Skip to main content

चालू घडामोडी : नोव्हेंबर २०१८

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 01/11/2018 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
शक्ती अवतरला ! IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.  (जालावरून साभार)

वाचने 44221
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by डँबिस००७

By Mahabaleshwar Sail is a must read for those who want to know more. Bookganga.com says, very aptly, of this book: सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात पश्चिम किनाऱ्यावर येऊन थडकले आणि त्यांनी गोवा हे बेट आपल्या ताब्यात घेतलं. पण केवळ प्रदेशावर सत्ता प्रस्थापित करून ते थांबले नाहीत. जो धर्म राजाचा तोच प्रजेचा असला पाहिजे, या धर्मवेडानं पछाडलेल्या या सत्तेनं प्रजेचं धर्मातर करण्यासाठी, त्यांना ख्रिश्चन करण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले. छळ केला. त्या अत्याचारांचं रौद्र रूप म्हणजेच 'तांडव'. अडोळशी गावात घडणारी ही कहाणी त्या वेळच्या संपूर्ण गोव्याचं एक सामाजिक, मानसिक आणि श्रद्धेय जग उभं करतं.

In reply to by डँबिस००७

त्या काळी भारतात आलेले मिशनरी आणि धर्मांतरित झालेले लोकं ज्यांना ईस्ट इंडियन ख्रिस्चन म्हंटले जाते त्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या निष्ठा या कधीच भारताशी नव्हत्या/नाहीत! भारतातील अत्यंत कर्मठ ख्रिस्चन म्हणून त्यांची ओळख आहे! हिंदू-मुसलमानांमध्ये कायम तेढ राहण्यासाठी हे लोकं सातत्याने प्रयत्नशील असतात! स्वतःच्या शिक्षणापासून घर घेण्या/बांधण्या, लग्ना पर्यंत चर्च कडून मदत घेणारी हि लोकं नंतर सहकर्मचारी/ शेजाऱ्यांशी अशा काही अढ्येतेखोरपणे आणि इतरांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अशा पद्धतीने वागतात कि काय सांगावे! कॉनव्हेंट शाळांमध्ये मुलांना भरती करण्यासाठी आज आपल्यातील अनेक लोकं प्रचंड उत्साही दिसतात, पण दुर्दैवाने त्या पढ्या-लीख्या गावारांना हे देखील माहिती नसते कि कॉनव्हेंट शाळा या चर्च ने अनाथ मुला/मुलींसाठी सुरु केल्या होत्या! तोच प्रकार आता CBSE आणि ICSE च्या बाबतीतही बघायला मिळतो! जिथे जन्मले, तिथेच मरेपर्यंत नोकरी/व्यवसाय करणारे लोकही आपल्या पाल्यांना स्टेटस सिम्बॉल म्हणून CBSE आणि ICSE शाळांमध्ये भरती करताना बघितले कि हसायलाच येते!

In reply to by अथांग आकाश

कसलं आलंय कर्मठ ख्रिश्चन . गेल्या दोन तीन शतकातील ख्रिश्चनांचा लैंगिक स्वैराचार बघितला तर हिंदू धर्म कधीही श्रेष्ठ वाटतो . किमान आपल्या धर्मात मंदिरातील पुजारी बलात्कार केस मध्ये सापडले तर सर्वात अगोदर भक्तगण त्यांना तुडवतील मग पोलिसांच्या स्वाधीन करतील . पण त्यांच्यात केरळ मधील पाद्र्याना वर्षभर पोप ने संरक्षण दिले

ह्या अत्याचाराच्या मागे असलेल्या व्हॅटीकन पोपने रवांडा सारख्या आफ्रिकेच्या छोट्या देशाची माफी मागीतली पण गोव्याच्या जनतेची भारतासारख्या मोठ्या देशाची माफी कधीही मागीतली नाही. देशाच्या सरकारात धमक नसेल तर व्हॅटीकनचा पोपच काय पण, दुसरा कोणताही सोम्या गोम्यापण त्या देशाला भित नाही.

In reply to by डँबिस००७

देशाच्या सरकारात धमक नसेल तर व्हॅटीकनचा पोपच काय पण, दुसरा कोणताही सोम्या गोम्यापण त्या देशाला भित नाही.
तुमचे म्हणणे सयुक्तिक वाटते पण २०१४ नंतर परिस्थिती बदलली नं ??

In reply to by mrcoolguynice

असंच काही नाही देशाची दयनीय परिस्थिती एक माणुस एक सरकार बदलू शकत नाही. अटल बिहारींच्या काळात वाच्यता न करता पुरुलीया प्रकरणातील अपराध्याना सोडावे लागले तर या सरकारला केरळातील मासेमार्‍यंचा खून करणार्‍या इटालीयन हिरोंना इटलीत जाऊ द्यावे लागले. देशाच्या वील पॉवर साठी प्रत्येक नागरीकाची वील पॉवर खर्ची घालण्याची तयारी पाहिजे ती भारतीयात नीटशी कधीच नव्हती.

In reply to by माहितगार

देशाची दयनीय परिस्थिती एक माणुस एक सरकार बदलू शकत नाही. "पण देशाची दयनीय परिस्थिती एकंच माणुस बदलू शकतो "..( सिंगल हिरो सिंड्रोम ), अशी विचारसरणी लोकांच्या मनात का बरे बिंबली /बिंबवली गेली असेल ? ती विचारसरणी कशी (सकारात्मकपणे ) बदलता येईल ??
देशाच्या वील पॉवर साठी प्रत्येक नागरीकाची वील पॉवर खर्ची घालण्याची तयारी पाहिजे ती भारतीयात नीटशी कधीच नव्हती.
वील पॉवर का नाहीये ? का तयार झाली नाही / का होऊ नाही दिली गेली ? का तयार होत नाही / का होऊ नाही देत ?

In reply to by mrcoolguynice

वील पॉवर का नाहीये ? का तयार झाली नाही / का होऊ नाही दिली गेली ? का तयार होत नाही / का होऊ नाही देत ?
आपले हे प्रश्न खरेच कळीचे आहेत.
"पण देशाची दयनीय परिस्थिती एकंच माणुस बदलू शकतो "..( सिंगल हिरो सिंड्रोम ), अशी विचारसरणी लोकांच्या मनात का बरे बिंबली /बिंबवली गेली असेल ? ती विचारसरणी कशी (सकारात्मकपणे ) बदलता येईल ??
उर्वरीत देशांचे माहित नाही भारतात तरी 'व्यक्तीपूजा', 'परिवारपूजा', 'ग्रंथपूजा' या समस्या गंभीरच आहेत. विचारसरणी बदलता येते का माहित नाही. ग्रंथपूजेचा उतारा आणखी नव्या कथा-काव्य लेखनात असतो, व्यक्तीपूजेचा उतारा मुर्तीपुजेनेच होतो, हे भारतीयांना ठाउक आहे. परिवार पूजेचा उतारा मात्र अद्याप भारतीयांना ठाऊक नसावा.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा भूतकाळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/shah-three-ips-oicers-… .... कॅर्नल आणि साध्वीला दिलासा मिळाला अशी वदंता होती पण त्यांचं काय अजून अलबेल नाही. .... नॅशनल हिर्लाड प्रकरणी माय-लेकरांवर पण टांगती तलवार आहे. .... सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीचा गाडीवान बैलं सावलीला सोडून कुठे फरार झालाय देव जाणं.

After historic sixth world title, Mary Kom sets eyes on 2020 Tokyo Olympics gold मेरी कोमने प्रतिस्पर्ध्यावर ५-० असा विजय नोंदवित आपल्या टोपीत अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. मुष्टियुद्धात जागतिक पातळीवर सहावे सुवर्णपदक मिळवून तिने जागतिक विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे. पुरुष गटातही आजवर सहा सुवर्णपदके हाच विक्रम आहे. या गुणी खेळाडूचे जेवढे अभिनंदन करावे व आभार मानावे तेवढे थोडेच आहेत !!!

ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है ?!

China signals displeasure to Pakistan with map depicting PoK in India CGTN (China Global Television Network) हा चिनी सरकारचे अधिकृत टिव्ही चॅनल आहे. नुकत्याच कराची येथिल चिनी उपवकिलातीच्या (काऊन्सलेट) इमारतीवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची बातमी देताना या चॅनलने दाखविलेल्या नकाशात पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवला. चिनी सरकार, केवळ त्यांने अधिकृत केलेलेच नकाशे वापरावे याबद्दल अत्यंत आग्रही असते. हा नियम केवळ चिनी संस्थाच नव्हे तर चीनमध्ये काम करणार्‍या सर्व चिनी/गैरचिनी संस्था व तेथे प्रसिद्ध होणार्‍या सर्व माध्यमांना पाळावा लागतो. यातून गुगल, मायक्रोसॉफ्ट, इत्यादी महाकंपन्यांनाही जरासुद्धा सूट नाही. या कारणासाठी, मान्य असो वा नसो, आंतरराष्ट्रिय कंपन्याना चीनसाठी चीनी सरकारमान्य नकाशा आणि बाकी सगळ्या जगासाठी दुसरा नकाशा असे नेहमी करावेच लागते. चिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द चिनी सरकारच्या माध्यमाने, पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवणे, लक्षणिय गोष्ट आहे. मात्र, आताच चीन-पाकिस्तानचे वाजले, असे म्हणून आनंद साजरा करायची गरज नाही ! कारण, बर्‍याचदा चीन असे माध्यमांतले फुगे हवेत सोडून, (अ) दुसर्‍या देशाला सूचना देतो (पोश्चरिंग) आणि (आ) त्या देशाच्या प्रतिक्रियेवरून पुढची रणनिती आखतो. तेव्हा, ही गोष्ट पाकिस्तानशी संबंध खूप खराब झाले आहेत असे समजण्याऐवजी, चीनने पाकिस्तानला, "सुधारून घे भाऊ आणि आपल्या चड्डीत रहा" असे सांगितले आहे, असे समजणे जास्त संयुक्तिक होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चीनी लोक सहसा नकाशांबाबत भोंगळ नसणार. त्यांनी चूक केली तर केवढी बातमी होऊ शकते. चीनी वृत्त माध्यमातील आपण म्हणत असलेल्या नकाशाची लिंक मिळाली नाही पण अक्सई चीन चिन मध्ये दाखवून पिओके भारतात दाखवले असेल तर ते मुद्दाम केलेले असू शकते पण अक्सई चीन सहीत पि ओ के भारतात दाखवला असेल तर नकाशांबाबत फारशी माहिती नसलेल्या चिनी व्यक्ती कडून अनवधानाने गल्लत झाली असू शकते - आणि हि शक्यता अधिक वाटते. कारण चीन महासत्ता आहे आणि पाकीस्तान आर्थीक अडचणीत असताना चीनशी पंगा घेणार नाही, पाकीस्तानला वाकवण्यासाठी पडद्या मागे असे थातूर मातूर काही करण्यापेक्षा पाकीस्तानी लोकांना दमात घेण्याची पुरेशी क्षमता चीनी लोकांकडे नक्कीच असणार असे वाटते. पाक व्याप्त काश्मिर भारतात दाखवला आहे की पाकीस्तानात हे बारकाव्यांबाबत नजर सरावल्या शिवाय समजणे जरासे अवघड जाते . असंख्य भारतीय पूर्ण काश्मिर भारतात दाखवणारा नकाशा न वापरता पाकव्यप्त काश्मिर पाकीस्तानात दाखवणारे तिसर्‍या देशातील दृष्टीकोणांचे नकाशे वापरत असतात. तरीही भारतीयांचे भारताच्या नकाशांप्रती अज्ञान अनास्था आणि भोंगळपण खेदकारक आहे.

In reply to by माहितगार

नकाशांबाबत फारशी माहिती नसलेल्या चिनी व्यक्ती कडून अनवधानाने गल्लत झाली असू शकते चिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. हा मुद्दाम ठळक केलेला मजकूर नजरेआड झालेला दिसतोय. शिवाय, तो नकाशा कोणी ऐर्‍यागैर्‍या माध्यमांतर्फे नाही तर चीनी सरकारच्या अधिकृत माध्यमातर्फे दाखविला गेला आहे... अश्या बाबतीत गलथानपणा करणे चीन सरकारमध्ये भारत सरकारइतके सामान्य समजले जात नाही, तेथे अश्या गोष्टींसाठी वरपासून खालपर्यंत सर्व अधिकार्‍यांना कडक शिक्षा होते. मुख्य म्हणजे, चीनी सरकारी (आणि बहुतांश महत्वाच्या गैरसरकारी) संस्था एका समन्वयित (coordinated) प्रणालीचा भाग असतात व त्या सरकारची तातकालिक व दीर्घ मुदतिची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी चालवल्या जातात... त्यांना स्वतंत्र आस्तित्व नसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारतात कृृृृतग्घ्न लोकांची कमी नाही. पुर्ण काश्मिरवर भारताचा दावा चुकीचा आहे असे मानणारे महाभाग भारतात रहातात. प्रशांत भुषण, अरुंधती रॉय हे त्या पैकीच काही !

In reply to by डँबिस००७

ए.एम.यु. मधील जुलै २०१८ चा हा तु नळीवरील व्हिडीओ बघा. कोण काश्मिरी हमिदा नयिम आहे तिला ए.एम.युत व्यासपीठ मिळते वगैरे पण या व्हिडीओच्या सुरवातीस ए.एम.यु कार्यक्रमातील अँकर 'दुनिया की सबसे बडी जम्हुरीयत कश्मिरमे कितनी खुबसुरत नजर आ रही है" म्हणून खोचक डायलॉग मारतो त्यावर ए.एम.यु. श्रोत्यांच्या टाळ्यांचा अर्थ नेमका काय आणि कसा काढणार ? त्याच व्यासपिठावर अर्बन नक्षलांचे असणे माझ्या डोळ्यातून सुटले नाही.

In reply to by डँबिस००७

....भारतात कृृृृतग्घ्न लोकांची कमी नाही.....
भारतात यांना नेमके काय कमी पडते की तथाकथित लोक थाळीत छेद करण्यास तयार होतात तेच समजत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ म्हात्रेजी, राजकारणात अशक्य काहीच नसते हे स्वतः चिनी लोकांचे पारंपारीक तत्वज्ञान आहे पण तरी सुद्धा आपण म्हणता तसे जाणीवपुर्वक असेल तर चीनची बरीच मोठी कोलांट उडी ठरेल. चीन एवढ्यात अशी कोलांट उडी मारेल असे व्यक्तिशः वाटत नाही.

In reply to by माहितगार

माहितगारजी, चीन एवढ्यात अशी कोलांट उडी मारेल असे व्यक्तिशः वाटत नाही. हे मी कधी म्हटले आहे ?! माझ्या लेखनातिल सर्व मजकूर न वाचताच तुम्ही अगोदरचा व हा प्रतिसादसुद्धा लिहिला आहे असे वाटते आहे ! :) सर्व मजकूर व विशेषतः शेवटचा परिच्छेद वाचल्यास... "या इतक्या कारवाईमुळे चीनची रणनिती बदलली आहे हे सिद्ध होत नाही. किंबहुना, हा केवळ संदेश धाडण्याचा (पोश्चरिंग) प्रकार आहे", अश्या स्पष्ट अर्थाचा मजकूर मी लिहिल्याचे ध्यानात येईल. मात्र, ही कृती चुकीने झालेली नसून, पाकिस्तानला दिलेला इशारा आहे, याबाबत संशय नाही. या कृतीची मुख्य कारणे अशी आहेत... (अ) पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवर सतत होणारे हल्ले, (आ) चीनच्या पाकिस्तानातील प्रकल्पांवर पाकिस्तानात सतत होणारी टीका, (इ) पाकिस्तानच्या भूमीवर एका चीनी व्यवस्थापकाची झालेली हत्या, (ई) आता नुकताच कराचीतील चिनी उपदुतवासावर झालेला हल्ला... आणि (उ) या सगळ्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात पाकिस्तानला आलेले अपयश (किंबहुना, मुद्दाम केलेले दुर्लक्ष).

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

..मात्र, ही कृती चुकीने झालेली नसून, पाकिस्तानला दिलेला इशारा आहे, याबाबत संशय नाही....
१) असे इशारे चुकार न ऐकणार्‍यांना दिले जातात, इम्रानखानच्या पक्षाने 'चीनच्या पाकिस्तानातील प्रकल्पांवर अंशतः टिका केली असेल नाही असे नाही -इम्रानखान ने कितीही गप्पा मारल्या तरीआर्थीक स्थिती वाईट असताना व्चीनचे पडद्यामागचे इशारे इम्रानखान आणि पाकी लष्कराला पुरेसे असावेत - पण चीनला असा जाहीर इशारा द्यायचा असता तर चीनने इम्रानखानच्या भेटीच्या आधी किंवा भेटी दरम्यानच दिला असता. जसे त्यांच्या अध्यक्षाची मोदींसोबत भेट चालू असताना चीनी सैन्याने घुसखोरी केलेली होती. २) काश्मिरचा काही भाग पाकीस्तानने चीनला आंदण दिलेला आहे, आणि समजा उद्या पाकव्याप्त काश्मिर भारताचे झाले तर तो भूभाग भारतास देऊ असे चीनने भारतास कबूल केलेले आहे. पाकव्याप्त काश्मिर भारतास मिळाले तर आंदण मिळालेल्या भूभागावर चीनला पाणी सोडावे लागेल शिवाय त्या भागाने भारत आणि अफगाणीस्तान जोडले जातील . भारता सोबत उर्वरीत सीमा विवाद सुटेपर्यंत , काही मोठी चूक केल्या शिवाय चीन पाकिस्तानसोबत इशार्‍यांचा खेळ खेळण्याची शक्यताही व्यक्तीशः कमी वाटते.

राजस्थानमध्ये बी एस एफ ने केलेल्या धार्मीक कल विषयक पहाणीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडीयाने दिले आहे . बॉर्डर सेक्युरीटीवर शक्य असलेल्या प्रभावांचा सुरक्षा दलांनी त्यांच्यापुरता अभ्यास करण्यास काळजी वाटणार्‍या गोष्टींची माहिती सरकारला देण्यास हरकत नाही. पण सुरक्षा दले म्हणजे समाजशास्त्रीय अभ्यासातील पारंगत व्यक्ती नव्हेत त्यांच्या पहाण्यांच्या आधारावर अधिक सखोल अभ्यास आणि विचार विमर्शासाठी अशा पहाण्या आधी विद्यापीठांकडे गेल्या पाहीजेत. अर्थात विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपण परदेश धार्जीणे असल्यासारखे वागू नये तरच त्यांच्या अभ्यासाला अर्थ उरतो हे हि लक्षात घेणे महत्वाचे असावे.

In reply to by माहितगार

बिएसएफ दल... (अ) स्थानिक भूभागावर तळ ठोकून बसलेले असते. (आ) स्थानिकांच्या (गुप्त/उघड) सहकार्याने आणि खबरी व गुप्तहेरांच्या जाळ्याच्या मदतीने माहिती जमा करणे व ती दिलेल्या कामासाठी वापरणे, ही कोणत्याही संरक्षक दलाच्या रणनीतीतील शुन्यस्तरीय मूलभूत गरज समजली जाते... त्या माहितीशिवाय, दलाच्या कारवाया अयशस्वी होणे आणि/किंवा स्थानिक लोकांसाठी आणि/किंवा दलाच्या मानवसंसाधनासाठी धोकादायक होणे, यांची शक्यता अस्विकार्य असावी इतकी मोठी होऊ शकते. अर्थातच, ती माहिती मिळविणे आणि तिचे विश्लेशण करणे ही प्रत्येक संरक्षक दलाची "जीवन-मरण स्तराची" आवश्यकता असते. (इ) देशाची आणि स्थानिकांची सुरक्षा हेच सर्वोच्च ध्येय बिएसएफ सारख्या संरक्षक दलाच्या पुढे असते... आणि भारतिय संरक्षक दले ते ध्येय गाठण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, याबद्दल संशय नसावा. अर्थातच, संरक्षक दले काम करताना स्थानिक, वैचारिक, राजकिय, इत्यादी हितसंबंध खर्‍या माहितीआड येऊ देत नाहीत. त्याविरुद्ध... (अ) स्थानिक परिघाबाहेरच्या लोकांनी (ज्यात विद्यापिठाचे प्राध्यापकही येतात) चार-आठ दिवस भेट देऊन अनोळखी लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काढलेले निष्कर्ष तुलनेने कमी विश्वासू असतात. (आ) अश्या अभ्यासात, संवेदनाशील विषयावरील (ज्याबाबत, अनोळखी लोकांपुढे सत्य उघड करणे, स्थानिक हितसंबंधांमुळे, सहसा टाळले जाते) विश्वासू माहिती मिळणे कर्मकठीण असते, हे सांगायला नकोच. केवळ सर्वेक्षण करायला आलेल्या लोकांना (ज्यात विद्यापिठाचे प्राध्यापकही येतात) अशी मिळालेली माहिती अर्धवट सत्य आणि/किंवा धडधडीत असत्य असली तरी त्यामुळे सर्वेक्षण करणार्‍यांना तडक धोका नसतो... अर्थातच, सर्व माहिती, जरूर पडल्यास धोका पत्करून, मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करणे हे फार विरळ असते. (इ) "वैचारिक व राजकिय हितसंबंधांना सोईचे निष्कर्ष काढणे आणि स्थानिक भूभागाला भेट न देताही तसे करणे" हे बर्‍याच तथाकथित मान्यवर भारतिय शिक्षणसंस्थांमधिल तथाकथित विचारवंत प्राध्यापकांचे मुख्य लक्षण बनले आहे. वरील तुलनात्मक वस्तूस्थिती पाहिली तर, कोणाचे मत जास्त विश्वासू असेल, हे वेगळे सांगायची गरज आहे काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

म्हात्रेजी आपल्या पहिल्या दोन मुद्द्यांबाबत कोणतेच दुमत नाही. सुरक्षेच्या दृश्टीने केलेल्या सर्वेक्षणांचा सुरक्षादलांसाथी स्वतःचा उपयोग असतो. अर्थात कायद्याचे कुठे उल्लंघन होत नाही ना इथपर्यंत सुरक्षा दलांची मर्यादा असते. संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्‍या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे. वैचारीक मतप्रवाहांशी संवाद साधण्याची क्षमता वैचारीक धार्मीक, सामाजिक , राजकीय नेतृत्वात अधिक व्यास्थित असू शकतात. वैचारीक संवाद तुम्ही अथवा मीपण साधू शकतो पण अशा संवादांना निष्पक्ष सखोल शास्त्रीय सर्वेक्षणांची साथ असेल तर सध्याच्या विचार धारेतील नेमक्या कमतरता लक्षात घेऊन अधिक नेमके पणाने संवाद साधता येतो. विद्यापीठीय प्राध्यापक आणि त्यांचा विद्यार्थीवर्ग दिशाहीन होऊन देशहीत समजेनासे झाला आहे हि चिंतेची बाब आहे ती दुरुस्त झालीच पाहिजे . पण तर्कशास्त्र , विज्ञान ते समाजशास्त्र , राज्यशास्त्र अशा विषयातील ज्ञान रचनात्मक पद्धतीने संबंधीतांच्या प्रबोधनासाठी वापरले गेले तर विद्यापिठीय मंचाचा इफेक्टीव्ह वापर करुन घेता येऊ शकावा असे वाटते.

In reply to by माहितगार

संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्‍या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे. जगभरच्या संरक्षण दलांच्या सामाजिक कार्यांबद्दल (ज्यांना, "हार्ट्स अँड माईंड्स ऑपरेशन्स" असे म्हणतात) पुरेशी माहिती घेतल्यास तुमचे वरचे मत बदलेल. या कारवाया संरक्षणदले, स्वदेशातील अशांत भूप्रदेशावर, करत असतात. स्थानिक अशांत भूप्रदेशात संरक्षण दलाचा भाग म्हणून कार्यरत असताना अश्या कारवाईचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. सद्याही भारतात लष्कराने, (अ) काश्मिरमध्ये चालवलेल्या शाळा, (आ) मुलकी आधारभूत सेवांमध्ये मदत करणे, इत्यादी कामे धार्मीक, सामाजिक आणि राजकीय सुसंवाद साधण्यास मदत करत आहेतच. याशिवाय महत्वाची बाब अशी की, भारतिय संरक्षक दले केवळ सुसंवाद डोळ्यासमोर ठेऊन काम करतात, याबाबत लोकांच्या मनात संशय नाही... सद्याचे राजकिय नेते आणि 'तथाकथित विचारवंत' असे काही करतील असे समजणे, अंधश्रद्धा आणि/किंवा भ्रम (delusion) समजावा, अशी परिस्थिती आहे, हे सांगायला नकोच ! असो, माझे असे निरिक्षण आहे की तुमची मते "अत्यंत आदर्शवादी" आहेत /असतात. ती तशी असण्याला आक्षेप नाही, नसावा. मात्र, आदर्शवादी ध्येय गाठण्यासाठीही, व्यावहारीक परिस्थिती जमेस धरणे अत्यंत आवश्यक असते... अन्यथा निराशा पदरी येते. "चांगले करावे / चांगले करा रे" असे म्हणून चांगले होत असते तर हे जग केव्हाच नंदनवन झाले असते. यासंबंधात, अगोदरच्या प्रतिसादात एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहिला, तो असा... धार्मीक/सामाजिक/राजकीय उद्येशाने प्रेरित लोकांना (मग ते प्राध्यापक असो की तथाकथित विचारवंत) अशांत आणि/किंवा संवेदनाशील प्रदेशात, सर्वेक्षण किंवा सुसंवाद करण्यास पाठवणे, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे आहे ! "काश्मीर फुटिरतावाद्यांनी दरवाजातून हाकलून लावले तरी त्यांची तळी उचलत असलेल्या" आणि "शिक्षणसंस्थांत व माध्यमांत महत्वाच्या पदांवर शिरकाव केलेल्या", राजकारण्यांच्या/तथाकथित विचारवंतांच्या/त्यांच्या गुप्त-उघड पाठीराख्यांच्या मांदियाळी डोळ्यासमोर असताना, त्यांच्याकडे कृतींकडे दुर्लक्ष करून, त्यांच्याकडून आदर्शवादाचा आग्रह धरण्याइतके, व्यवहारात घातक काहीच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपल्या चिंतांशी सहमत आहे, त्याच वेळी आदर्शवादी आहे हे ही खरे , कारण अंतीम ध्येय सकारात्मक आणि रचनात्मक असणेच अभिप्रेत असते.

In reply to by माहितगार

आदर्शवाद बाळगताना आपले पाय वस्तूस्थितीच्या जमिनीवरून निसटून हवेत तरंगू लागल्यास, आदर्शवादसुद्धा फक्त हवेत तरंगत राहतो आणि नकारात्मक शक्तींचा विजय होतो, हे सार्वकालीक सत्य नजरेआड होऊ नये, इतकेच सुचवतो. अशा प्रकारच्या आदर्शवादाने स्वतःचा अहंकार (इगो) सुखावण्यापलिकडे फारसा फायदा होत नाही. केवळ आदर्शवादाची भलावण, इच्छा किंवा विनंती करून खलप्रवृत्तीची माणसे/तत्वे सज्जन बनली असती तर... नियम, कायदे, पोलीस, सैन्य यांची या जगात जरूरच राहिली नसती आणि खोटेपणा-फसवणूक-जुलुम-जबरदस्ती-वसाहतवाद यासारखे नकारात्मक व नाशकारी शब्दही आस्तित्वात आले नसते. तेव्हा, आदर्शवाद जरूर असावा, पण तो भोंगळ/भाबडा (नाईव्ह) नसून वस्तूस्थितीच्या मजबूत पायावर उभा असला तरच टिकतो... हे, जगाचा तर सोडाच पण, भारताचा इतिहासही डोळ्यासमोर असताना सांगावे लागते, हे आश्चर्यकारक आहे ! इतिहास विसरणार्‍या माणसांच्या नशीबी त्याची पुनरावृत्ती येते. (Those who cannot remember the past are condemned to repeat it : George Santayana.) या उप्पर तुमची मर्जी. आपापली मते एकमेकाकडे ठेऊन, ही चर्चा इथेच थांबवावी असे माझे मत झाले आहे.

माहितगार , विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपण परदेश धार्जीणे असल्यासारखे वागू नये विद्यापीठातील प्राध्यापक आपण परदेश धार्जीणे असल्यासारखेच आता पर्यंत वागत आहेत. त्यांच्यावरचा लेफ्टीस्ट विचारसरणीचा पगडा हे खुले गुपित आहे. त्यामुळे त्यां लोकांकडुन देशाच्या संरक्षणाच्या दृृृष्टीने अन बायस्ड स्टडी होणे कठीण आहे. बि एस एफ ने असे स्टडी क्वॉलिफाईड लोकांकडुन केले नाहीत असा तुमचा दावा आहे का ?

In reply to by डँबिस००७

विद्यापिठीय प्राध्यापकांनी बायस्ड नसणे महत्वाचे आहेच. त्यासाठी विद्यापिठांना अधिक चांगले नेतृत्व देण्यात कुठेतरी कमतरता असण्याची त्या शोधून दूर केल्या जाण्याची निकड असावी हे स्विकार्य आहेच. काही किंवा अधिक विद्यापिठांना समस्या असतील आणि आहेत म्हणून सर्वच विद्यापिठातील प्रत्येक प्राध्यापक बायस्ड आहे असे म्हणणेही सयुक्तीक ठरणार नाही.
....बि एस एफ ने असे स्टडी क्वॉलिफाईड लोकांकडुन केले नाहीत असा तुमचा दावा आहे का ?....
बि एस एफ एक सुरक्षा दल आहे गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांचे अशा पहाण्यांमधील दृष्टीकोण वेगळे असतात, त्यात समाजशास्त्रा पेक्षा सुरक्षा शास्त्राला अधिक महत्व येते . माझा आक्षेप सुरक्षा दलांमध्ये क्वालिफाईड लोक आहेत की नाही या पेक्षा यातील निरीक्षणे सुरक्षादले आणि निर्णय करणारे गृहमंत्रालय इथपर्यंत मर्यादीत असावीत . समाजशास्त्रीय कंगोर्‍यांचा अधिक सखोल अभ्यास न होता मिडीयाकडे जाऊ नयेत एवढेच मत आहे. सरकारने बायस्ड नसलेले विद्यापिठीय प्राध्यापक शोधून अधिक अभ्यास करुन उपाय योजनांचा अंदाज घेऊन मग अशी निरीक्षणे मिडीयाला उपलब्ध करावीत म्हणजे नुसताच गाजावाजा उथळ टिका न होता काही प्रगल्भ चर्चा आणि उपाय योजना होऊ शकतात.



PM Scholarship Scheme For 10th and 12th Passed Students 2018

१०वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे. ज्यांना तिचा फायदा घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील दुव्यावर टिचकी मारून अधिक माहिती घ्यावी.


विद्यापिठीय प्राध्यापकांनी बायस्ड नसणे महत्वाचे आहेच. त्यासाठी विद्यापिठांना अधिक चांगले नेतृत्व देण्यात कुठेतरी कमतरता असण्याची त्या शोधून दूर केल्या जाण्याची निकड असावी तुमच्या ह्या विधाना वरुन विद्यापिठातील लेफ्टीस्ट कम्युनिस्ट विचारसरणीच्या पगड्याबद्दल तुम्हाला कदाचीत कल्पना नसावी असे वाटते ! १९७० च्या दरम्यान एका चुकीच्या निर्णयामुळे श्रीमती ईंदिरा गांधींनी देशातील सर्व महत्वाची शिक्षण खात्यांसंबधीत पदे कम्युनिस्टांच्या हाती दिली ! त्याचा परिणाम स्वरुप पुर्ण पणे डावीकडे झुकलेले लोक शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या पदी विराजमान झाले ! त्या लोकांनी बराच डॅमेज केल्या नंतरही अजुन देशातील लोकांचे डोळे उघडलेले नाहीत , JNU AMU Jadhavpur University ही काही उदाहरण आहेत ! ह्याच विद्यापिठातुन टुकडे गँग कारस्थान करते ! ह्या विद्यापिठातील ९०% शिक्षक विद्यार्थ्यांचे ब्रेन वॉश करत असतात.

अश्या विद्यापिठातुन संशोधन करुन देशहितासाठी काही निष्पन्न होईल असे वाटत नाही ! BSF सारख्या नी आपले स्टडी आपणच करावेत व त्यानुसार संरक्षण धोरणे ठरवावीत कारण देशाच्या संरक्षणाबाबतीत ते उत्तरदायी आहेत . स्टीच ईन टाईम सेव्हस नाईन हेच खरे !!

BSF सारख्या नी आपले स्टडी आपणच करावेत व त्यानुसार संरक्षण धोरणे ठरवावीत कारण देशाच्या संरक्षणाबाबतीत ते उत्तरदायी आहेत . स्टीच ईन टाईम सेव्हस नाईन हेच खरे !!
या बाबत मी म्हात्रेजींना वर जे उत्तर दिले त्यातले अंशतः रिपीट करतो. सुरक्षेच्या दृश्टीने केलेल्या सर्वेक्षणांचा सुरक्षादलांसाथी स्वतःचा उपयोग असतो. अर्थात कायद्याचे कुठे उल्लंघन होत नाही ना इथपर्यंत सुरक्षा दलांची मर्यादा असते. संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्‍या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे.
...अश्या विद्यापिठातुन संशोधन करुन देशहितासाठी काही निष्पन्न होईल असे वाटत नाही !
देशहिताबाबत तडजोड करणारी सध्याची विद्यापिठीय स्थिती नक्कीच आदर्श नाही. पण म्हणून नशीबाला दोष देऊन हातावर हात धरुन बसणेही सयुक्तीक ठरणारे नसावे. वाचाळवीरता टाळून सध्याचे मानव संसाधन मंत्री जावडेकर नाड्या टाईट करत आहेत ते ठिक आहे. पण जावडेकर हे राजकीय नेतृत्व आहे वैचारीक नेतृत्व नाही. आज विद्यापिठांवर मानसिक प्रभाव पडेल अशा वैचारीक नेतृत्वाची गरज मंत्री स्तरावर मिळाली तर हवीच पण विशेषतः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मुख्यपदी अशा सॉलीड प्रभावी वैचारीक नेतृत्वाची गरज आहे जे विद्यापीठीय समुदायाला देशहीताच्या प्राधान्याची गरज पटवू शकेल. देशहीताचा विचारकरताना आर्थिक विचार प्रणाली समाजवादी आहे का भांडवलशाही हे गौण आहे , देशहिताची बांधिलकी आहे की नाही, त्यांच्या निष्पक्षतेत सापेक्षतेचे घोटाळे त्यांचे रुपांतरण तथाकथितात करत नाहीत ना हे महत्वाचे आहे असे वाटते.