)

कल्पना आवडतेय पण खटाटोप फार आहे.

माहितगार's picture

21 Dec 2018 - 8:41 am | माहितगार

...पण खटाटोप फार आहे.

हो तसे आहे खरे, टेक्स्ट हातात नसताना व्हिडिओंचे समिक्षण अवघड जाते. पण व्हिडिओ एक प्रभावी माध्यम आहे आणि पाकिस्तानकडून भारत विरोधी प्रचारासाठी ( इनफर्मेशन वॉर) हे माध्यम बरेच वापरले जाऊ लागले आहे त्या प्रमाणात भारतियांकडून मुद्देसूद प्रतिवाद पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही तेव्हा आपणही हे माध्यम शिकुन घेऊन फुल नाही फुलाची पाकळी प्रयत्न करून पहावा असे वाटते .

टर्मीनेटर's picture

21 Dec 2018 - 12:02 am | टर्मीनेटर

माहीतगारजी मी वापरत असलेल्या VideoPad Video Editor मध्ये एक Sample Video तयार केला आहे, मला वाटतं असंच काही करायचा तुमचा विचार असावा.
अर्थात अत्यंत कमी वेळात तयार केल्यामुळे तो सफाईदार बनलेला नाही याची पूर्ण कल्पना आहे, पण नमुन्यादाखल त्यात ईतर Video क्लिप्स, कार्टून्स, text अशा सर्वांचा वापर केला आहे.

माहितगार's picture

21 Dec 2018 - 8:58 am | माहितगार

या टेक्नीक्सवर आपला हात व्यवस्थीत बसलेला आहे असे दिसते. अगदी आपण वापरलेली टेक्नीक्स जमावीत अशी इच्छा आहे. तुमच्या प्रमाणे हात बसण्यास अजून सराव करावा लागेल. अर्थात मी माध्यम वैचारीक मांडणी करण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे आपल्या प्रमाणे रंजकतेची तेवढी जोड देण्याचे आपल्या प्रमाणे कौशल्य नाही.

रंजक प्रतिसादासाठी अनेक आभार

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2018 - 6:09 pm | चौथा कोनाडा

टर्मीनेटर, भारी, ऎक नम्भर !

कंजूस's picture

21 Dec 2018 - 7:32 am | कंजूस

विडिओ जमलाय @टर्मिनेटर!!