अवघे धरू सुपंथ...
काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला या धाग्याची आठवण झाली. जगाच्या पाठीवर सर्वत्र उमटलेल्या या मराठी पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर तिच्यावरील उपचाराची वाट सापडू शकेल, अशी आशा मनात उमटली...
त्यासाठीच त्या मित्राचा मेसेज जसाच्या तसा इथे देत आहे. कुणीतरी, कुठेतरी या क्षेत्रातील थेट किंवा अप्रत्यक्ष माहीतगार या माध्यमातून काही मदत करू शकला, तर जगभरात पसरलेले हे समाजमाध्यमाचे जाळे विधायक कार्यासाठी हात देणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल.
आपणापैकी कुणास याविषयीच्या उपचाराची वा तज्ज्ञांची, किंवा रुग्णालयाची माहिती असेल, तर जरूर कळवा... ती माहिती या रुग्णास नक्कीच उपयोगी ठरू शकेल, व अवघे धरू सुपंथ हा विचारही सार्थ होईल...
‘माझी मुलगी मानसिक विकाराने गेले पावणे दोन वर्षे आजारी आहे. OCD with paranoid psychosis असे डॉक्टरांनी तिच्या रोगाचे विश्लेषण केले आहे. दररोज २० टॅब्लेट सुरु होत्या. गेल्या महिन्याभरापासून दररोज सात टॅबलेट सुरु आहेत… आठवडाभर खूप छान मूडमध्ये असते आणि नंतर गेले काही दिवस एकदम ड्रीप्रेशनमध्ये येते. अॅग्रेसिव्ह होते... ‘मरायचे आहे’ असे सांगते. रडत राहते. चाकू घेऊन हातावर मारून घेते. पण काही वेळानंतर स्वत: सांगते, ‘बाबा मी तुझ्यासाठी जगणार. मला किती त्रास होतोय तुला माहिती नाही!’…
डॉक्टरना हे सांगितल्यानंतर ते म्हणतात, ‘ती स्ट्रेस घेऊ शकत नाही. त्यावेळी तिचा ओसीडी वाढतोय!’…
कौन्सिलिंगचाही फायदा होत नाही. पुन्हा तेच घडतेय.
परीक्षा असू दे अथवा नाही... तिचा ओसीडी कमी होतच नाही. शॉक ट्रीटमेंट (ईसीटी ११ वेळा), आरटीएमएस (२४वेळा) हे उपचारही करुन झाले आहेत.
इंटरनेटवरील माहितीनुसार, ओसीडी बरा होत नाही असे नमूद आहे. परंतु तो नियंत्रणात राहून चांगलं दैनंदिन आयुष्य जगता येऊ शकतं असाही उल्लेख आहे. पण मानसीबाबत ते झालेलं नाही. उपचार चुकत तर नाही ना? तिचे निदान नीट झाले आहे का?...’
... माझ्या या मित्राला मदत हवी आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमच्या मित्राला मदत करण्याचा
अगदी अगदी .. ते मका शेट
मी स्वतः काही डॉक्टरांना
धागा लेखकाचे
+१
अगदी हेच लिहायचे होते
डॉ नटराज द्रवीड.natrajdravid