पनिर फ्रँकी

जागु's picture
जागु in पाककृती
7 Dec 2018 - 3:29 pm

मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विदेशी पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी.

मला साहित्य लागल ते म्हणजे

मेन म्हणजे चपाती. त्या आपल्या सगळ्यांकडेच होतात त्यामुळे मी त्याबद्दल मी काही देत नाही. फक्त जर तुम्हाला जास्तच मऊ वगैरे हव्या असतील तर थोडा मैदा मिसळायचा. पण मी मैदा टाळते त्यामुळे नेहमी सारख्याच चपात्या केल्या.

अमुल बटर
चाट मसाला
चिज
मेयॉनिज
गुंडाळण्यासाठी अ‍ॅल्यूमिनियम फॉईल

आतील कटलेटसाठीचे सामान

१ वाटी वाफवलेले मटार
२-३ मोठे बटाटे उकडून मॅश करुन
वाटीभर होईल अस कुस्करून पनीर
हिंग
हळद
मिरची पुड १ चमचा
१ चमचा गरम मसाला (आवडत असल्यास)
तेल
गरजे नुसार मिठ

काही सजावटीसाठी भाज्या

कोबी
गाजर
सिमला मिरची (मी तीन रंगाच्या घेतल्या आहेत. लाल, पिवळी आणि हिरवी)
कांदा
कोबी
ह्या सगळ्या भाज्या लांबट कापुन घ्यायच्या.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हिंग, हळद टाकून मटार टाका. परतवुन मिरची पावडर व गरम मसाला घाला ते परतवल की पनीर आणि मॅश केलेला बटाटा घाला. मिठ घाला एक वाफ आल्यावर गॅस बंद करा.

हे मिश्रण थोड थंड झाल की त्याचे लांबट कटलेट बनवा.

हे कटलेट पॅनमध्ये थोड्या तेलावर शॅलो फ्राय करुन घ्या.

सजावटीच्या भाज्या एका पॅनमध्ये थोड्या तेलावर परतवा. त्यात चाट मसाला टाका. पण शिजवायच्या नाहीत. कडक राहिल्या पाहिजेत.

पहिला चपाती थोडी शेकवून चपातीला बटर लावून घ्या.

आता त्यावर मेयॉनिज पसरवा.

मध्यभागी सजावटीच्या भाज्या उभ्या लावायच्या आणि त्यावर कटलेट ठेवून त्यावर चिज किसून पसरवायच. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवायचा

मग चपातीची जी बाजू बेस करणार आहोत ती आधी दुमडायची मग त्यावर बाजूच्या दोन बाजू दुमडायच्या.

गुंडाळून झाल की खाली अ‍ॅल्युमिनीयम फॉईल गुंडाळायची झाली तुमची फ्रॅ़ंकी तय्यार.

कशी दिसतेय?

उचला आता पटापट.

ही फ्रँकी घरात सगळ्यांना आवडली व एक नविन पोटभरीच्या पदार्थाची सोय झाली.

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

7 Dec 2018 - 4:03 pm | mrcoolguynice

+1

mrcoolguynice's picture

7 Dec 2018 - 4:03 pm | mrcoolguynice

+1

मदनबाण's picture

7 Dec 2018 - 8:44 pm | मदनबाण

छान दिसतय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Karma Theme (Telugu) :- U Turn

उगा काहितरीच's picture

7 Dec 2018 - 8:51 pm | उगा काहितरीच

नक्की करून बघेल. सोप्प आहे , जवळजवळ सगळे पदार्थ घरी असतातच .

उशीराच बघितली. नाहीतर सर्व साहित्य घरीच होते. आज करता आली असती किंवा बायकोला करायला सांगितली असती.

जुइ's picture

10 Dec 2018 - 2:01 am | जुइ

५ एक वर्षांपूर्वी हा प्रकार खाल्ला पहिल्यांदा. त्यावेळी आवडला होता. फक्त फॉईल ऐवजी टूथ पीक टोचवलेली होती. आता घरी करून बघणार आहे.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

इरसाल's picture

10 Dec 2018 - 12:58 pm | इरसाल

गुजरात मधे हा प्रकार फारच पॉप्युलर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॅकी मिळतात.
मेयोनिज, पनीर, व्हेज, चीझ वगैरे वगैरे. (इथे मधे ठेवलेल्या बटाट्याच्या कटलेट्स डीप फ्राईड असतात.)
घरी जर अजुन सोप करायच असेल तर मकेन्सच्या व्हेजी नगेट्स आणुन तळुन त्या ठेवल्या तरी मस्त्पैकी भागेल.

II श्रीमंत पेशवे II's picture

11 Dec 2018 - 11:49 am | II श्रीमंत पेशवे II

पाकृ आवडली

इरसाल, श्रीमंत पेशवे धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2018 - 6:09 pm | अत्रुप्त आत्मा

आहाहहाहाहाहा!!!

सोन्या बागलाणकर's picture

21 Dec 2018 - 3:28 am | सोन्या बागलाणकर

स्स्स्सस्स्स....
तोंडाला पाणी सुटले जागुताई :)

Blackcat's picture

8 Jan 2019 - 1:38 pm | Blackcat (not verified)

छान

स्वाती दिनेश's picture

11 Jan 2019 - 2:23 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसतेय पनिर फ्रॅन्की..
स्वाती